फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeब्रेकिंग न्यूजवेटरने लाटले शंभर कोटी!

वेटरने लाटले शंभर कोटी!

Advertisements
‘डॉलर पे क्लब’नेटवर्क मार्केटिंगला बळी पडले सात हजार गुंतवणूकदार!

पत्रकार परिषदेत मांडली आपली व्यथा
पोलिसांच्या संथ कारवाईवर घेतला आक्षेप
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्याध्यक्ष श्रीकांत शिवणकरांनी दोषींची 
संपत्ती तात्काळ गोठवण्याची केली मागणी
नागपूर,ता.१२ ऑगस्ट २०२५: दिघोरी बहादूरा नागपूर येथील शुभम अंबादास पाटील हा वेटरचे काम करीत होता.त्याने स्वत:ला आंतरराष्ट्रीय गुंतवणूक आणि अमेरिकेतील ‘क्रिप्टो क्लस्टर’व्यवस्थापक म्हणून गुंतवणूकदारांपुढे सादर केले व त्यांची रक्कम परदेशातील ‘डॉलर पे क्लब’या नेटवर्क मार्केटिंग योजनेत गुंवणल्यास दुप्पट परतावा मिळण्याचे आमिष दाखवले मात्र, जवळपास सात हजार गुंतवणूकदारांचे अंदाजे शंभर कोटीं रुपयांचे गबन करुन तो पसार झाला.आज प्रेस क्लब येथे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्याध्यक्ष श्रीकांत शिवणकर यांच्या नेतृत्वाखाली पत्रकार परिषद घेऊन शेकडो गुंतवणूकदारांनी आपली व्यथा मांडली.या प्रसंगी राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल अहिरकर देखील उपस्थित होते.
या घोटाळ्यात मुख्य आरोपी शुभम पाटील याच्यासाेबत त्याची पत्नी नेहा,सहकारी शितल इंगळे(रामटेक)उमर फारुख(हुडकेश्‍वर) आणि तुषार चव्हाण यांचा समावेश आहे.आरोपींनी गणेशपेठ येथील एका मोठ्या हॉटेलमध्ये गुंतवणूकदारांसाठी बैठक बोलावली होती.त्या बैठकीत काही गरीब लोकांनी ‘डॉलर पे क्लब’ मध्ये गुंतवणूक केल्यामुळे त्यांना पाच लाखांचा फायदा झाल्याचे सांगितले.यामुळे गुंतवणूकदार शुभमच्या प्रभावात आले आणि अनेकांनी लाखोंची गुंतवणूक यात केली.
आरोपींनी बनावट ‘ट्रस्ट वॉलेट‘मोबाईल अप्लिकेशनचा वापर या संपूर्ण धांधलीसाठी केला.गुंतवणूकदारांना कोट्यावधींची वाढती शिल्लक असलेले बनावट डॅशबोर्ड दाखविण्यात आले.मात्र,त्यांचे खरे पैसे वैयक्तिक खात्यात वळते करण्यात आले.
कोट्यावधींच्या गुंतवणूकीनंतरही कोणताही परतावा न मिळाल्याने त्यांची आर्थिक फसवणूक झाल्याचे कळल्यानंतर, पिडीतांनी सक्करदरा पोलिस ठाण्यात ५ सप्टेंबर २०२४ रोजी एफआयआर नोंदवली.यासोबतच आर्थिक गुन्हे शाखाकडे तक्रार गेल्याने त्यांनी तपास सुरु केला मात्र,वर्ष उलटून गेल्यानंतर देखील मुख्य आरोपीला अटक झाली नाही.महत्वाचे म्हणजे शुभम पाटील हा बोरगाव येथे अंदाजे सहा महिन्यांपूर्वी  ९ तारखेला आला होता,अशी माहिती पिडीतांना मिळाली तरी देखील आर्थिक गुन्हे शाखेला तो गवसत नाही,याबाबत आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.
पिडीतांनी पुन्हा ३१ ऑगस्ट २०२५ रोजी दुस-यांदा पोलिस ठाणे गाठल्यानंतर आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला. एका वेटर माणसाने अंदाजे सहा ते सात हजार गुंतवणूकदारांना अंदाजे १०० कोटींचा गंडा घालण्यात अवघ्या दीड वर्षात यश मिळवले,याबाबत पिडीतांना मानसिक धक्का बसला आहे.नितेश वाडीभस्मे हे स्वत: सॉफ्टवेअर अभियंता असताना देखील ते शुभमच्या दाव्यावर विश्‍वास ठेऊन लाखो रुपयांनी गंडवल्या गेले.या योजनेत फक्त शिक्षित नव्हे तर अशिक्षित,गरीब नव्हे तर मध्यम वर्गीय व श्रीमंतांना देखील आर्थिक नुकसान भोगावे लागले आहे.
महत्वाचे म्हणजे भारतामध्ये ‘डॉलर पे’ या ॲपवर बंदी आहे तरी देखील शंभर कोटींचा गैरव्यवहार करण्यात शुभमला यश आले.आता डॉलर ॲप बंद झाले असले तरी वेगवेगळ्या नावाने अशी आर्थिक फसवणूक करणारे अनेक ॲप्स समाज माध्यमांवर सक्रीय असल्याचा आरोप पिडीतांनी केला.एकदा डाटा सर्व्हरची लिंक बंद झाली की आरोपींचा शोध लावणे अशक्य असल्याचे ते सांगतात.
या घोटाळ्यात शुभमने एका न्यायाधीशाचा देखील उल्लेख केला.ज्यामुळे पिडीतांचा आणखी विश्‍वास त्याच्यावर बसला. आर्थिक गुन्हे शाखेने दोषींची संपत्ती तातडीने गोठवून गुंतवणूकदारांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी याप्रसंगी श्रीकांत शिवणकर यांनी केली.न्याय न मिळाल्यास यंत्रणेशी लढण्याचा इशारा अनिल अहिरकर यांनी केला.
(बातमीशी संबंधित व्हिडीयो Sattadheesh official युट्यूब चॅनल वर उपलब्ध)
………………………………………
Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या