फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeक्राइमशासकीय विज्ञान संस्था नागपूरचे संकेतस्थळ ‘हॅक’

शासकीय विज्ञान संस्था नागपूरचे संकेतस्थळ ‘हॅक’

Advertisements

नागपूर,ता.१२ जून २०२२: महाराष्ट्राच्या उपराजधानीचे शहर नागपूरातील एका हॅरिटेज इमारतीतील नामांकित महाविद्यालय असणारे शासकीय विज्ञान संस्थेची वेबसाईटच मलेशियातील कट्टरपंथियांकडून हॅक झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यावर वादग्रस्त संदेश झळकत आहे. त्यात ‘आम्ही शांत बसणार नाही’, असा इशारा देण्यात आला आहे.

“भाजप नेत्या नुपूर शर्मा यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा हा परिणाम आहे. भारतातील सर्व घडामोडींवर आमचे लक्ष आहे. सध्या वादग्रस्त वक्तव्यावर माफी मागितली जात असली तरी त्याला अर्थ नाही.” असे संकेतस्थळावरील संदेशात नमूद आहे.

या महाविद्यालयातील एका माजी विद्यार्थ्याच्या बहीणीने शैक्षणिक संदर्भात आपल्या भावाला या महाविद्यालयाच्या वेबसाईटरवर एक शैक्षणिक माहिती शोधण्यास सांगितले असता रात्री ८.३० वाजताच्या दरम्यान या विद्यार्थ्याला या वेबसाईटवर कट्टरपंथियांचा धमकीवजा हा संदेश दिसला.

हा संदेश वाचून यामागील गांर्भीर्य लक्षात घेऊन या माजी विद्यार्थ्याने त्याच्या फेसबूकवर तो संदेश पोस्ट केला.नेमकी नागपूर शहरात आपल्याच महाविद्यालयाची वेबसाईट हॅक कशी काय करण्यात आली,याचा मागोवा घेतला असता, हे महाविद्यालय हॅरिटेज इमारतीत असल्याने सोशल मिडीयावरही यासंबधीची माहिती सहज उपलब्ध असल्याचे त्याच्या लक्षात आले.

महाविद्यालयाच्या संचालिका डॉ.अंजली रहाटगांवकर यांनी या संबंधीची तक्रार नागपूर पोलिसांच्या सायबर सेलला केली असल्याचे सांगितले जात आहे.रात्री उशिरापर्यंत महाविद्यालयासमोर सुरक्षाही पुरविण्यात आली नसल्याची माहिती समोर आली आहे.

 

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या