

नागपूर: काँग्रेसची बहुप्रतिक्षित दुसरी यादी जाहीर झाल्यानंतर शहरअध्यक्ष विकास ठाकरे यांनी गुरुवारी शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. पश्चिम मतदार संघातून त्यांची लढत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सुधाकर देशमुख यांच्याशी होणार आहे.
बुधवारी रात्री उशिरा मध्य व पूर्व मतदारसंघाचे उमेदवार काँग्रेसनी घोषित केले. विकास ठाकरे यांच्यासोबतच दक्षिण मधून गिरीश पांडव तर मध्य मधून बंटी शेळके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. गिरीश पांडव यांची लढत भाजपचे उमेदवार मोहन मते यांच्याशी तर ऋषिकेश उर्फ बंटी शेळके यांची लढत भाजपचे विद्यमान आमदार विकास कुंभारे यांच्याशी होणार.
विकास ठाकरे यांच्या रॅलीत माजी खासदार विलास मुत्तेमवार,विशाल मुत्तेमवार,अनंतराव घारड,बबनराव तायवाडे उपस्थित होते मात्र उत्तर नागपूरचे काँग्रेस उमेदवार नितीन राऊत उपस्थित नव्हते. या शिवाय पक्षातून निलंबन वापस झालेले दिग्गज नेते व माजी आमदार सतीश चतुर्वेदी व अनिस अहमद अनुपस्थित होते.
गटा-तटाच्या राजकारणात विखुरलेल्या काँग्रेसला मात्र अद्यापही विजयाची अपेक्षा आहे.
फडणवीस सरकारने राज्याचा विकास नं करता स्वतःचा विकास केल्याचा आरोप विकास ठाकरे यांनी माध्यमांकडे व्यक्त केला तर बंटी शेळके यांनी उत्तर नागपूरचे भाजप उमेदवार यांच्या फक्त नावातच ‘विकास’ असल्याची टीका केली. गिरीश पांडव यांनी दक्षिण क्षेत्राला पुन्हा सुजलाम सुफलाम करील असे सांगितले.




आमचे चॅनल subscribe करा
