फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeब्रेकिंग न्यूजवेगळा विदर्भ व बेरोजगारी हेच निवडणूकीचे मुद्दे:नितीन रोंघे

वेगळा विदर्भ व बेरोजगारी हेच निवडणूकीचे मुद्दे:नितीन रोंघे

Advertisements

नागपूर,ता. २४ : मी वेगळा विदर्भ व बेरोजगारी दूर करण्याला प्राथमिकता देणार अशी पदवीधर मतदार संघाचे अपक्ष् उमेदवार नितीन रोंघे यांनी पत्र परिषदेत माहिती दिली. विदर्भातील बेरोजगारी व गरिबी दूर करण्यासाठी विदर्भात सर्वच साधन सामग्री उपलब्ध आहे मात्र आता पर्यंतच्या राजकीय उदासिनतेमुळे विदर्भावर अन्याय होत आला आले.येथील लोक गरिब नाही पण विदर्भातील लोकांना गरिब करण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी पत्र परिषदेत केला.

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनीच सांगितले आहे की कोणावर अन्याय होत असेल तर त्यांना अन्यायाची जाणीव करुन द्या तेव्हाच तो बंड करुन उठेल.यासाठी मी एका बहूराष्ट्रीय कंपनीतील नोकरी सोडून विदर्भाच्या ओढीने विदर्भात परत आलो असल्याचे परखड मत त्यांनी साकोली येथील पत्र परिषदेत व्यक्त केले.यावेळी नरेंद्र पलांदूरकर,राम आखले, निखिल नरवडीया हे विदर्भवादी नेते उपस्थित होते.

यावेळी नितीन रोंघे म्हणाले की,सामाजिक व राजकीय क्ष्ेत्रात काम करणा-या विविध पक्ष् व नेत्यांनी मला समर्थन दिले असून,विदर्भाच्या लोकांना त्यांचे हक्क मिळणे व भावी पिढीच्या उज्जवल भवितव्यासाठी वेगळा विदर्भ होणे ही काळाची गरज आहे. वेगळा विदर्भ राज्य झाल्याशिवाय या प्रदेशाचा विकास व बेरोजगारी दूर होणे शक्य नसल्याचेही अपक्ष् उमेदवार नितीन रोंघे यांनी व्यक्त केले.

मला पाच विदर्भवादी पक्ष्ाचे समर्थन प्राप्त असल्याचे ते म्हणाले तरी मी अपक्ष् उमेदवार म्हणूनच निवडणूक लढवतोय. माझं हे स्पष्ट मत आहे की पदवीधर आणि शिक्ष् क मतदार निवडणूकीत तरी कमीत कमी राजकीय पक्ष्ांचा किवा राजकीय नेत्यांचा शिरकाव नको. गेली पाच टर्न म्हणजे गेल्या दोन टर्न आधीपासून बी.टी.देशमुख पदवीधर मतदारसंघातून आमदार होते. अमरावतीतून अपक्ष् असल्यामुळेच त्यांनी विधान परिषदेत कुठल्याही राजकीय दवाबाला बळी न पडता पदवीधरांचे व विदर्भाच्या प्रश्‍नांवर परखड भूमिका मांडली. बी.टी.देशमुख हे माझे आदर्श आहे.त्यांनी जे काम केले तेच मी विधान परिषदेत करुन दाखवणार असल्याचे ते म्हणाले.

म्हणून मी हा निर्णय घेतला की राजकीय पक्ष्ांचे समर्थन घेईल मात्र निवडणूक ही अपक्ष् म्हणूनच लढील.त्यांचा एबी फॉर्म नाही घेतला. माझा सर्वात मुख्य मुद्दा  स्वतंत्र विदर्भ राज्य आहे. विदर्भाचे प्रश्‍न,विदर्भाच्या समस्या हा माझा मुख्य अजेंडा आहे,जसे की विदर्भातून पदवीधरांचं होत असलेलं पलायन.भंडारा,साकोली जिल्हयात,एवढ्या मोठ्या एमआयडीसी आहेत. मात्र उद्योगधंधे नाही,भेल असो,बीएचएल असो किवा अशोक लीलॅण्ड असो मात्र बेरोजगारी तरीही कायम आहेत.कारखानदाी नाहीच. हे कारखाने जर सुरु झाले तर भंडारा जिल्ह्यातील दोन-तीन हजार युवकांना तरी रोजगार मिळेल,असे ते म्हणाले.या सर्वांचा येणारा पैसा इथल्याच मातीत जिरेल,या भागाची भरभराट होईल.

मला हे कारखाने सुरु करायचे आहे,मला नागपूरचा मिहान सुरु करायचा आहे. मी आमदार झाल्याबरोबर माझं पहीले काम नागपूरचा मिहान सुरु करायचा आहे.दक्ष्णि-पश्‍चिमचे आमदार,रामटेकचे खासदार,नागपूर आमदार यांच्या मदतीतून विविध उद्योग धंदे मिहानमध्ये आणण्याचा मी पूर्ण प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले.कागदपत्र लागत असतील तर मी मदत करतो. मात्र तुमचे उद्योग धंदे या ठिकाणी आणा आणि इथल्या सुशिक्ष्तांना रोजगार द्या.

माझं खूप मोठं काही ड्रीम नाही मात्र कमीत कमी २५ हजार रुपये महीना पगार देणारे एक लाख नोक-या मला या विभागात आणायच्या आहेत,हे मी ठरवलं आहे आणि हे मी करणारच,असा निश्‍चय त्यांनी व्यक्त केला.

आतापर्यंत लाखो पदवीधरांनी आपले प्रतिनिधी म्हणून उमेदवार विधान परिषदेत पाठवले,मात्र आतापर्यंत पदवीधरांनी ‘राजकारण्यांना’पाठवलं,मी काही कोणी राजकारणी नाही,मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे.माझ्या नावाच्या मागे खूप मोठं राजकीय किवा इतर वलय नाही.मात्र एका गोष्टीत मी खूप इमाने-एतबारे काम करतोय ते म्हणजे विदर्भाचे प्रश्‍न. मी विदर्भाच्या एकूण एक आंदोलनात सहभागी झालो आहे. विदर्भाची जी तज्ज्ञ समिती बनली होती मधूकरराव किंमतकर यांच्या अध्यक्ष्ते खाली त्या समितीमध्ये देखील सदस्य होतो. महाविदर्भ जनजागरण या उपक्रमाअंतर्गत मी विदर्भाचे संपूर्ण तालुके पिंजून काढले. विदर्भाच्या काय समस्या आहे त्या मी लोकांसमोर मांडल्या आहेत.त्यामुळे मी कोणी राजकारणी किवा कोणी नेता म्हणून लोकांसमोर वावरलो नाही.मी एक सामान्य विदर्भवादी म्हणून लोकांपुढे आज आलो असल्याचे नितीन रोंघे यांनी सांगितले.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या