Homeनागपूर न्यूज‘वैरागडे गुरुजी फाउंडेशनची’ स्थापना

‘वैरागडे गुरुजी फाउंडेशनची’ स्थापना

मारेगाव,ता. १९ सप्टेंबर: माजी मुख्याध्यापक व सामाजिक कार्यकर्ते श्रीराम वैरागडे गुरुजी यांचे ६ आगस्ट २०२१ रोजी दु:खद निधन झाले. त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ त्यांच्या कुटूंबियांनी व मित्रांनी पुढाकार घेऊन ‘श्रीराम वैरागडे गुरुजी फाउंडेशनची’ स्थापना केली आहे.
शिक्षक दिनी ५ सप्टेंबर रोजी या फाऊंडेशनची स्थापना करण्यात आली असून, या माध्यमातून विविध सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य विषयक उपक्रम राबविण्यात येणार आहे.

तसेच शिक्षण क्षेत्रातील समर्पित विभूतींना पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून, विद्यापीठ स्तरावर व्याख्यानमाला देखील आयोजित करण्यात येईल.

याशिवाय पत्रकार संघाच्या माध्यमातून शैक्षणिक वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांसाठी पुरस्कार इत्यादी उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे फाउंडेशनचे कार्यवाह नरेंद्र वैरागडे यांनी सांगितले.

Latest बातम्या