फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजशहरात आज २४ जणांना कोरानाची बाधा:बजाजनगरमध्ये कोरोना परतला!

शहरात आज २४ जणांना कोरानाची बाधा:बजाजनगरमध्ये कोरोना परतला!

Advertisements

परिचारिका संसर्गित! एकूण संख्या ५८३ वर: ३८९ कोराेनामुक्त

नागपूर , ता.२ जून: नागपूरात आता व्यक्तिच नव्हे तर कुटुंबेच कोरोनाबाधित होत असल्याचे चिंताजनक चित्र निर्माण होत आहे. दररोज कोरोनाचा उद्रेक बघायला मिळतोय. हावरापेठ असो की, सतरंजीपुरा या भागात अवघे कुटुंब कोरोनाने विळख्यात घेतले आहेत. दर दिवसाला कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या ही लक्ष् णीयरित्या वाढत आहे. सोमवारी २० जणांना बाधा झाल्याचे उघड झाले. तर मंगळवार दि. २ जून रोजी हा आकडा आणखी वाढला असून, शहरात आणखी २४ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे मेयो, मेडिकल, नीरी आणि एम्सच्या प्रयोगशाळेतून पुढे आले.

विशेष असे की, पहिला कोरोनाबाधित ज्या बजाजनगर भागात आढळून आला होता,तब्बल ६१ दिवसांनंतर बजाजनगर पुन्हा कोरोनाच्या नकाशावर आले. कोरोनाबाधित आढळून आलेली परिचारिका एका खासगी रुग्णालयात कार्यरत आहे. या रुग्णालयातील ६६ संशयितांना आता विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. शहरात आता एकूण बाधितांची संख्या ही ५८३ वर पोहोचली आहे.

११ मार्च रोजी बजाजनगर येथून शहरात कोरोनाची लागण सुरू झाली होती. मेयोतील यशस्वी उपचारातून बजाजनगरातील पती-पत्नी दोघेही कोरोनामुक्त झाले. त्यानंतर येथे रुग्ण आढळला नव्हता. मात्र, आता बजाजनगरातील एक परिचारिका जी धंतोलीतील एका रुग्णालयात कार्यरत आहेत ती आज कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले. मागील दोन महिन्यांपासून बजाज नगर येथील नागरिकांनी सुटकेचा श्‍वास घेतला होता मात्र पुन्हा आता त्यांना कोरोनाची दहशत अनुभवायला येईल का? ही भीती अस्वस्थ करुन गेली.
परिचारिकेसह आज आढळून येणा-या नवीन बाधितांमध्ये टिमकी परिसरातील ९ तर, मोमिनपुरा येथील १, नाईक तलाव येथील २ तर लोकमान्य नगरातील २ रहिवासी कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले आहेत. याशिवाय हंसापुरी येथील एकाला बाधा झाल्याचे पुढे आले. महापालिकेतील आणखी दोन कर्मचाऱ्यांसह भानखेड्यातील दोघे बाधित आठळले. हे सर्व आमदार निवास येथील विलगीकरणात होते.

परिचारिका मृतक करोनाबाधिताच्या संपर्कातून संसर्गित!

खासगी रुग्णालयातील बाधित परिचारिका मेडिकलमध्ये काही दिवसांपूर्वी या रुग्णालयातून हलवलेल्या ’कोरोनाबाधित’ वृद्धाच्या संपर्कात आली होती. हा वृद्ध उपचारादरम्यान मेडिकलमध्ये दगावला. त्यानंतर महापालिका प्रशासनाकडून वृद्धाच्या संपर्कात आलेल्या खासगी रुग्णालयातील आरोग्य कर्मचाऱ्याच्या चाचण्या केल्या. त्यात ही परिचारिका बाधित आढळली. यामुळे खासगी रुग्णालयात खळबळ उडाली होती. मात्र, प्रशासनाने तातडीने परिचारिकेला उपचारासाठी मेडिकलमध्ये हलवले. तर ६६ आरोग्य कर्मचाऱ्यांना याच खासगी रुग्णालयात विलगीकरणात ठेवण्यात आले आहे, खबरदारीचे सर्व उपाय या खासगी रुग्णालयात घेण्यात येत असल्याचा दावा रुग्णालय संचालकांनी केला आहे.

नागपूरकर नागरिक कोराेनायोद्धा असणा-या या परिचारिकेची संपूर्णपणे कोरोनावर मात करुन घरी सुखरुप परतण्याची वाट बघत आहे.

आज चार बाधितांची केली कोरोनावर मात-
मागील तीन महिन्यांत कोरोनाबाधितांची एकूण संख्या ५८३ वर पोहोचली असली तरी यापैकी ३८९ रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. तर १७४ कोरोनाबाधित उपराजधानीतील विविध कोविड रुग्णालयात उपचार घेत आहेत. यापैकी मेयो ७२, मेडिकलमध्ये ८२ तर आणि एम्समध्ये २० कोरोनाबाधित दाखल करण्यात आले आहेत.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या