फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeब्रेकिंग न्यूजशासकीय विज्ञान संस्थेच्या विद्यार्थ्यांना डॉ. मार्डीकर यांचे योगा, प्राणायाम प्रशिक्षण

शासकीय विज्ञान संस्थेच्या विद्यार्थ्यांना डॉ. मार्डीकर यांचे योगा, प्राणायाम प्रशिक्षण

Advertisements

 

नागपूर,ता.५ एप्रिल २०२२: नुकतेच दिनांक २८ ते ३१ मार्च दरम्यान  व्याघ्र प्रकल्प कोलीतमारा पेंच येथे रासेयो शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना सकाळी साडेपाच वाजता प्राध्यापक डॉक्टर माधवी मार्डीकर यांनी योगा त्याचप्रमाणे एरोबिक्सचे प्रशिक्षण दिले.

योग व योगासन करून घेण्यापूर्वी डॉक्टर माधवी मार्डीकर यांनी योगाचे महत्त्व सांगितले. त्याच प्रमाणे विद्यार्थ्यांकडून आसन करून घेत त्याचे विविध फायदे ही विशद केले. मंत्रासह सूर्यनमस्कार ही करून घेतले व दुसऱ्या दिवशी एरोबिक्सचे प्रशिक्षण दिले. .

एरोबिक्स किंवा योग हे आपापल्या पद्धतीने वेगवेगळे व्यायाम प्रकार आहेत.योग यामध्ये फ्लेक्झिबिलिटी, चपळता आणि शरीराची तंदुरुस्ती होत असते.

प्राध्यापक माधवी मार्डीकर यांनी या प्रसंगी विद्यार्थ्यांकडून प्राणायाम ही करून घेतले ,प्राणायामाचे फायदे सांगताना त्यांनी सांगितले की लंग कॅपॅसिटी म्हणजे या व्यायामामुळे फुफ्फुसांची क्षमता वाढते, फुफ्फुसे मजबुत होतात. प्राणायामामुळे इंटेन्स टाईन किंवा शरीरातील आतील सर्व अवयवांचे मजबुतीकरण होतं. प्राणायाम मध्ये ब्रामरी प्राणायामाचे महत्व विशद करीत, कॉन्सन्ट्रेशन साठी ‘ओमकार’ तुमच्या ब्रेन सेल्ससाठी कश्‍याप्रकारे प्रभावी ठरतं याची माहीती विद्यार्थ्यांना दिली. शीतली आणि शीतकारी प्राणायाम घशासाठी त्यांनी करून घेतले.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या