फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजवैभव काळे यांचे लसीकरण केंद्र भाजप नगरसेवकांनी पाडले बंद!

वैभव काळे यांचे लसीकरण केंद्र भाजप नगरसेवकांनी पाडले बंद!

Advertisements

(संग्रहीत छायाचित्र)

नागरिकांचा जीव महत्वाचा कि राजकारण?नागरिकांचा सवाल

नागपूर,ता. १४ जुलै: जानेवारीच्या १६ तारखेपासून भारत या देशात लसीकरणाला सुरवात झाली तेव्हापासून आज तब्बल ७ महिन्यांचा कालावधी उलटला असला तरी ’लसीकरण आणि राजकारण’यांचा परस्पर संबंध हा जनतेच्या जीवावरही लई भारी पडत असल्याचे दिल्ली ते गल्लीपर्यंत आढळून येत आहे.एकीकडे केंद्र सरकार राज्य सरकारला पर्याप्त मात्रेत लसीच पाठवत नाही असा आरोप राज्य सरकार सातत्याने करीत असून भाजप शासित राज्यात मात्र लसींची कोणतीही वाणवा नसल्याचा आरोप ही फार जुना आहे मात्र लसीवरुन राजकारण करण्याचा हा संसर्ग अगदी पुरोगामी महाराष्ट्राच्या उपराजधानीत पन्नासे ले-आऊटपर्यंत येऊन ठेपेल याची कल्पनाही नागपूरकरांनी केली नव्हती.

पन्नासे ले आऊटमधील काँग्रेस पक्ष्ाचे एक सर्वसामान्य कार्यकर्ता वैभव काळे यांनी गेल्या तीन महिन्यांपासून अथक प्रयत्न करुन त्यांच्या प्रभागात एका लसीकरण केंद्राची सुरवात केली. १६ जून रोजी महानगरपालिकेने त्यांच्या या लसीकरण केंद्राला परवानगी ही दिली व या केंद्राची माहिती आपल्या अधिकृत पोर्टलवर देखील टाकली.

११ जुलै रोजी प्रत्यक्ष् लसीकरणाला सुरवात झाली.पहिल्याच दिवशी ३२० नागरिकांनी या केंद्रावर लस टोचून घेतली.साठा पुरेसा नसल्याने तब्बल २०० नागरिक आल्या पावली परतले मात्र हीच बाब या प्रभाग क्रमांक ३६ मधील भारतीय जनता पक्ष्ाच्या नगरसेवकांना खटकली.त्यांनी मनपाच्या हेव्हीव्हेट नेत्यांच्या माध्यमातून मनपा प्रशासकीय अधिका-यांवर दवाब आणला त्यामुळे सुरु असलेले लसीकरण केंद्र बंद पडले.

विशेष म्हणजे हे लसीकरण केंद्र कुठल्याही राजकीय पक्ष्ाचे नव्हते.इतर लसीकरण केंद्रावर लसी कमी व नगरसेवकांचे व भाजप नेत्यांचे मोठमोठे कटआऊट्सच ठलकपणे झळकतात.या केंद्रावर कोणत्याही नेत्याचा फोटो,पक्ष्ाचा झेंडा,फलक इ.काहीच नव्हते. फक्त १६ ते १७ हजार लोकसंख्या असणा-या नागरिकांना ३ ते ४ किलोमीटर दूर जाऊन लस घ्यावी लागत असल्याने,परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना अर्धा किलोमीटर अंतरावर लस उपलब्ध व्हावी या उदात्त हेतूने वैभव काळे यांनी अथक प्रयासातून पन्नासे ले आऊटमधील समाज भवनात हे लसीकरण केंद्र सुरु केले होते.

यासाठी त्यांनी गेले तीन महिने मनपा आयुक्त,जिल्हाधिकारी यांचे उंबरठेही झिजवले.मात्र पहील्याच दिवशी या केंद्रावर ३२० नागरिकांचे झालेले लसीकरण भाजप नगरसेवकांच्या पोटात गोळा उठवणारे ठरले!वैभव काळे यांच्यामुळे आमचा राजकीय प्रभाव कमी होत असल्याचा समज या प्रभागातील एका नगरसेवकाने केला असल्याचा आरोप केला जात आहे.उलट सभापती असणा-या भाजपच्या एका नगरसेविकेने समाज भवनात लसीकरण केंद्र सुरु व्हावे यासाठी मदतच केली असे वैभव सांगतात मात्र प्रभागातील नगरसेवक व स्थायी समिती अध्यक्ष् प्रकाश भोयर,पल्लवी शामकुळे, लवकुमार भेदे,मीनाक्ष्ी तेलगोटे या नगरसेवकांपैकी स्वत: लवकुमार भेदे यांचे ही लसीकरण केंद्र याच प्रभागात सुरु असल्याची माहिती काळे यांनी दिली,भेदे यांच्या लसीकरण केंद्रावर स्टाफ अगदी चोख असल्याचे ते सांगतात.

नागरिकांचा जीव वाचवण्यासाठी लसीकरण हीच एकमेव प्रभावी उपाययोजना असताना,लसीकरणासारख्या उदात्त कार्यात भाजप राजकारण आणून लसीकरण केंद्र बंद पाडते,याचे अतीव दु:ख वैभव लाडे खास ‘सत्ताधीश’कडे व्यक्त करतात.
माझा कोणावरही आरोप नाही,हे लसीकरण केंद्र लोकांच्या हितासाठीच होतं.मात्र मनपात भाजपची सत्ता असल्याने आधी स्टाफ व लसी उपलब्ध असल्याचे सांगितल्या जातं नंतर स्टाफ व लसी उपलब्ध नसल्याने केंद्र सुरु ठेऊ शकत नसल्याचे कारण सांगितल्या गेले,असे काळे म्हणाले.

आयुक्त राधाकृष्णन बी.यांची याबाबत काल भेट घेतली असता त्यांनी लसी उपलब्ध झाल्यावर लवकरच हे केंद्र पुन्हा सुरु करण्याचे आश्‍वासन दिले.याशिवाय काँग्रेसचे शहराध्याक्ष् व आमदार विकास ठाकरे यांना देखील याबाबत निवेदन दिले असता जिल्हाधिका-यांना भेटून मार्ग काढू असे आश्‍वासन त्यांनी दिले असल्याचे वैभव काळे यांनी सांगितले.

हे लसीकरण केंद्र पुन्हा सुरु झाले तरी कोणत्याही पक्ष्ाचे बॅनर लागणार नाही.माझी बांधिलकी १६ ते १७ वॉर्ड मिळून १७ ते १८ हजार नागरिकांशी असल्याचे काळे हे सांगतात.४ भाजप नगरसेवकांचे चेहरे ४ वर्षात या वॉर्डात १०० मतदारांनाही आठवत नाही.मला राजकारण करायचे नाही माझी मागणी एवढीच आहे राज्य सरकारकडून ५० लस उपलब्ध झाल्यात तरी त्यातील ५ लस या केंद्राला द्या जेणेकरुन येथील नागरिक निराश होऊन परत जाणार नाही.

अनेक नागरिकांनी लसीकरणासाठी नोंदणी केली आहे.भाजपने किमान त्या नागरिकांप्रती तरी आपली बांधिलकी जपावी.दिल्लीपासून गल्लीपर्यंत भाजपचे हे लसींचे राजकारण जनतेच्या जीवावर उठणे योग्य नसल्याचा संताप ते व्यक्त करतात.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या