

भिक्ष्ेकरी व खासगी रुग्णालयातील रुग्णाचा समावेश: बाधितांचा आकडा ५१४ वर
नागपूर, ता. ३० मे: सेंटर एव्हेन्यू रोडवरील गांधी चौकात एका आठवडाभरापुर्वी बेशुद्धावस्थेत असलेल्या एका भिक्षेकऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे मेयोतील प्रयोगशाळेतून आलेल्या अहवालातून स्पष्ट झाले होते. शनिवारी दि.३० मे रोजी पहाटे पाच वाजता या भिक्षेकऱ्याचा मेयोच्या कोविड हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. याशिवाय एका खासगी रुग्णालयातून मेडिकलमध्ये हलवण्यात आलेल्या ७३ वर्षीय कोरोनाबाधित वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामुळे शहरात आता कोरोनामुळे एकूण ११ मृत्यूंची नोंद झाली आहे. तर कोरोनाबाधितांचा आकडा ५१४ वर पोहचला आहे.
खासगी रुग्णालयातील रुग्णाला काल शुक्रवारी मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र २४ तासातच हा कोरोनाबाधित दगावला.
२३ मे रोजी ज्या तिघांना कोरोनाची बाधा झाला होती, त्यात या भिक्षेकऱ्याचा समावेश होता. पन्नाशीतील भिक्षेकऱ्याला एका खाकी वर्दीतील पोलिसाने मेयोमध्ये उपचारासाठी आणले होते. दरम्यान त्याला श्वसनाचा आजार असल्याचे आढळून आले. याशिवाय त्याचे पोट फुगले होते, यावेळी उपस्थित डॉ. रणवीर यादव यांनी समयसूचकता दाखवित कोरोना चाचणी करण्यासंदर्भात सूचना केली. यात तो भिक्षेकरी बाधित असल्याचे आढळून आले होते. त्याचा यकृताचाही त्रास वाढला होता. यामुळे दोन दिवसांपुर्वी व्हेंटिलेटवर ठेवण्यात आले होते. शुक्रवारी मध्यरात्रीनंतर उपचाराला प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून आले. आज शनिवारी पहाटे ५ वा. या कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला.
हिंगणा मार्गावरील लोकमान्य नगरातील ७३ वर्षीय वृद्धाला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु त्याला कोरोनाची लक्षणे आढळल्यानतंर नमुने घेण्यात आले होते त्यात तो बाधित असल्याचे उघड झाले. यामुळे त्याला मेडिकलमध्ये हलवले.
एम्समधील प्रयोगशाळेतून राज्य सुरक्षा बलाचा जवान असलेल्या एकाला बाधा झाल्याचा अहवाल पुढे आला. तर इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील प्रयोगशाळेतून पाच जण बाधित आढळले आहे. यात नरखेड येथील दोघांना तर पाचपावली येथील विलगीकरणात केंद्रात असलेल्या एकाला कोरोनाची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले. हा रुग्ण सतरंजीपुरा येथील आहे.
याशिवाय तांडापेठ या नवीन वस्तीमध्ये एकाला कोरोनाची बाधा झाल्यामुळे येथील नागरिकांची चिंता वाढली आहे. नीरीत तपासलेल्या नमुन्यांमध्ये आणखी ६ संशयितांच्या घशातील स्त्रावात कोरोनाचे विषाणू आढळून आले. त्यामुळे आतापर्यंत कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या ५१४ वर पोचली आहे. यांना भानखेडा आणि पाचपावली विलगीकरण कक्षात दाखल करून घेण्यात आले होते. मेयो-मेडिकलमध्ये उपचारासाठी यांना दाखल करण्यात आले आहे.
आता मोमीनपुरा झाला कोरोनाचा हॉटस्पॉट-
नागपुरात कोरोनाचा पहिला हॉटस्पॉट हा सतरंजीपुरा सिद्ध झाला होता. येथे ११९ रुग्ण आढळून आले आहेत. मात्र या हॉटस्पॉटला मागे टाकत मोमीनपुरा कोरोना बाधितांमध्ये नंबर वन झाला आहे. मोमीनपुरा येथे सुमारे २५० कोरोनाबाधित आढळले असल्याचे मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज फेसबूक लाईव्हदरम्यान आकडा सांगितला आहे तर तिसरा हॉटस्पॉट गड्डिगोदाम ठरला असून येथे ३० बाधितांची नोंद झाली आहे. शहरात नाईक तलाव हा चौथा हॉटस्पॉट तयार होत आहे. या ठिकाणी २० पेक्ष्ा जास्त लोकांना कोरोनाची लागण झाली असल्याचे त्यांनी सांगितले.तांडापेठ, नरखेड, गुमगावांतही कोरोनाचे रुग्ण आढळले असल्याचे सांगितले जात आहे.
शहरात आता सुपरस्प्रेडर्स,स्प्रेडर्स व पॉझिटीव्ह अश्या तीन भागातील रुग्णांमुळे कारोनाचा प्रार्दुभाव झाला असून सुपरस्प्रेडर्समुळे १० पेक्ष्ा अधिक, स्प्रेडर्समुळे ५ ते १० दरम्यान व्यक्तिंना कोरोनाची लागण होऊ शकते. शहरातील या दोन्ही कॅटेगिरीच्या स्प्रेर्डसमुळे १४ जणांना लागण झाली असून हा आकडा परिणामी ४७४ बाधितांच्या संख्येपर्यंत पाेहोचला असल्याचा खुलासा मनपा आयुक्तांनी फेसबूक लाईव्ह दरम्यान केला.केला.आज शहरात पॉझिटीव्ह झालेल्यांची संख्या ही ५१४ वर पोहोचली असून नागरिकांनी सामाजिक अंतर पाळणे व मास्क व सेनिटायझरचा उपयोग करणे,हात वारंवार धूणे गरजेचे असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
उद्या चौथा लॉक डाऊनची कालमर्यादा संपल्यानंतर केंद्र व राज्य शासनाच्या सूचनेनुसार निर्णय घेतले जाईल. पाचव्या लॉक डाऊनमध्ये आणखी जास्त शिथिलता दिली जाईल मात्र यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास नागरिकांचेच सहकार्य अपेक्ष्ति असल्याचे ते म्हणाले.




आमचे चॅनल subscribe करा
