
मुंबईतील फिल्म इंडस्ट्री कुठेही जाऊ शकत नाही
नागपूरात माध्यमकर्मींसोबत सादला मनमोकळा संवाद
नागपूर,ता. ३१ ऑक्टोबर : प्रत्येक पाल्याचा पहीला शिक्षक हे पालक असतात आणि घरीच पाल्यांवर संस्कार घडत असतात,त्यामुळे अशी वेळ कोणावरही येऊ नये जशी आर्यन खानवर आली,शाहरुखच्या मुलाला घरात योग्य शिक्षण मिळाले नसल्याचे स्पष्ट मत सुप्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक पहलाच निहलनी यांनी व्यक्त केले.ते हॉटेल सेंटर पॉईंट येथे एका खासगी कार्यक्रमानिमित्त आज नागपूरात आले होते,याप्रसंगी त्यांनी माध्यमकर्मींशी मनमोकळा संवाद साधला.
आपल्या बेबाक वक्तव्यासाठी प्रसिद्ध असणारे पहलाज निहलानी यांनी आज देखील प्रत्येक विषयावर मनमाेकळी उत्तरे दिली.याप्रसंगी बोलताना ते म्हणाले , चित्रपटसृष्टित इतर ही अनेक मुले आहेत जे याच गुन्ह्यासाठी आतमध्ये आहे मात्र माध्यमात फक्त शाहरुख खान यांच्याच मुलाची चर्चा आहे.शाहरुख खानच्या मुलाने चूक केली की नाही केली,त्याला अम्ली पदार्थाच्या सेवनासंबधी गुन्ह्यात फसवले गेले आहे का,हे दोन्ही वेगवेगळे विषय आहेत त्यामुळे यावर मी काहीच बोलणार नाही मात्र कोणत्याही मुलांवर घरीच योग्य शिक्षण व संस्कार घडणे महत्वाचे आहे,आर्यन खानला योग्य शिक्षण घरीच न मिळाल्यामुळे, त्याच्यासोबत हे घडले,असे म्हणतात ‘संग का रंग लगता है’त्यामुळेच आर्यन खानवर लहानपणापासून असा रंग चढला असावा, त्यामुळे त्याला हे दिवस बघावे लागले,दिवाळीपूर्वीच त्यांच्या मूलगा घरी आला आहे, त्यामुळे त्यांना ही एक अद्दल मिळाली कि आपापल्या मुलांना सांभाळून ठेवणे कसे गरजेचे आहे!
आपल्या चित्रपट निर्मितीबाबत भरभरुन बोलताना त्यांनी सांगितले,की २५ चित्रपटांची निर्मिती केल्यावरही मी वेगवेगळे विषय हाताळण्याचा प्रयत्न केला .जगासमाेर मी माझे सामाजिक दायित्वं मांडण्याचा प्रयत्न केला. २९ वर्ष मी या चित्रपटसृष्टिला दिले आहेत, एक शिस्त व एक सुयोग्य व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केला.चित्रपट महामंडळाचा अध्यक्ष ही राहीलो.एक महत्वपूर्ण जवाबदारी निभवली.व्हिडीयो पायरसीच्या प्रश्नावर लढलो तर मल्टीफ्लॅक्स आणण्यात पुढाकार घेतला.यात भाजप,अटलबिहारी बाजपेयी,गोपीनाथ मुंढे,यशवंत सिन्हा आदी या सर्वांची खूप मदत मिळाली.
आधी अंडरवर्ल्ड माफियाचा पैसा चित्रपटनिर्मितीत लागायचा.भाजप सरकारने चित्रपट निर्मितीसाठी बँकेतून ऋण देण्यास प्रारंभ केले.उद्योग म्हणून त्यामुळे ही चित्रपटसृष्टि ख-या अर्थाने बहरली.आधी ५००-१००० काेटींची फिल्म इंडस्ट्री होती व फक्त ६-७ चित्रपट निर्मित व्हायचे.आज बेबसीरीज पासून ओटीटी सारखे अनेक माध्यम आले कारण बँकेतून आता चित्रपट निर्मितीसाठी कर्ज मिळतंय,असे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रशंसा करीत हे सरकार खूप चांगलं काम करीत असल्याचे प्रशस्तीपत्र ही त्यांनी दिले.करोनाकाळातील त्रासदी देखील त्यांनी तळमळीने व्यक्त केली. सर्व बाबींसाठी पूर्ण दारे उघडली पण चित्रपटसृष्टि तब्बल पावणे दाेन वर्ष बंद होती,त्यामुळेही चित्रपटसृष्टि भयंकर संकटात असल्याचे ते म्हणाले.चित्रपटगृह मालकांची व्यथा ही त्यांनी तळमळीने मांडली.
बॉलिवूडला मंुंबईमधून हटवून उत्तरप्रदेशमध्ये स्थानांतरित करण्याबाबत विचारले असता चित्रपटसृष्टि ही तर जागतिक असल्याचे सांगत लंदनमध्ये खूप सारे स्टूडियोज आहेत आणि तेथील सरकार चित्रपटांसाठी ४० टक्के सबसिडी देते,फिजी या देशात ४५,मॉरिशज ४०,भारतात उत्तर प्रदेशमध्ये २० टक्के,महाराष्ट्र मराठी चित्रपटांसाठी सबसिडी देते,याचा अर्थ हा नाही लंदनमध्ये सर्वात जासत सबसिडी मिळतेय तर बॉलिवूड तिथे निघून जाईल,मुंबईत सर्व स्टूडियोज चित्रीकरणासाठी फूल असतात, तर ५० टक्के वर्कर्स हे तर स्टूडियोच्या अवतीभवतीच राहतात,त्यांना कुठे ही जाण्याची गरज पडत नाही.महाराष्ट्रात दादासाहेब फालके यांनी चित्रपटनगरीचे जे बीज रोवले ‘वो कही हटनेवाला नही’ अश्या शब्दात त्यांनी महाराष्ट्राची बाजू घेतली.
मी अनेक नव्या चेह-यांना आजपर्यंत लाँज केले आहे असे सांगून माझा अगामी चित्रपट‘ अनाडी ईज बॅक’सेंसरसाठी याच आठवड्यात जात आहे.हा चित्रपट जेव्हा रिलीज होईल तेव्हा पुन्हा एकदा ‘नबाव खान ’आणि ‘ऋषिका’ या दोन चेह-यांना मी या चित्रपटात लॉन्च करीत असल्याची माहिती त्यांनी दिली.
भूमिका सिन्हा यांच्या ‘हेलोवीन’ पार्टीचा आनंद तरुणाईने लृटला-
नागपूरात एस.एन.विनाेद यांच्या अनेक कार्यक्रमांसाठी मी नागपूरात यापूर्वीही आलो असल्याचे निहलानी यांनी सांगितले.आज सिन्हा यांच्या तरुण मुलीने भूमिका सिन्हा हिने जी ‘हेलोवीन’पार्टी आयोजित केली ,त्या कार्यक्रमासाठी खास तिच्या या पहील्याच प्रयत्नाला आर्शिवाद देण्यासाठी नागपूरात आलो असल्याचे निहलानी यांनी सांगितले.याप्रसंगी त्यांनी त्यांच्या अगामी ‘अनाडी ईज बॅक‘चित्रपटातील दोन नवीन चेहरे ऋषिका व नवाब खान यांना या पार्टीत इन्ट्रोड्यूज केले.
शहरात पहील्यांदाज आयोजित करण्यात आलेल्या हेलोवीन पार्टीचा तरुणाईने मनसोक्त आनंद लृटला.आजच्या पार्टीची थीम ही ‘हॉरर’असल्यामुळे तरुणाईने मुलुखावेगळी वेषभूषा करुन कार्यक्रम स्थळ गाठले.याप्रसंगी सुप्रसिद्ध गायक आलमगिर खान याने देखील चांगलाच माहोल केला.प्रसिद्धी माध्यमांसोबत बोलताना त्याने जगभरात लोकप्रिय झालेले त्यांचे ‘मौका..मौका’हे जिंगल ही ऐकवले.




आमचे चॅनल subscribe करा
