

मरकजच्या संपर्कातील रुग्ण: दोन मेडीकल दोन मेयोमध्ये केले दाखल
नागपूर: ‘करोना’ हा विषाणू आता सर्वसामान्यांच्या सहनशीलतेच्या पलीकडे पोहोचला आहे,या विषाणूमूळे जगभरातील कोट्यावधी माणसे ही आपापल्या घरात,अनोळखी शहरात अडकली असून नागपूरातील नागरिक देखील या विषाणूच्या प्रार्दुभावमुळे, पंतप्रधानांनी घोषित केलेल्या पहील्या लॉक डाऊनमध्ये १९ दिवस तर २.० च्या लॉक डाऊनमध्ये म्हणजे ३ मे पर्यंत म्हणजे तब्बल १८ दिवस लॉक डाऊन भोगत आहे. देशभरात संसर्गितांची संख्या ही लक्ष् णीय असताना नागपूरात देखील या विषाणूने बाधित झालेल्यांची संख्या ही आता ६३ वर पोहोचली आहे.
शनिवारी ४ करोना संशयितांचा अहवाल हा पॉझिटिव्ह आला. यांना आमदार निवास येथे विलीगीकरणात ठेवण्यात आले होते. मरकज प्रकरणातील संसर्गित व्यक्तिंपासून यांना देखील या विषाणूचा संसर्ग झाला आहे. आज शनिवार दि.१८ एप्रिल रोेजी करोना पॉझिटीव्ह आलेल्या या रुग्णांना क्रमश: मेडीकल व मेयामध्ये भरती करण्यात आले आहे. मेयामध्ये भरती करण्यात आलेल्या करोना बाधितांचं वय हे एकाचे ४० वर्ष तर एकाचे ३० वर्ष आहे. तर मेडीकलमध्ये भरती करण्यात आलेले हे नवरा-बायको असून त्यांचे वय क्रमश: ३३ आणि २३ वर्ष असल्याचे सांगितल्या जातं. आता मेडीकलमध्ये उपचार घेणा-या करोना बाधितांची संख्या ही ३४ असून मेयोमध्ये २९ रुग्ण हे उपचार घेत आहे.
अद्याप ८७ संशयित हे मेयो व मेडीकलमध्ये भरती असून मेडीकलमध्ये ३२ तर मेयोमध्ये ५५ रुग्ण आहेत. १२ पॉझिटीव्ह रुग्ण हे बरे होऊन घरी गेलेत तर एकाचा मृत्यू झाला. अद्याप अलगीकरणात एकूण ५८२ संशयित हे भरती आहेत.यात आज शनिवार रोजी अलगीकरणात समाविष्ट करण्यात आलेल्या ४७ संशयितांचा समावेश आहे. अलगीकरण कक्ष्ातून मेडीकलमध्ये ५ संशयितांना पाठविण्यात आले असूून घरात अलगीकरणात असलेले एकूण ४५१ संशयित असल्याचा आकडा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जनसंपर्क विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आला आहे.
नागपूरकरांना आता दररोज प्रतिक्ष्ा असते ती करोना संसर्गितांचा आकडा हा वाढू नये याची. लॉक डाऊनमधून सूटका होऊन पुन्हा नागपूरच्या हवेत मोकळा श्वास घेण्यासाठी नागपूरकरांचा जीव हा कासावीस झाला आहे,परिणामी मार्चच्या दुसर-या आठवड्यापर्यंत ४ वर थांबलेला आकडा मात्र नंतर चढता क्रमांकच गाठत गेला व नागपूरकरांचा जीव टांगणीला आला.
नागपूरातील अनेक प्रभाग सुरक्ष्ेच्या दृष्टिने प्रशासनातर्फे सील करण्यात आले आहे. शहरात संचार बंदी लागू आहे. या सर्व स्थितीतून लवकरात लवकर बाहेर पडायचे असेल तर प्रत्येक नागरिकाने मग तो कोणत्याही जाती,धर्म,भाषा,प्रांत किवा लिंगाचा असो प्रशासनाने वारंवार केलेल्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देऊन, करोना संसर्गितांच्या संपर्कात आलेले असल्यास स्वत:हून तपासणीसाठी समोर येणे गरजेचे आहे.
काल शुक्रवार दि. १७ एप्रिल रोजी शांतिनगर येथील ज्या ४० वर्षीय तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला त्याचे चिकन सेंटर असल्याचे कळते. अश्या धोकादायक संपर्क साखळीमुळे प्रशासनावरील ताण हा आणखी वाढतो. या चिकन सेंटरवरुन चिकन खरेदी करणारे जे कोणी असेल त्यांनी देखील स्वत:हून पुढे येऊन चाचणी करुन घेतल्यास स्वत:च्या जीवासोबतच आपल्या कुटुंबाचा व पर्यायाने समाजातील इतरांचा जीव देखील संक्रमित होण्यापसून वाचवू शकतील,असे सांगितले जात आहे.




आमचे चॅनल subscribe करा
