

खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीने जाहीर केली कार्यक्रमांची यादी
नागपूर, २६ ऑगस्ट २०२२: शहरातील गणेशोत्सव मंडळांना त्यांच्या परिसरात सांस्कृतिक कार्यक्रम सादर करता यावे, यासाठी खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीच्यावतीने कार्यक्रमांची माहिती जाहीर केली आहे. यात गायन, वादन, नृत्य, नाटक, गीतरामायण, देशभक्तीपर कार्यक्रम, कविसंमेलन आदी साहित्य, संस्कृतीसंबंधातील कार्यक्रमांचा समावेश आहे.या उपक्रमाला भरघोस प्रतिसाद लाभत आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून यंदा सांस्कृतिक गणेशोत्सवाची संकल्पना आकाराला येत असून गणेशोत्सव मंडळांनी कार्यक्रमांची नोंदणी सुरू केली आहे.
गणेशोत्सव मंडळांनी यादीत नमूद केलेल्या कार्यक्रमांच्या नोंदणीसाठी गंगोत्री अपार्टमेंट, बुटी लेआऊट, सिद्ध गणेश मंदिराजवळ नागपूर-२२ येथे, ३० ऑगस्ट पर्यत संपर्क साधावा, असे आवाहन जयप्रकाश गुप्ता यांनी केले आहे.
या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी खासदार सांस्कृतिक महोत्सव आयोजन समितीचे अध्यक्ष प्रा. अनिल सोले, उपाध्यक्ष मधूप पांडे, गौरीशंकर पाराशर, अशोक मानकर, दिलीप जाधव, कोषाध्यक्ष प्रा. राजेश बागडी, सदस्य बाळासाहेब कुलकर्णी, हाजी अब्दुल कादिर, संजय गुलकरी, संदीप गवई, चेतन कायरकर, आशिष वांदिले, भोलानाथ सहारे, रेणुका देशकर, नितीन तेलगोटे, गजानन रानडे यांचे सहकार्य लाभत आहे.
……………
कार्यक्रम व सादरकर्त्यांची यादी
कीर्तन : मुकुंदबुवा देवरस, मृण्मयी कुळकर्णी, श्याम धुमकेकर, प्रज्ञा कुळकर्णी, आदित्य देशकर, श्रुती वाघ, राहूल गणोरकर
‘विश्व में गूंजे भारती’ देशभक्ती पर कार्यक्रम : सारंग जोशी व समूह
‘
अनादि मी अनंत मी..’ स्वा. सावरकरांच्या काव्यप्रतिभेचा मागोवा घेणारा कार्यक्रम : अमर कुळकर्णी व समूह
‘निश्चयाचा महामेह’ छत्रपती शिवाजी महाराजांवरील दृक्श्राव्य संगीतमय कार्यक्रम : प्रफुल्ल माटेगांवकर आणि चमू
‘
गीत रामायण’ : गजानन रानडे आणि चमू
‘स्वर नवोन्मेष’ २१ व्या शतकातील मराठी गीतांचा कार्यक्रम : आविष्कार अकॅडमी
सुगम संगीत : स्वरानद म्युझिक अकादमीचे अविनाश घोंगे
जागरण : रोहित कुमार मिश्रा एन्ड पार्टी
नृत्य : नुपूर नृत्य निकेतन
भावगीत, सुगम संगीत, देश भक्ति गीत, मराठी हिंदी भजने : मनिषा काशीकर
‘स्वरधारा’ हा हिंदी मराठी सुगम, चित्रपट गीतांचा कार्यक्रम : आनंद मास्टे आणि चमू
‘
रंग मराठी मातीचा’ महाराष्ट्राची लोकधारा दर्शविणारा संगीतमय कार्यक्रम : सोहम कलाविष्कार
पारंपरिक खेळ : आरती देशपांडे आणि समूह
जल्लोष स्वातंत्र्याचा : यामिनी पायघन व समूह
बोस महानाट्य : प्रयास संस्थेच्या प्रियांका ठाकूर
‘कालजयी’ नाटक : गौरव खोंड व दिपलक्ष्मी भट
‘
वीरगाथा क्रांतिकारियों की’ : राहूल हरदास
‘
कैवल्याचे देणे’ : मयुरी ढोगळे
‘वंदेमातरम – स्वतंत्रता संग्राम में डॉ. हेडगेवार’ : श्वेता पत्की
‘फ्रिक्वेन्सी’ नाटक : वैदेही चवरे,
‘अनंत मी’ नाटक : अभिषेक बेल्लरवार
‘गोष्ट एका लग्नाची’ : सारंग मास्टे




आमचे चॅनल subscribe करा
