फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजशनिवारी मनपा केन्द्रांमध्ये कोव्हीशिल्डचे लसीकरण नाही

शनिवारी मनपा केन्द्रांमध्ये कोव्हीशिल्डचे लसीकरण नाही

Advertisements

नागपूर, ता. ९ : शासनाकडून नागपूर महानगरपालिकेला कोव्हीशिल्ड लसीचा पर्याप्त पुरवठा उपलब्ध न झाल्यामुळे मनपाच्या सर्व लसीकरण केन्द्रांवर शनिवारी (१० जुलै) रोजी कोणत्याही वयोगटातील नागरिकांचे लसीकरण होणार नाही, ही माहिती अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिली.

१८ वर्षावरील व ४५ वर्षावरील नागरिकांसाठी कोव्हॅक्सीन लसीचा पहिला व दूसरा डोज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडीकल कॉलेज), बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे सभागृह, सिद्धार्थ नगर, आशिनगर झोन च्या मागे (डॉ बाबासाहेब आंबेडकर रूग्णालय) व स्व.प्रभाकर दटके म.न.पा.महाल रोग निदान केन्द्र येथे उपलब्ध आहे.

नागपूरात लसीकरणाची अद्यावत स्थिती (८ जुलै २०२१)

पहिला डोज :-
आरोग्य सेवक – ४६४००
फ्रंट लाईन वर्कर – ५३३४४
१८ + वयोगट – १९४३५१
४५ + वयोगट – १५८११७
४५ + कोमार्बिड – 86911
६० + सर्व नागरिक – १८६९२२
पहिला डोज – एकूण : – ७२६०४५

दूसरा डोज :-
आरोग्य सेवक – २५९८४
फ्रंट लाईन वर्कर – २४०७१
१८ + वयोगट – ९४१५
४५ + वयोगट – ७७६७९
४५ + कोमार्बिड – २४०२५
६० + सर्व नागरिक – १००८०९
दूसरा डोज – एकूण – २६१९८३

………………………..

संपूर्ण लसीकरण एकूण : – ९,८८,०२८

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या