Advertisements

खासदार सांस्कृतिक महोत्सव-२०२५ चा अकरावा दिवस संघगीत व देशभक्तीपर गीतांनी गाजला
नागपूर, १७ नोव्हेंबर २०२५: बलसागर भारत होवो, हम करें राष्ट्र आराधन, एकता स्वतंत्रता समानता रहे, चरैवेति चरैवेति यासारख्या राष्ट्रभक्तीपर गीतांच्या सादरीकरणातून लोकप्रिय गायक पद्मश्री शंकर महादेवन यांनी भरगच्च भरलेल्या पटांगणातील श्रोत्यांमध्ये राष्ट्रभावना जागृत केली.
हनुमाननगरातील क्रीडा चौक येथील ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणावर सुरू असलेल्या ‘खासदार सांस्कृतिक महोत्सव-२०२५’ मध्ये रविवारी अकराव्या दिवशी संध्याकाळच्या सत्रात लोकप्रिय गायक पद्मश्री शंकर महादेवन यांची ‘राष्ट्र आराधन’ ही लाईव्ह इन कॉन्सर्ट आयोजित करण्यात आली होती. शंकर महादेवन यांच्यासोबत नागपूरची गायिका श्रीनिधी घटाटे आणि त्यांचा मुलगा शिवम महादेवन यांनीदेखील त्यांना उत्तम साथ दिली.
शंकर महादेवन यांनी कार्यक्रमाची सुरुवात सूर निरागस, एकदंताय वक्रतुंडाय या गणपती वंदनांनी केल्यानंतर त्यांनी सादर केलल्या ‘ओम नम: शिवाय’ या शिवमंत्राच्या सुरात श्रोत्यांनी आपला सूर मिसळला.
आजचा दिवस माझ्यासाठी खास असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीवर्षानिमित्त काही जुन्या संघगीतांना नव्याने संगीतबद्ध करून ‘अजरामर संघगीत’ हा अल्बम काढला आहे. देशाचा एक जबाबदार नागरिक या नात्याने पुढील पिढीपर्यंत ही गाणी पोहोचावी आणि त्यांच्यामध्ये राष्ट्रप्रेम जागे व्हावे, या उद्देशाने आज ही गाणीा सादर करीत आहे, असे म्हणत शंकर महादेवन यांनी अटल बिहारी वाजपेयी यांचे शब्द असलेले ‘निर्माणों के पावन युग में’ हे गीत सादर केले. त्यानंतर बलसागर भारत होवो, हम करें राष्ट्र आराधन, मनसा सततं स्मरणीयम, ध्वज केशरी शिवाचा, संस्कृति सब की एक चिरंतन, एकता स्वतंत्रता समानता रहे, चरैवेति चरैवेति, सूरसंगम तालसंगम, विश्व में गूंजे हमारी भारती ही संघगीते सादर केली.
याशिवाय, ऐ वतन, जिंदा, मैं रहू या ना रहू, मन मंदिरा, माँ, कांधो सी मिलते हैं, कल हो ना हो, मितवा, सुनो गौर से देशभक्तीपर व इतर गीते सादर केली. श्रीनिधी व शिवमच्या संगतीने सादर करून वातावरण भारावून टाकले. श्रीनिधी मागील १० वर्षांपासून शंकर महादेवन यांच्या सोबत असून तिने बोल ना हलके हलके हे गीत यावेळी सादर केले.
आजच्या कार्यक्रमाची सुरवात केंद्रीय मंत्री व खासदार सांस्कृतिक महोत्सवाचे प्रणेते नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री पंकज भोयर, आमदार प्रवीण दटके, पोलिस आयुक्त डॉ. रविन्द्र सिंगल, मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महानगर संघचालक राजेश लोया, हितवादचे राजेन्द्र पुरोहित, पोलिस उपायुक्त रश्मीता राव, कमला नेहरू महाविद्यालय प्रिंसिपल दिलीप बडवाईक, डायरेक्टर ऑफ आर्ट सायन्स अँड कॉमर्स टेक्नॉलॉजी प्रेरणा कॉलेज प्रवीण जोशी, आयुर्वेदिक महाविद्यालयाचे प्राचार्या डॉ. ब्रिजेश मिश्रा, संताजी रविनाश छात्रालय अँड संस्था अध्यक्ष वासुदेव नंदुजी इंगळे, मोहता सायन्स कॉलेज प्राचार्य जीवन दोंतुलवार, ईश्वर देशमुख कॉलेज ऑफ फिसिकल एजुकेशन रमेश दुरूगकर, ईश्वर देशमुख कॉलेज ऑफ फिसिकल एजुकेशनच्या प्रिंसिपल शारदा नायडू, राम हरकरे यांच्या हस्ते दीप प्रज्वलीत करून झाली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळ कुलकर्णी व रेणुका देशकर यांनी केले. महोत्सवाच्या यशस्वितेसाठी खासदार सांस्कृतिक महोत्सव आयोजन समितीचे अध्यक्ष प्रा. अनिल सोले, उपाध्यक्ष डॉ. गौरीशंकर पाराशर, अशोक मानकर, दिलीप जाधव, सचिव जयप्रकाश गुप्ता, कोषाध्यक्ष प्रा. राजेश बागडी, सदस्य बाळासाहेब कुलकर्णी, हाजी अब्दुल कदीर, सारंग गडकरी, अविनाश घुशे, डॉ. दीपक खिरवडकर, संदीप गवई, संजय गुळकरी, रेणुका देशकर,गुड्डू त्रिवेदी, किशोर पाटील, चेतन कायरकर, आशिष वांदिले, भोलानाथ सहारे, अॅड. नितीन तेलगोटे, मनिषा काशीकर, विजय फडणवीस, महेंद्र राऊत, दिलीप गौर, शैलेश ढोबळे यांचे सहकार्य लाभत आहे.
आज, १८ नोव्हेंबर रोजी समारोप –
हनुमाननगरातील क्रीडा चौक येथील ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणावर अकरा दिवसांपासून सुरू असलेल्या ‘खासदार सांस्कृतिक महोत्सव-२०२५’ चा आज, मंगळवार दिनांक १८ नोव्हेंबर रोजी समारोप प्रसिद्ध संगीतकार जोडी अजय – अतुल यांच्या लाईव्ह इन कॉन्सर्ट ने समारोप होत आहे. हा कार्यक्रम सायंकाळी ६.३० वाजता असून गैरसोय टाळण्यासाठी कार्यक्रमस्थळी लवकरात लवकर पोहोचून आपली जागा निश्चित करावी, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
……………………………………….
Advertisements

Advertisements

Advertisements
