फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजशहर मेें चर्चा है.....

शहर मेें चर्चा है…..

Advertisements

शहर मेें चर्चा है…..

डॉ.ममता खांडेकर

[ Senior Journalist]

नागपूर: हरियाणासोबतच महाराष्ट्रातील निवडणूकाही जाहीर झाल्या. निवडणूक आयोगाने तारखा जाहीर केल्या. आचार संहितेचा टप्पा सुरु झाला. नुकतेच सोमवार दि.२१ ऑक्टोबर रोजी मतदान ही पार पडले आता प्रतिक्षा आहे ती निकालाची. उद्या गुरुवार दि.२४ ऑक्टोबर रोजी सकाळपासून नागपूरातील सहा ही विधान सभा मतदारसंघातील मतमोजणीच्या फेऱ्या सुरु होईल मात्र ईव्हीएम बॉक्समधून काय बाहेर पडणार आहे याचा तनाव उमेदवारांना तर उत्सूकता मतदारांना आहे. स्वत:मुख्यमंत्री देवेेंद्र फडणवीस उद्या सायंकाळी त्यांच्या होम टाऊनमध्ये दाखल होतात आहे.

सहा मतदार संघापैकी मुख्यमंत्र्यांच्या दक्षिण-पश्‍चिम मतदार संघात एकूण १,९१,५३१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या मतदार संघात त्यांची लढत काँग्रेसचे आशिष देशमुख तर अपक्ष् प्रशांत पवार यांच्याशी आहे. हा उच्च वर्णीय मतदारांचा गड समजला जातो, मात्र हा वर्ग मतदानासाठी बाहेरच पडला नसल्याची शहरात चर्चा आहे. ‘नोटा’दाबण्याचा निर्णय ऐन वेळी स्थगित करण्यात आल्यामुळे मोठ्या प्रमाणात भाजपचा या मतदार संघातील परंपरागत मतदार बाहेर न पडल्याचे सांगितले जाते. मुख्यमंत्री यांच्या मतदारसंघात फक्त ४९.८७ टक्के मतदान झाले असून या वर्गाने नोटा जरी दाबला असता तरी मतदानाची टक्केवारी ही वाढली असती. मतदानाचा टक्का घसरला याचा अर्थ मतदार या सरकारवर नाराज आहे हे स्पष्ट झाले,असे अपक्ष् उमेदवार प्रशांत पवार म्हणतात,तर आशिष देशमुख हे आपल्या विजयाप्रती आश्‍वस्त असल्याचे सांगतात.

पूर्वमध्ये भाजप आमदार कृष्णा खोपडे हे चांगल्या मताधिक्याने विजयी होणार असल्याची चर्चा आहे. त्यांच्या विरोधात काँग्रेसचे उमदेवार पुरुषोत्तम हजारे हे रिंगणात आहे. हजारे यांच्या मागे माजी आमदार सतीश चर्तुवेदी यांनी संपूर्ण जोर लावला असला तरी कृष्णा खोपडे यांची प्रतिमा मतदारांमध्ये चांगली आहे. त्यांनी केलेली विकास कामे हे पूर्वच्या मतदारांना दिसत असल्याने त्यांनी पुन्हा एकदा खोपडे यांनाच या मतदार संघाचे प्रतिनिधित्व करु देण्याचा मानस ईव्हीएम मशीनवर कमळचे बटन दाबून व्यक्त केला असल्याचे सांगितले जाते. त्यांच्या आणि हजारे यांच्या मतांमध्ये किती हजार मतांचा फरक असणार फक्त याचीच चर्चा आज पूर्वमध्ये सुरु होती. या मतदार संघात १,९८,२०९ मते पडली असून मतदानाची टक्केवारी ५३.३३ एवढी आहे. ही वाढीव मते कमळलाच गेल्याचे खात्रीने खोपडेंचे समर्थक सांगतात. मात्र या मतदार संघातील शिवसेनेचे पाठबळ हे चतुर्वेदी यांच्या मागे उभे झाल्याची चर्चा असलयाने खोपडे हे आपले जुने मताधिक्य गाठु शकणे शक्य नसल्याचेही सांगितले जातेय.

पश्‍चिममध्ये निश्‍चितच भाजपसाठी चिंतेचे कारण आहे. पुन्हा एकदा सवर्ण वर्गाला डावलून मराठा वर्गालाच तिकीट देण्यात आल्याची कुजबुज येथील सवर्ण मतदारांमध्ये आधीच पोहोचली. त्यात ‘नोटा’चा पर्याय निवडण्याची या वर्गाची मानसिकता असल्याने नोटाचाही उपयोग याच मतदार संघात जास्त झाल्याचा अंदाज व्यक्त केला जातो. भाजपतर्फे पुन्हा तिसऱ्यांदा सुधाकर देशमुख यांना उमेदवारी देण्यात आल्याची नाराजी उमेदवारी यादी प्रसिद्ध झाल्याबरोबरच उघड झाली होती. या मतदार संघात काँग्रेसचे हेव्हीवेट नेते विकास ठाकरे हे समोर उभे असताना, अकार्यक्षम आमदार म्हणून ठपका असणारे सुधाकर देशमुख यांनाच फक्त जातीच्या दबाबाखाली गडकरी यांच्या मताला न जुमानता देण्यात आलेली उमेदवारी ही अनेकांना रुचली नाही. विकास ठाकरे यांनी या मतदारसंघात पूर्ण जाेर लावला असून उद्या ईव्हीएम मशीन मधून निघणारा निकाल हा भाजपसाठी धक्कादायक ही ठरु शकतो असे म्हटल्या जात आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे या मतदार संघात भाजपच्याच एका नगरसेवकाने छूप्या पद्धतीने विकास ठाकरे यांना मदत केल्याची चर्चा आज कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच रंगली होती. या मतदारसंघात एकूण १,७८,३१३ मतदारांनी उमेदवारांचे भाग्य ईव्हीएममध्ये बंद केले तर मतदानाची टक्केवारी ही फक्त ४९.२२ एवढीच होती.

मुख्यमंत्री यांच्या दक्षिणपश्‍चिम तसेच सुधाकर देशमुख यांच्या पश्‍चिम या दोन्ही मतदार संघात भाजपचा परंपरागत सर्वण मतदार हा मतदानासाठी बाहेरच पडला नसल्याची चर्चा आहे ज्याचा फटका मतदानाची टक्केवारी लक्ष् णीयरित्या घसरण्यात झाल्याचे दिसून पडते. प्लास्टीक बंदी हा आणखी एक विषय या मतदार संघात दिसून पडला. अनेक व्यापारी वर्गाने विकास ठाकरे यांना मत दिल्याचे सांगितले. प्लास्टिक बंदीमुळे धंधाचे खूप नुकसान झाले असून भाजपला मत दिले नसल्याचे बेधडकपणे त्यांनी सांगितले.गोपालदास अग्रवाल यांच्या भाजपामध्ये प्रवेशानंतरच विकास ठाकरे हे देखील भाजपमध्ये प्रवेश घेणार असल्याची चर्चा होती मात्र ठाकरे यांनी १५ पेक्ष्ा जास्त नगरसेवकांसाठी भाजपकडे अट ठेवली असल्याने चर्चा फिस्कटली,अशी देखील चर्चा खास कार्यकर्त्यांपर्यंत व्हायरल झाली असल्याची माहिती आहे.

दक्षिण चा गड हे भाजप उमेदवार मोहन मते हेच सर करतील अशी चर्चा रंगली आहे. त्यांच्या विरोधात काँग्रेसचे गिरीश पांडव हे चांगली लढत देत असले तरी मते यांच्या नावातच ‘करिष्मा’ असल्याचे त्यांचे मतदार सांगतात. याच मतदार संघात सर्वाधिक बंडखोरी झाली असून अपक्ष् प्रमोद मानमोडे यांनी दोन वर्षांपासूनच या मतदार संघात जोर लावला होता मात्र तरी देखील त्यांची पूर्वीची ‘प्रतिमा’ आड आली. याच कारणाने काँग्रेसचे तिकीट त्यांना मिळू शकले नाही तर या मतदार संघातील ५०-५५ च्या वर वय असणारे मतदार यांनी मानमोडे यांची पूर्वीची प्रतिमाच मलीन असल्याकारणाने त्यांना मत दिले नसल्याचे सांगितले जाते, फक्त ‘जाहीराबाजीला भूलणारा आजचा डिजिटल युगातला मतदार नसल्याने त्यांची चांगलीच अडचण झाली आहे. रोजगाराच्या बाबतीत त्यांनी केलेले दावे किती फसवे आहेत याची चर्चा गुप्तपणे त्यांचेच कर्मचारी करत असल्याचे सांगितले जाते. सतीश होले किवा कुमेरिया हे बंडखोर अपक्ष् उमदेवार विजयी गणितापर्यंत पोहोचण्यास सक्ष् म नसल्याची चर्चा आहे. फक्त काही शे मतेच ते घेऊ शकतील असे म्हटले जाते. अर्थात किशोर कुमेरिया यांच्यामागे शिवसेनेचे कार्यकर्ते यांनी चांगले बळ लावले. मते यांच्या मागे मोठा ताजबाग तसेच चंदन नगर येथील मतदार देखील उभा झाल्याची चर्चा आहे. हा भाग परंपरांगत भाजप मतदारांचा नसला तरी मते यांची प्रतिमा बघून या भागातील मतदारांनी मते यांना मत दिले असल्याची खात्रीलायक माहिती आहे. अक्ष् र शहा रद्दी विकणारा मुस्लिम मतदार हा देखील मते यांना मत देऊन आल्याचे उघडपणे सांगतोय. या मतदार संघात १,९२,३१४ मते पडली असून या मतदारा संघाची टक्केवारी ५०.३० एवढी आहे.

उत्तरमध्ये भाजपचे उमदेवार डॉ.मिलिंद माने हे सीट काढतील अशी शक्यता आहे. उत्तरमध्ये काँग्रेसचे नितीन राऊत यांनी पूर्ण जोर लावला असला तरी कुठेतरी उमेदवारांची प्रतिमा, त्यांचा पूर्व इतिहास हा मतदार मतदान करताना लक्ष्ात ठेवतो असे घडले आहे. या मतदार संघात १,९५,२३८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून यातील किती मते बसपाचे सुरेश साखरे यांनी आपल्याकडे खेचले आहे यावर डॉ.मानेंचे मताधिक्य निर्भर असणार आहे.

मध्य मध्ये भाजप आमदार विकास कुंभारे यांचे परंपरांगत हलबा मतदार मात्र एकत्र आले असून या मतदार संघातून ते २० हजारांच्या लीडने कुंभारे विजयी होणार असल्याचा विश्‍वास त्यांच्या कार्यकर्त्यांना आहे. काँग्रेसचे उमेदवार बंटी शेळके यांनी चांगली लढाई दिली असली तरी त्यांचे आंदोलन हे मतांमध्ये परिवर्तित करायला त्यांना आणखी मेहनत घ्यावी लागणार असल्याचे या मतदार संघातील काही मतदार सांगतात. या मतदार संघात मुस्लिम मतांची लक्ष् णीय संख्या असल्याने एमआयएमचा देखील प्रभाव मतांवर पडल्या असल्याचे बोलले जात आहे. या मतदार संघात एकूण १,६४,१६६ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असून मतदानाची टक्केवारी ही ५०.६४ एवढी होती.

एकूण २०१४ सारखा भारतीय जनता पक्ष्ाला याही वेळी नागपूरात क्लिीन स्वीप मिळतो का? असे तर्क-विर्तक दिवसभर लढवले गेले. ५-१ अशी खात्रीलायक संख्या ही मोठ्या प्रमाणात दिवस भर चर्चिली गेली. भाजप ५ तर काँग्रेस १ अशी जर ही संख्या असेल तर १ हा आकडा कुठला? विकास ठाकरे की नितीन राऊत?याबात मात्र संभ्रम व्यक्त केला जातोय.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या