फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजशहरात आज १९ बाधितांची भर:एकूण संख्या ५५९ वर

शहरात आज १९ बाधितांची भर:एकूण संख्या ५५९ वर

Advertisements

समूह संसर्गाची नागपूरातही सुरवात:मुंबईवरुन आलेले नागरिक निघत आहेत बाधित: ३८५ बाधितांनी केली कोरोनावर मात

नागपूर, १ जून: शहरात आज आणखी १९ बाधितांची भर पडली असून शहरातील विविध क्ष्ेत्रातील हे बाधित मुंबईवरुन नागपूरात आले असल्याचे सांगितले जात आहे. काल रविवार दि. ३१ मे रोजी देखील एकूण १९ बाधितांची भर पडली होती.रविवारी शहरातील नंदनवन,सदर व लोकमान्य नगरात कारोना बाधित आढळून आले होते तर आज सोमवारी आढळून आलेले कोरानाबाधित हे मोमिनपुरा,नाईकतलाव,इंदोरा,बांगलादेश, वाठोडा,गोपालनगर व भानखेडा परिसरातील असल्याचे सांगितल्या जात आहे.

शहरात आता बाधितांची संख्या ही ५५९ वर पोहोचली असून आजच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देशात आता समूह संसर्गाचा टप्पा सुरु झाला असल्याचे सांगितले आहे. नागपूरात देखील समूह संसर्गाचेच रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत असून ३१ मे रोजी चौथा लॉक डाऊन संपत असताना राज्याने दिलेल्या अंशत शिथिलतेमुळे देशांतर्गत विमानसेवा तसेच खाजगी वाहनाने आवागमनाला परवानगी दिली होती. मागील आठवड्यात मुंबईवरुन आलेल्या दाेन महिला या कारोना पॉझिटीव्ह आढळ्या होत्या.

त्यांच्या संपर्कात आलेल्यांनाही पाचपावली,सिम्बॉयसिस येथे विलगीकरणात ठेवण्यात आले होते. आज नव्याने १९ लोकांचा अहवाल पॉझिटीव्ह आला त्यात या दोन्ही विलगीकरणातील संशयितांचा देखील समावेश असल्याचे सांगितले जात आहे. बाधितांना मेडीकल व मेया ेरुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मेडीकलच्या प्रयोगशाळेत आज १३ पॉझिटीव्ह अाल्याचा अहवाल प्राप्त झाला. आजच्या बाधितांमध्ये दहेगांव व बुट्टीबोरी येथील बाधितांच्या संपर्कातील देखील संशयित यांचा समावेश आहे.

महानगरपालिकेत आणखी एका बाधिताची भर-
मंगळवार रोजी मनपाच्या आरोग्य विभागातील एका कर्मचा-याला कारोनाची लागण झाली असल्यासे सामाेरे आले होते.त्याला ही लागण आपल्या भावाकडून झाली होती. त्याच्या संपर्कातील आणखी एकाचा अहवाल हा मेडीकलच्या प्रयोगशाळेत आज पॉझिटीव्ह आला असून मनपामधील आरोग्य विभागातील एकूण ३ कर्मचारी पॉझिटीव्ह असल्याचे सांगितले जात आहे.

नागपूरातील न्यू नंदनवन,नरेंद्रनगर परिसर सील-
महापालिकेच्या धंतोली झोनमधील प्रभाग क्र. ३५ मधील अरविंद सोसायटी नरेंद्रनगर व नेहरुनगर झोनमधील प्रभाग क्र.२७ मधील न्यू नंदनवन या परिसरात करोनाबाधित आढळून आल्याने हा परिसर मनपा आयुक्त तुकराम मुंढे यांच्या आदेशान्वये सील करण्यात आला आहे.
न्यू नंदनवन प्रबिबंधित क्ष्ेत्र-
पश्‍चिमेस- गजानन धान्य भांडार
उत्तरेस-प्रियदर्शिनी इंजिनिअरिंग कॉलेज गेट
पूर्वेस-४५४,के.डी.साखरखाटे यांचे घर
दक्ष्णिेस- १३९९,वैद्य यांचे घर

अरविंद सोसायटी नरेंद्रनगर प्रतिबंधित क्ष्ेत्र-
दक्ष्णिपूर्वेस-पडलकर प्लॉट,अरविंद सोसायटी
उत्तरपूर्वेस- जे.के.अपार्टमेंट प्लॉट,अरविंद सोसायटी
दक्ष्णि पश्‍चिमेस-प्रा.अंबादास येळने प्लॉट नं.११,विजयानंद सोसायटी
उत्तर पश्‍चिमेस- अजय भोले प्लॉट क्र.६७,विजयांनद सोसायटी

५ व्या लॉक डाऊनमुळे नागपूरकर हताश……
कोरोनाने ११ मार्च रोजी नागपूरात पहीली दस्तक दिली,हा रोग,या रोगाची लक्ष् णे,या रोगाची माहिती,लागण,संसर्ग,उपाय इ.बाबत जगासारखेच नागपूरकर हे देखील अनभिज्ञ मात्र तेवढेच उत्सूक जाणून घेण्याबाबत होते. डिजिटल युगात माहितीचा ब्लास्ट झाला असल्याने कोरोनाबाबतची माहिती,प्रत्येक घरामोडी,आकडेवारी इ.ची माहिती मोबाईलवर तात्काळ उपलब्ध होऊन जाते. मार्च,एप्रिल व मे च्या मध्यापर्यंत नागपूरकरांनी संयमाने तग धरुन ठेवली.हा विषाणू आपल्या शहरातून हद्दपार होईल,पुन्हा पूर्वीसारखे निर्धास्त जीवन जगता येईल,धार्मिक,सांस्कृतिक,आर्थिक,सामाजिक,भावनिक आणि मानसिक बंधनातून लवकरच मुक्त होऊ ही आशा मे च्या शेवटचा आठवडा येईपर्यंत मात्र मावळत गेली.

आता तर दररोज नवीन क्ष्ेत्रात कोरोनाबाधित आढळत असल्याने नागपूरकर नागरिक हे हताश होऊ लागले आहे. हा संसर्ग आटोक्यात येणार तरी कसा?नेमका केव्हा येणार?व्हाॅट्स ॲपवर आता याचीच चर्चा सुरु असल्याचे दिसून येत असून समूह संसर्गाचा भारताने तिसरा टप्पा गाठला असल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे.तर दूसरीकडे हीच बाब अनेक नागरिक हे ’सकारात्मक दृष्टिकोणातून’ घेत असून,एकदाच काय तो कोरोनाचा प्रादुर्भाव शहरात,राज्यात,देशात होऊन जाऊ द्या,समूह संसर्गात ५० टक्के नागरिकांना तर संसर्गाची कोणतीही लक्ष् णे दिसणार नाही किंवा कोराेनाच्या विषाणूची लागण झाली तरी ज्यांची रोगप्रतिकारशक्ती चांगली आहे त्यांना कोरानाची लागण जाणवणारही नाही असेही वैद्यकीय क्ष्ेत्रातील तज्ज्ञ मंडळीही सांगत आहे.

मात्र २४ मार्चपासून देशात लॉक डाऊनची जी ‘परंपरा’केंद्र राज्य व स्थानिक प्रशासनाने सुरु ठेवली आहे त्याला मात्र सामन्य नागरिक,उद्योजक, व्यापारी,दूकानदार,भाजी विक्रेते,कामगार वर्ग,खासगी व सरकारी नोकरदार वर्ग चांगलाच उबगला असून घरातच बंदिस्त असल्यामुळे आणि अर्थाजणाचे मार्गच संपूर्णत:बंद करण्यात आल्यामुळे हळूहळू त्यांच्यातील मानसिक तनाव अत्यंतिक वाढला असून याचे परिणाम लक्ष् णीयरित्या आता नागरिकांच्या मानसिक आरोग्यावर पडत आहे. विशेष बाब अशी देशात काेरोना बाधितांची बरी होणारी संख्या ही लक्ष् णीय आहे.नागपूरातच ५५९ पैकी ३८५ रुग्णांनी कोरोनावर मात करुन सुखरुप घरचा रस्ता धरला आहे. यात काही महिन्यापासून तर काही वर्षांचे चिमुरडे यांचा ही समावेश आहे. कोरोनावर अद्याप कोणतीही प्रभावी उपाययोजना किवा लस जगाच्या कोणत्याही संशोधकांना शोधता आली नाही.ती जेव्हा सापडेल तेव्हा सापडेल मात्र आता नागरिकांच्याच सारासार विवेकबुद्धिवर ‘कोरानासोबत’कसे जगायचे हा निर्णय प्रशासनाने सोडून देण्याचा आग्रह वाढत आहे.

देशात सप्टेंबरपर्यंत इतके कोटी लोकांना बाधा होईल,देशात वेंटिलेटर नाही,मृतकांची संख्या वाढेल,भारत हा इटली,ब्राजिल,अमेरिका होऊ इच्छित नाही,माध्यमातील अश्‍या बातम्या नागपूरकर नागरिकांनाही हताश करीत असून,एकीकडे देशातील पंतप्रधान यांनीच कोरोनाच्या बाबतीच संपूर्णपणे ‘यू टर्न’कसा घेतला,याची चर्चा देखील सोशल मिडीयावर चांगलीच झडतेय.

लॉक डाऊन सुरु करताना पंतप्रधानांनी ’आपण २१ दिवसात कोरोनावर संपूर्णपणे मात करु’असा आशावाद नागरिकांमध्ये पेरला होता,आता ५ वा लॉक डाऊन घोषित करताना ‘कोरोनासोबतच आपल्याला जगायचे आहे आणि त्याला हरवायचे आहे’असे घोषित केले.परिणामी कोरोनासोबतच जगायचे आहे तर नागरिकांना मुक्त होऊन आता जगू द्या,अशी मागणी होत आहे.

देशांतर्गत प्रवास सुरु केल्याने नागरिक हे आपापल्या घरी,गावात,जिल्ह्यात,शहरात,राज्यात पोहोचणारच आहे.त्यांना आपल्या घरीजाण्यावाचून कोणीही रोखू शकत नाही.मात्र आता नागरिकांनीच खबरदारी घेतल्यास निश्‍चितच कोरोनाचा प्रादुर्भाव लवकरच आटोक्यात येऊ शकेल,असा आशावाद नागपूरकर व्यक्त करीत आहे.

आज चंद्रपूर येथील कोरोनाबाधित नागरिक, हा मुुंबईहून नागपूरला आला होता.येथून तो चंद्रपूरला आपल्या घरी गेला. विमानात बसण्यापूर्वी केलेल्या तपासणीत त्याला कोरोनाची कोणतीही लक्ष् णे दिसली नाही,तरी देखील त्याला कोणाकडून तरी विमानात कोरोनाचा संसर्ग झाला असावा,असे सांगितले जात आहे. बाधित वाढत असले तरी केंद्र,राज्य सरकार किंवा स्थानिक प्रशासन नागरिकांच्या मुक्त प्रवासावर प्रतिबंध, कोरोनाच्या या टप्प्यात आता लादू शकत नाही.

नागरिकांना आता कोरोनासोबतच खबरदारीने जगण्याची सवय जडल्यास नागपूर हा लवकरच ग्रीन झोनमध्ये येऊ शकेल,असा आशावादही व्यक्त केला जात आहे. एका नागरिकाची व्हॉटस ॲपवर मार्मिक प्रतिक्रिया होती ‘ज्यांना घराबाहेर नाही पडायचे ते आताही पडत नाही आहेत, परिणामी ते पुढे ही बाहेर पडणारच नाही,ज्यांना बाहेर पडल्याशिवाय गत्यंतरच नाही त्यांना बाहेर पडावेच लागणार आहे ,कोराेना संक्रमणाचा सामना करावाच लागणार आहे जे ते आजही करतच आहे’.

संपूर्ण जून महिना प्रशासनाने, आणखी एक लॉक डाऊन वाढवला,मात्र प्रशासनाकडे किवा राज्य सरकारकडे लॉक डाऊनशिवाय इतर दूसरा प्रभावी उपायच नसल्याचा संतापही अनेकांनी सोशल मिडीयावर चांगलाच व्यक्त केला.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या