

मंडळांना मुदतवाढ देण्यात यावी: वैदर्भिय प्रज्ञावंताचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
डॉ. ममता खांडेकर
(Senior Journalist)
नागपूर,ता.२६ मे: महाराष्ट्रातील प्रादेशिक असमतोल दूर करण्यासाठी एक विशेष तरतूद भारताच्या संविधानात अंर्तभूत करण्यात आली. संविधानाच्या अनुच्छेद ३७१(२) प्रमाणे महाराष्ट्राच्या राज्यपालांना विकास निधीच्या समन्यायिक वाटपाची जवाबदारी पार पाडण्यासाठी १९९४ पासून राज्यात ३ वैद्यानिक विकास मंडळांची स्थापना करण्यात आली.विदर्भ,मराठवाडा व कोकण.मात्र महाविकास आघाडी सरकारच्या काळात आता ही वैद्यानिक मंडळेच गुंडाळण्याचा घाट घातला गेला असून या मंडळांना मुदत वाढ न देण्याचा निर्णय घेण्यात आल्याने वैदर्भिय प्रज्ञावंतांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना स्वत:च्या स्वाक्ष् रीनिशी निवेदन दिले आहे.
राज्याच्या राजकारणाशी आमचा काडीमात्र संबंध नाही मात्र मंडळांना मुदत वाढ न देणे म्हणजे विदर्भ व मराठवाडा सारख्या मागास भागांचा आवाज दाबणे होईल,असा आरोप या सारस्वतांनी केला आहे.महामंडळे बंद झाल्यास विकास प्रक्रियेवर लक्ष् ठेवणारी एक यंत्रणा आपण कायमची बंद करत आहोत असा संदेश या मागास भागात पसरेल व भविष्यात या भागावरील विकासाबाबत होणारे भेदभाव व अन्याय झाल्यास या भागांचा आवाज कोणत्या मंचावरुन उचलणार?असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
या मंडळामध्ये विदर्भ व मराठवाडा मंडळाने आपापल्या भागातील प्रादेशिक असमतोल,विकासाचा अनुशेष, विकास निधीचे न्याय वाटप व इतर अनेक समस्यांचा शास्त्रीय अभ्यास करुन वेळोवेळी राज्यपाल व शासनाला या बाबींबद्दल अवगत केले आहे.मर्यादित अधिकार व संसाधनामध्ये देखील आपापल्या भागातील विविध क्ष्ेत्रांचे महत्वपूर्ण अहवाल शासनाला वेळोवेळी सादर केले आहेत. महत्वाचे म्हणजे ही मंडळे त्या त्या भागांचा आवाज शासनापर्यंत पोहोचविण्याचे‘ शेवटचे‘ संवैद्यानिक माध्यम आहे. ज्या-ज्या वेळी या मागास भागांवर अन्याय झाला त्या-त्या वेळी याच मंडळांनी त्या भागांचा विकासाचा आवाज शासनासमोर मांडायचे काम केले आहे.
कोविड-१९ नंतरच्या कार्यकाळात या मागास भागांमध्ये नक्की काय नुकसाान झाले,ते कसे दूर करता येईल,विकास कामांचा योग्य प्राधान्यक्रम काय असावा या सर्व बाबींवर ही मंडळे काम करु शकतात व शासनाला सहाय्यभूत होऊ शकतात.परिणामी विकास महामंडळांना तात्काळ मुदत वाढ देण्यात यावी,अशी मागणी ३१ वैदर्भिय सारस्वतांनी ठाकरे सरकारकडे केली आहे.
विदर्भ संयुक्त महाराष्ट्रात सहभागी झाल्यानंतर विदर्भ व मराठवाड्याच्या हक्काच्या निधीवर पश्चिम महाराष्ट्रील नेते मंडळी कायमचा डल्ला मारत आली आहे.विज,कोळसा इ.सारख्या नैसर्गिक संसांधनाने प्रचूर मात्रे असलेल्या विदर्भावर मात्र सिंचनासोबतच विविध विकास निधींच्या वाटपात सातत्याने अन्याय होत असल्याची बरीच अोरड गेल्या अनेक दशकांपासून होत आहे. विदर्भाचा सिंचनाचा हक्काचा निधीही पश्चिम महाराष्ट्रासाठी पांढरा हत्ती ठरलेल्या कृष्णा खोरेसाठी वारंवार वळवण्यात आल्यामुळे बरीच ओरड या विरोधात वैदर्भियांमध्ये झाली. राज्यातील सत्तेवर सातत्याने पश्चिम महाराष्ट्राचेच वर्चस्व राहील्याने विदर्भ,मराठवाड्याच्या वाट्याल कायम सापत्न वागणूक आली आहे. यामुळेच विदर्भवादी नेते हे कायम ‘स्वतंत्र विदर्भाची’ मागणी करीत आहे.यंदा देखील विदर्भ राज्य आंदोलन समितीने ‘विदर्भ विकास मंडळ नको आम्हाल स्वतंत्र विदर्भ हवा’अशी मागणी राज्य सरकारकडे केली आहे.यासाठी त्यांनी ११ जिल्ह्यांमधून ११ अध्यक्ष्ांच्या स्वाक्ष् रीचे मागणीपत्र मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे.
२०१४ साली राज्यात सत्तापालट झाला आणि विदर्भाचे सुपुत्र देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. उर्जामंत्री,अर्थमंत्री,वनमंत्री हे विदर्भातील असल्यामुळे ब-याच प्रमाणात विदर्भाचा अनुशेष दूर करण्याचा प्रयत्न केला गेला मात्र ६० वर्षांचा अनुशेष फक्त ५ वर्षात दूर करणे अशक्य होते.परिणामी अद्यापही विदर्भाचा अनुशेष मोठ्या प्रमाणात शिल्लक आहे. २०१९ च्या ऑक्टोबरमध्ये राज्यात पुन्हा सत्तांतर घडले व शिवसेना,राष्ट्रवादी व काँग्रेसच्या महाआघाडीचे सरकार सत्तेवर आले,नुकतेच उपमुख्यमंत्री अजिव पवार हे विदर्भात जिल्हानिहाय विकास निधीच्या वाटपासंबधीच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी विभागीय आयुक्तांच्या कार्यालयात आले असता,पत्रकारांशी वार्तालाप करताना ’तुमच्या विदर्भाच्या मुख्यमंत्र्यांनी गेल्या ५ वर्षांत विदर्भाचा अनुशेष संपवला आहे,अशी वलग्ना केली. उलट पश्चिम महाराष्ट्राचा हक्काचा निधी फडणवीस यांनी विदर्भासाठी पळवला,अशी पुश्तीही जोडली होती. यावर बरेच वादळाचे मोहोळही उठले होते.
पश्चिम महाराष्ट्राच्या या नेतेमंडळीच्या अश्या सापत्न वागणूकीतून आणि विदर्भ,मराठवाडाप्रति ‘विशेष दुस्वासामधूनच’स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी पुढे आल्याचे सांगितले जात आहे.
विदर्भातील अनेक सारस्वतांनी मात्र सध्यातरी वैधानिक विकास मंडळांना मुदतवाढीची मागणी रेटून धरली असल्याचे दिसून पडतंय.विशेष म्हणजे विदर्भातील मंत्रीच विदर्भ,मराठवाड्यावर एवढा दूरगामी परिणाम करणा-या ठाकरे सरकारच्या या निर्णयाविरोधात तोंडात मिठाची गुळणी धरुन गप्प बसले आहेत,याचे देखील आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
स्वाक्ष्ररी करणा-यांची यादी-
१)डॉ.वेदप्रकाश मिश्रा,कुलपती, अभिमत विद्यापीठ व विविध संस्थांचे संचालक
२)डॉ.विकास आमटे,सचिव,महारोगी सेवा समिती,आनंदवन,वरोरा
३)डॉ.विकास महात्मे,खासदार,राज्यसभा व प्रख्यात नेत्रतज्ज्ञ,नागपूर
४)पद्मश्री डॉ.रवींद्र कोल्हे, प्रख्यात समाजसेवक व माजी सदस्य,विदर्भ विकास मंडळ
५)डॉ.शीतल आमटे,मुख्य कार्यकारी अधिकारी,अानंदवन,वरोरा
६)डॉ.उदय बोधनकर,प्रख्यात बालरोगतज्ज्ञ,नागपूर
७) डॉ. धनंजय उखळकर,प्रख्यात किडनीरोगतज्ज्ञ,नागपूर
८) डॉ.विनायक देशपांडे,माज कुलगुरु,नागपूर विद्यापीठ व सदस्य,केळकर समिती
९)श्री.शिवकुमार राव,अध्यक्ष्,विदर्भ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट काऊंसिल,नागपूर
१०)श्री.प्रशांत मोहोता,प्रसिद्ध उद्योजक,हिंगणघाट
११)डॉ.किशोर मोघे,समाजसेवक व माजी सदस्य,विदर्भ विकास मंडळ
१२)श्री.सुरेश राठी, अध्यक्ष्,विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशन,नागपूर
१३) श्री.कमलेश डागा,प्रसिद्ध उद्योजक,अमरावती
१४)श्री.विकास जैन,माजी आयुक्त,उद्योग विभाग,महाराष्ट्र
१५)डॉ.अंजली कुलकर्णी,माजी विभाग प्रमुख,अर्थशास्त्र विभाग,नागपूर विद्यापीठ व माजी सदस्य,विदर्भ विकास मंडळ
१६)डॉ.संजय खडक्कार, प्राध्यापक व माजी सदस्य,विदर्भ विकास मंडळ
१७) डॉ.श्रीहरी चावा,प्रसिद्ध व्यवसाय सल्लागार
१८)डॉ.मृणालिनी फडणवीस,कुलगुरु,सोलापूर विद्यापीठ
१९)डॉ. श्रीकांम कोमावार,प्राचार्य,डॉ.आंबेडकर विधी महाविद्यालय
२०) डॉ.प्रशांत हरमकर,विदर्भ अर्थशास्त्रीय परिषद,अमरावती
२१)श्री.विजय फणशीकर, संपादक,द हितवाद,नागपूर
२२)श्री.प्रदीप मैत्र, अध्यक्ष्,महाराष्ट्र पत्रकार संघ
२३)डॉ.विठ्ठल वाघ,प्रसिद्ध साहित्यिक,अकोला
२४)डॉ.श्रीकांत तिडके,प्रसिद्ध सहित्यिक,अमरावती
२५) डॉ.श्याम धोंड,प्रसिद्ध साहित्यिक
२६)डॉ.संगीता मेश्राम, विभागप्रमुख,इतिहास विभाग,नागपूर विद्यापीठ
२७)श्री.अजय देशपांडे, सदस्य,संगीत नाटक अकादमी,दिल्ली
२८)ॲड.फिरदोस मिर्झा,ज्येष्ठ अधिवक्ता, नागपूर उच्च न्यायालय
२९)श्री.अशोक मेंढे,ज्येष्ठ समाजसेवग
३०)डॉ.शंतनू जोग, माजी अध्यक्ष्,आय.सी.एस.आय.नागपूर
३१)डॉ. जॉन मेनेचरी,निवृत्त प्राचार्य,मातृ सेवा संघ समाज सेवा महाविद्यालय
३२) डॉ.कपिल चांद्रायण,माजी तज्ज्ञ सदस्य, विदर्भ विकास मंडळ




आमचे चॅनल subscribe करा
