Advertisements

महाल येथील हिंदू संतप्त: योगी यांच्या बुलडोजरची आठवण
पोलिसांचे सपशेल अपयश:आम्हीच पोलिसांना दिला घरात आश्रय:पिडीतांचा दावा
शिवाजी पुतळ्या जवळील मजिदीतून ‘इस्लाम खतरे में’ची चेतावणी: प्रत्यक्षदर्शींचा आरोप नागपूरात ‘हिंदूच खतरे में!’
तीन डिसीपी जखमी: पोलिस आयुक्तांवरच रोष
तहसील पोलिस ठाण्यातील पीआयवर नागरिकांचा रोष:पिक्चर खतम होने के बाद आये
पोलिस उशिरा पोहोचले का,याची चौकशी करु:पोलिस आयुक्तांचे विधान
दंगलखोरांनी घराघरातून गाड्या रस्त्यावर आणून जाळल्या
महाल,हंसापूर,भालदारपूरात ‘बाहेरचे’उपद्रवी:ताजबाग,कामठीतून आले उपद्रवी!
नागपूरातील ११ भागात संचारबंदी: पोलिसांचा रुट मार्च
नागपूरमधील दंगल पूर्वनियोजित कट:हे गृहखात्याचं अपयश नाही का?उद्धव ठाकरेंचा सवाल
दंगलखोरांवर एनएसएची कलम लावा त्यांना जामीन मिळू नये: विश्व हिंदू परिषदेची मागणी
मुख्यमंत्री फिरकलेच नाही: महालकरांचा रोष
नागपूर,ता. १८ मार्च २०२५ : काल महाल भागातील शिर्के गल्लीत दंगलखोरांचा जमाव चाल करुन आला.मोठमोठे दगड,विटा,पेट्रोल बॉम्ब,तलवारी सोबत तो जमाव चाल करुन आला,घरा समोरील उभ्या असलेल्या दूचाकी रस्त्यावर आणून पेटवण्यास सुरवात केली.एकूण १९ दूचाक्या त्यांनी जाळल्या,याच शिर्के गल्लीत एक कार देखील त्यांनी पेट्रोल बॉम्बने पेटवली,हतबल नागरिक जिवाच्या भीतीने आपाल्या घरात दार बंद करुन आत बसली होती मात्र,कष्टाच्या पैशातून घेतलेल्या दुचाक्या एकानंतर एक आगीत भस्म होत होत्या,मात्र,याच गल्लीत एक मुस्लिम व्यापारी असा ही होता ज्याच्या गाड्या नेहमी याच गल्लीत दररोज राहत होत्या,दंगलीच्या दुपारी मात्र,त्या ’नेहमीच्या’ठिकाणावरुन ‘सुखरुप’जागेवर नेण्यात आल्या होत्या!
अमरावतीलमधील भाजपचाच पाठिंबा घेणारे एका आमदार-खासदाराचे जोडपे यांचा हा व्यापारी बिजनेस पार्टनर असल्याचे येथील प्रत्यक्षदर्शीने सांगितले.मुंबईत मोठ्या प्रमाणात बिल्डरगिरी करणा-या या व्यापारीची भूमिकाही पोलिसांनी तपासावी,असे येथील नागरिकांची मागणी आहे.याच गल्लीतील रहीवासी माधुरी पेशने यांनी रडत-रडत माध्यमांच्या कॅम-यासमोर सांगितले,कसा तिचा काल जीव वाचला! पेशने यांच्या घराच्या खिडकीला उन्मत्त,मस्तवाल जमावाने आग लावली,सगळा धूर आतमध्ये दाटला, घराच्या मागून,पुढून दोन्ही बाजूने दगडांचा मारा होता.तो थरार सांगता ही येत नव्हता.जमावाने आधी सीसीटीव्ही फोडण्याचे काम केले.
गोरगरीब रुग्णांवर गेल्या चाळीस वर्षांपासून उपचार करणारे बंडू क्लिनिकचीही तोडफोड केली.तेथील कर्मचा-यांना पकडण्याचा प्रयत्न केला.गीतांजली टॉकिज जवळ गॅरेजमधील कारांची तोडफोड केली. ७० वर्षात पहिल्यांदा असा हिंसाचार झाला असल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगतात.आता मनात भीती दाटली असल्याचेही वास्तव ते बोलून दाखवतात!
आता…येथील रहीवाश्यांच्या मनात कायमची भीती बसली आहे.आपल्याच घरात,आपल्याच शहरात सुरक्षेची हमी नाही ,जरी हे शहर राज्याचे मुख्यमंत्री व गृहखातं सांभाळणारे फडणवीस यांचे असले तरी!ते सुरक्षेत फिरतात,आमचा जीव स्वस्त आहे,अशी जहाल टिका देखील कानावर आदळली.जमाव याच शिर्के गल्लीत दगडफेक आणि जाळपोळ करुन थांबला नाही तर त्यानंतर पोलिसांना न जुमानता चिटणीस पार्ककडे त्यांनी आपला मोर्चा वळवला.याही ठिकाणी दगडांचा खच रस्त्यावर होता!
या संपूर्ण परिसराची आधी ‘रेकी’करण्यात आली होती,असा दावा येथील रहीवासी करतात.ताजबाग तसेच कामठीतून दंगलखोरांना बोलावण्यात आले,असे ते सांगतात.शिवजयंतीनिमित्त महाल येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ संपूर्ण विद्युत रोषणाई करण्यात आली होती.याच ठिकाणी दूपारी एकच्या सुमारास विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाने औरंगजेबचा पुतळा जाळला होता.या पुतळ्याला हिरव्या रंगाची चादर गुंडाळण्यात आली होती.यानंतर सोशल मिडीयावर त्याचे चित्र व्हायरल झाले आणि बजरंग दलाने कुराण मधील आयत जाळली अशी अफवाह सोशल मिडीयाच्या माध्यमातून क्षणार्धात पसरली.तब्बल चारशेचा जमाव‘बजरंग दल मुर्दाबाद’ची घोषणा देत गणेशपेठ पोलिस ठाण्यात पोहोचला होता व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करीत होता.याच ठिकाणी ‘औरंगजेब’चे आवाजी घोषणेने गुणगाणही गाण्यात आले!इतकंच नव्हे तर दुपारी गणेशपेठ पोलिसांनी दोन्ही गटाच्या लोकांची समजूत घालून प्रकरण ‘निपटवले’ आणि ‘निर्धास्त’झाले, मात्र,दुस-या गटातील लोकांच्या मनातील राग आतल्या आत धुसमुसत होता याचा अंदाजही पोलिस आयुक्त डॉ.रवींद्र सिंगल यांच्या पोलिस विभागाला आला नाही!सायंकाळी शिवाजी पुतळ्या जवळील मजिदीतून ‘इस्लाम खतरे में’अशी बाग देण्यात आल्याचा दावा येथील नागरिक करतात मात्र,यानंतर जे घडले ते ‘हिंदू खतरे में‘असल्याचे सिद्ध झाले.
शिवाजी पुतळ्याजवळ दुस-या गटाचा जमाव मोठ्या प्रमाणात असतानाही पोलिसांची कुमक ही फार कमी होती!पोलिस आयुक्तांच्या दाव्याप्रमाणे त्यांना गांधी गेटवरच अडवण्याच्या प्रयत्नात पोलिस करीत असताना, दुस-याच ठिकाणी शिर्के गल्ली व त्यानंतर चिटवणीस स्टेडियम रस्त्यावर जाळपोळ सुरु झाली!
थोडक्यात, पोलिसांनी दुपारी हा मुद्दा जितक्या ‘कॅज्युली’निपटवला,ते पोलिस विभागाचे फार मोठे अपयश होते, कारण रात्री आठ नंतर उफाळलेल्या दंगलीत त्या भागातील निष्पाप रहीवाश्यांच्या लाखोच्या संपत्तीचे अपरिमित नुकसान झाले,ज्याच्या भरपाईची घोषणा शहरातील आमदार व राज्याचे मुख्यमंत्री असतानाही करण्यात आली नाही!आमचा काय दोष?आम्ही आंदोलन केले का?असा सरळ सवाल ते करतात,इतकंच नव्हे तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांची आर्वजून आठवण काढत,ते जर या राज्याचे मुख्यमंत्री असते तर किमान काही घरांवर आज सकाळी-सकाळी नक्कीच ‘बुलडोजर’चालले असते,अशी संतप्त भावना ते व्यक्त करतात.सोशल मिडीयावर देखील नागपूरच्या या घटनेला घेऊन, योगी आणि त्यांचा बुलडोजर विशेष चर्चेत होता!
नागपूरच्या पोलिस आयुक्तांचे हे सर्वात मोठे अपयश आहे की ते दंगल आटोक्यात आणण्यात यशस्वी झाले नाही,असा सरळ आरोप केला जात आहे.फक्त अश्रूच्या नळकांड्या फोडून दंगलखोरांना पांगवण्याचे आदेश देण्या ऐवजी त्यांनी पोलिसांचे ‘हात’लाठीचार्ज किवा ‘दिसता क्षणी गोळीबारासाठी’ खुले करुन द्यायला हवे होते,असे देखील महाल येथील काही पिडीत सांगतात.त्यांचे तीन डिसीपी जखमी होणे इतकंच नव्हे तर चाळीसच्या वर पोलिस जखमी होणे ही बाब भूषणावह नसून या अपयशाची जबाबदारी पोलिस आयुक्तांनी घ्यायला हवी,अशी मागणी ते करतात.
मुख्यमंत्री यांनी तर त्या ही पुढे दंगलीत जखमी झालेले डिसीपी निकेतन कदम यांचे कौतूक करीत त्यांना त्यांच्या शौर्यासाठी शुभेच्छा दिल्या व अशाच प्रकारे नेहमी पुढे देखील काम कराल अशी ईश्वर चरणी प्रार्थना केली ,कदम यांच्यावर दंगलखोरांनी कु-हाडीने वार केला होता.मात्र,मुख्यमंत्री आपल्या पोलिस खात्याच्या जखमींसाठी हवालदिल होत असतानाच ,त्यांच्याच शहरात महाल भागात नागरिकांचं
‘काय जळलं?याची चिंता करताना दिसले नाही,अशी खोचक प्रतिक्रिया येथील रहीवासी देतात!काल जे भोगलं त्यातून पोलिस आणि गृह विभागावरचा
‘विश्वास जळला’असे ते सांगतात.

हंसापुरीतील अनेक रहीवासी सांगतात की दूपारपासूनच त्यांच्या भागात अनेकांची ‘हालचाल’योग्य वाटत नव्हती,त्यांनी अनेकदा तहसील पोलिस ठाण्यात सुरक्षेसाठी फोन केले मात्र,पोलिस आलेच नाहीत!ते जेव्हा आले तेव्हा ‘पिक्चर पूर्ण संपला होता!’असा संताप ते व्यक्त करतात.अनेक पोलिसांनी तर तूफान दगडफेकीमुळे त्यांच्याच घरात संरक्षण घेतले असे ते सांगतात,यात दोन महिला पोलिस देखील होत्या.या उन्मत्त दंगलखोरांवर जीवाच्या संरक्षणासाठी, लाठीचार्ज किवा गोळीबाराची चाल करुन जाण्याची परवानगी पोलिस आयुक्तांनी काल रात्री पोलिसांना दिली असती तर महाल भागातील ‘चित्र’वेगळे असते.जिथं डॉ.रविंद्र सिंगल यांचे पोलिसच जीवाच्या भीतीने नागरिकांच्या घरात दडले होते तिथे निशस्त्र नागरिकांच्या जिविताचे काय मोल?असा रोकडा सवाल ते करतात.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील नागपूरातील या दंगलीसाठी फडणवीस यांच्या गृहखात्याला जबाबदार धरत, फडणवीस सांगतात तशी,दंगल पूर्वनियोजित होती तर याचा सुगावा गृहखात्याला व नागपूरातील पोलिस आयुक्तांना लागला कसा नाही?असा सवाल करतात.
महत्वाचे म्हणजे,राज्याच्या उपराजधानीत एवढी मोठी घटना घडली तरी लाडके मुख्यमंत्री यांनी अद्याप दंगलीत होरपळून निघालेल्या भागाला भेट दिली नाही किंवा पिडीतांचे सांत्वन केले नाही!२३ सप्टेंबर २०२३ रोजी अंबाझरी ओवरफ्लोमुळे सखल भागातील लाखो घरांचे,व्यवसाय,प्रतिष्ठाने,दूकाने यांचे कोट्यावधीचे नुकसान झाले तेव्हा देखील मुख्यमंत्री हे येथील नागरिकांना ‘दू:खाचा पूर ओसरुन गेल्यावर’भेट देण्यास आले,अशी आठवण ताजी झाली.
विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिका-यांनी आज पत्रकार परिषद घेत अटक झालेल्या दंगलखोरांना जामीन मिळू नये,त्यांच्यावर NSA अन्वये कठोर कारवाई करावी,अशी मागणी केली आहे.असे निवेदन त्यांनी पोलिस आयुक्तांना दिले असल्याचे सांगितले.हिंसाचार करणा-या जिहादींवर कडक कारवाई करण्याची मागणी विदर्भ प्रांतचे सहमंत्री देवेश मिश्रा,बजरंग दलाचे विदर्भ प्रांतचे संयोजक नवीन जैन ,अमोल ठाकरे,प्रसार प्रमुख निरंजन रिसालदार यांनी केली.आम्ही कोणत्याही कुराणाची आयते वगैरे जाळली नाही तर केवळ औरंगजेबच्या पुतळ्याभोवती हिरवे कापड गुंडाळले होते,त्यांना हिंसाचार करण्याची संधी हवी होती असा सरळ आरोप करीत, औरंगजेबी जिहादी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर हिंसाचार करीत असताना पोलिस प्रशासनाने त्वरित कारवाई केली नसल्याचा आरोप ही त्यांनी याप्रसंगी केला.पुरेसा पोलिस बंदोबस्त दंगलीच्या ठिकाणी नव्हता व पोलिसांनी हा विषय फार हलक्यात घेतला असल्याचा आरोप त्यांनी केला.संपत्तीची झालेली जाळपोळ याची संपूर्ण भरपाई जिहादींकडूनच घ्यावी अशी मागणी करीत,या पूर्व नियोजित हिंसाचारात सहयोगी असणा-यांवर देशविघातक कृत्याची कलम लावावी व त्यांना जामीन मिळणार नाही याची तसदी घ्यावी,अशी मागणी त्यांनी केली.
पोलिसांनी काढला रूट मार्च-
महालातील कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दी अंतर्गत शिवाजी पुतळा, गांधी गेट येथून पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांच्या नेतृत्वात मंगळवारी सायंकाळी ६:५० वाजता रूट मार्च काढण्यात आला. रूट मार्च शिवाजी पुतळा-चिटणीस पार्क चौक-भालदारपुरा चौक-अग्रसेन चौक-सेवासदन चौक-गीतांजली टॉकीज चौक-हंसापुरी रोड (बंडू क्लिनिक ते भगवाघर चौक) असा फिरला.
या भागात संचारबंदी-
महाल,हंसपुरा,भागदलपुरा,सक्करदरा,नंदनवन,इमामवाडा,यशोधरा नगर,कपीलनगर,पाचपावली,लकडगंज
(बातमीशी संबंधित व्हिडीयो Sattadheesh official youtube वर उपलब्ध
……………………………………………..
तळटीप:-
विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाने छत्रपती संभाजी महाराजांच्या छळावरुन ज्या औरंगजेबची कबर महाराष्ट्राच्या पुण्यभूमीतून उखडून टाकण्याची मागणी करीत, संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलनाचे रण पेटवले आहे तेच, छत्रपती शिवराया व छत्रपती संभाजी यांचे प्रशंसक मावळे नागपूरात ज्या प्रशांत कोरटकर नावाच्या महाभागाने या छत्रपतींचा अवमान करण्याचे अशलाघ्य कृत्य केले त्या कोरटकर याचा साधा निषेध करणारे एखादे पत्रक देखील काढले नाही….!)
Advertisements

Advertisements

Advertisements
