

काल रात्रीचे ५ रुग्ण धरुन दोन दिवसात ११ रुग्ण: १४ महिन्याच्या चिमुकल्यालाही काेरोनाची बाधा
नागपूर,२ मे: नागपूरात भानखेडाजवळील डाेबीनगर या नव्याच भागात आज शनिवार,दि.२ मे राेजी एक कारोना बाधित आढळल्याने प्रशासनासोबतच नागपूरकरांची चिंता ही देखील वाढली आहे.याशिवाय व्हीएनआयटी येथे विलगीकरण कक्ष्ात ठेवण्यात आलेल्या सतरंजीपुरा येथील ५ संशयितांचा चाचणी अहवाल हा पॉझिटीव्ह आल्यामुळे शहरात आज ६ बाधितांची भर पडली आहे.
काल शुक्रवार दि. १ मे राेजी वरुड येथील ४५ वर्षीय महिला कोरोना बाधित असल्याचे चाचणीमध्ये कळले.रात्री उशिरा तिला मेडीकलमध्ये दाखल करण्यात आले होते. कोरोनाची लक्ष् णे असल्यामुळे ही चाचणी घेण्यात आली होती. यासोबतच इतर ४ संशयितांचा चाचणी अहवाल हा देखील पॉझिटीव्ह आल्यामुळे काल शहरात ५ रुग्णांची भर पडली होती. आज शनिवारी आणखी ६ संशयितांचे अहवाल पॉझिटीव्ह आल्यामुळे आता शहरात कोरोना बाधितांची संख्या ही १५२ झाली आहे.
दूर्देवी बाब म्हणजे,आज बाधितांमध्ये १४ महिन्याचा एक चिमुरडा याचा देखील समावेश आहे. काल पासून ८ महिला, २ पुरुष व एका १४ महिन्याच्या चिमुरड्यांचा समावेश कोरोना बाधितांमध्ये झाला आहे. ३ बाधितांना मेडीकलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
मेडीकलमधील वॉड क्रमांक २५ मध्ये आतापर्यंत ७७ रुग्णांवर उपचार करण्यात येत असून यातील २५ रुग्णांना सुटी देण्यात आली आहे. ५२ रुग्णांवर उपचार सुरु असून आज ३ नवीन रुग्णांची आज यात भर पडली.यात ६४ वर्षीय महिलेचा समावेश आहे. ३० एप्रिल रोजी तिला मेडीकलमध्ये भरती करण्यात आले होते. दूसरी रुग्ण ही ६० वर्षीय महिला असून त्यांना १ मे रोजी भरती करण्यात आले होते. तर तिसरी महिला ही ३० वर्षीय असून तिला आज २ मे रोजी मेडीकलमध्ये दाखल करण्यात आले आहे.या तिन्ही महिला सतरंजीपुराशी संबधित असून व्हीएनआयटीमध्ये विलगीकरणात यांना ठेवण्यात आले होते.या तिन्ही महिलांची कोरोना चाचणी एम्समध्ये करण्यात आली.




आमचे चॅनल subscribe करा
