फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजशहरातील सात झोनला आता एका दिवसाआड पाणी पुरवठा: पिंटू झलके

शहरातील सात झोनला आता एका दिवसाआड पाणी पुरवठा: पिंटू झलके

Advertisements


पेंचची २३०० व्यासाची पाईप लाईन मोठ्या प्रमाणात लीकेज

नागपूर,ता. १ जानेवरी: शहराला पाणी पुरवठा करणा-या पेंचच्या पाईप लाईनमध्ये जवळपास २३०० व्यासाच्या पाईप लाईनला मोठे लीकेज झाल्याचे काल भगवान मेंढे,दीपराज पार्डीकर तसेच आधिका-यांसोबत काल पाहणी केली असता ते लीकेज आमच्या लक्ष्ात आले,येत्या उन्हाळ्यात पाण्याची एकूण परिस्थिती लक्ष्ात घेता हे लीकेज तात्काळ दुरुस्त करणे अतिशय महत्वाचे आहे,त्यामुळे नागपूर शहरातील ज्या पाच ते सहा झोनमध्ये पेंजमधून पाणी पुरवठा केला जातो त्या सर्व झोनला आता ६ जानेवरीपासून एक महिना, एका दिवसाआड पाणी पुरवठा केला जाईल,अशी माहिती जलप्रदाय समितीचे तसेच स्थायी समितीचे अध्यक्ष् पिंटू झलके यांनी आज मनपा मुख्यालयात आयोजित पत्र परिषदेत दिली.

याप्रसंगी बोलताना त्यांनी सांगितले की ईडगाव तसेच करमगाव या दोन गावांच्या मधील २७ किलोमीटर लांबीच्या पाईपलाईनच्या मधात मोठ्या प्रमाणात लीकेज आढळले. हे लीकेज पाहील्यानंतर सर्वांनी चर्चा करुन तातडीने लीकेज दुरुस्तीचा निर्णय घेण्यात आल्याचे ते म्हणाले. या लिकेजची पाहणी करता साधारणत:दररोज चार ते पाच एमएलडी पाण्याची नासाडी होत असल्याचे लक्ष्ात आले.पाण्याची ही खूप मोठी नासाडी असल्याचे त्यांनी सांगितले. २३०० व्यासाची पाईपलाईन म्हणजे एखादी कार त्या पाईपमधून सहज जाऊ शकते एवढा मोठा व्यास असतो.त्यामुळे ती पाईप लाईन दुरुस्त करण्यासाठी कालावधी ही तेवढाच जास्त लागणार आहे. शहराच्या भविष्याच्या दृष्टिने हा निर्णय जरी आज कठोर वाटत असला तरी येणारा उन्हाळा बघता शहराला सुचारु पद्धतीने पाणी पुरवठा व्हावा,यासाठी हा निर्णय घेणे अत्यावश्‍यक असल्याचे सांगितले.

आतापर्यंत पाटबंधारे विभागाला आम्ही या लीकेजबाबत अनेकदा तक्रार केली मात्र यावेळी हे लीकेज फार मोठ्या प्रमाणात असल्यामुळे पाटबंधारे विभागाने आमची मागणी मान्य केल्याचे त्यांनी सांगितले .पेंच जलाशयातून शहरातील जवळपास ६५ टक्के भागात पाणी पुरवठा होतो,या सर्व भागाला आता एक महिना एका दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येईल.यावेळी पिंटू झलके यांनी नागरिकांना आवाहन करताना शहरातील नागरिकांनी पाण्याचा योग्य वापर करावा तसेच योग्य संग्रह करुन पाणी वापरण्याचे आवाहन केले.

या झोनला होणार आता एक दिवसा आड पाणी पुरवठा-
झोन क्र.१,२,३,४,६,७ चा काही भाग झोन क्र ९ चा काही भाग आणि झोन क्र.१० पूर्ण

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या