फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeदेश-विदेशविहानसाठी नागपूरकरांनी एकत्र यावे : अभिनेता सोनू सूद 

विहानसाठी नागपूरकरांनी एकत्र यावे : अभिनेता सोनू सूद 

Advertisements

नागपूर,ता.२० एप्रिल २०२२: नागपूरच्या एसएमए ग्रस्त विहानसाठी सर्व नागपूरकरांनी एकत्र येऊन मदतीचा हात पुढे करावा आणि शक्य तितकी आर्थिक मदत करण्याचे आवाहन बॉलिवूड अभिनेता सोनू सूद याने आज नागपुरात पत्रपरिषदेत केले. विविध सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग असलेल्या सोनू सूद  ने आज पत्रकारांशी स्थानिक सिव्हिल लाईन्स येथील पाब्लो इथं संवाद साधला.  ” ही सर्वांनी एकत्र येण्याची वेळ असून, सर्वांनी प्रयत्न केल्यास १६ कोटी जमा करून विहानला मदत  करणे शक्य असल्याचा विश्वास सोनू ने व्यक केला’
नागपूरच्या विहान साठी मदतीचे आवाहन करणारा व्हिडियो सोनुने या आधीच शेयर केला आहे.

नागपूरचा १६ महिन्यांचा मुलगा विहान अकुलवार हा एसएमए (स्पाइनल मस्कुलर ऍट्रोफी) प्रकार २ या दुर्मिळ अनुवांशिक विकाराने ग्रस्त आहे. या विकारावरील उपचार अत्यंत महाग आहेत. या विकारावर एकमात्र उपचार म्हणजे झोलजेन्स्मा नावाचे औषध आहे ज्याची किंमत सुमारे 16 कोटी रुपये आहे. शिवाय, हे औषध रुग्णाला विशिष्ट वयाच्या आत दिले पाहिजे.  विहानला या औषधाची तात्काळ आणि नितांत गरज आहे जेणेकरून त्यावर प्रभावी उपचार होऊ शकतील. एवढी रक्कम निश्चितच आपल्यापैकी बहुतेकांच्या आवाक्याबाहेर असते . त्यामुळे विहानच्या  पालकांनी इतर स्रोतांबरोबरच क्राउड फंडिंग चा पर्याय निवडला. परंतु आता वेळेत उपचार प्राप्त करण्यासाठी अधिक मदतीची आवश्यक्ता आहे.

सोनू सूद याने विहानच्या पालकांशी संवाद साधला आणि  जाणून घेतली. तसूद यांनी शक्य तितके सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं आहे. विहानच्या पालकांनी देखील सोनू सूद याचे मनापासून आभार मानले आहे.

याशिवाय बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटीनी मदतीचे आवाहन केले आहे. या मुळे चित्रपटात ‘हिरो’ असलेली ही मंडळी खऱ्या आयुष्यात देखील समाजासाठी हिरोच ठरली आहेत.  अभिषेक बच्चन ने विहानसाठी स्वतः आर्थिक मदत करतानाच सोशल मीडियावर आपल्या फॉलोअर्स ना उदारपणे मदत करण्याचे आवाहन केले आहे. त्याच प्रमाणे कुमुद मिश्रा, रुतुराज वानखेडे, सुमित व्यास, मराठी चित्रपट अभिनेत्री रसिका सुनील, शुभांगी लाटकर, टीव्ही कलाकार गुंजन उत्रेजा या लोकप्रिय अभिनेता /अभिनेत्री यांनी  लहानग्या विहानसाठी देणगी देण्याचे आवाहन केले आहे.अभिनेता रणवीर शौरी, मनोज बाजपेयी  यांनीही मदतीच्या  आवाहनावर रिट्विट केले आहे.

दरम्यान, विहानचे पालक, विक्रांत आणि मीनाक्षी अकुलवार यांनी या सेलिब्रिटींचे आणि या व्यक्तींनी जी काही मदत केली आहे अशा उदार देणगीदारांचे आभार मानले आहेत. आत्तापर्यंत जेवढी रक्कम जमा व्हायला हवी होती त्यापेक्षा अजूनही ही रक्कम खूपच कमी आहे. “आम्ही जेवढे आवश्यक आहे त्याच्या एक चतुर्थांश भाग गोळा करू शकलो आहोत. विहानच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आमच्या प्रयत्नांना आपणही शक्य असेल तशी साथ द्यावी असे आवाहन”, विहानचे वडील विक्रांत अकुलवार यांनी केले आहे. 

एसएमए बद्दल: स्पाइनल मस्कुलर ऍट्रोफी (SMA) हा एक अनुवांशिक विकार आहे जो हालचालीसाठी वापरल्या जाणार्‍या स्नायूंमध्ये कमकुवतपणा आणि वेस्टिंग या द्वारे दर्शविला जातो. हे विशेष नर्व्ह पेशींच्या नुकसानीमुळे होते, ज्याला मोटर न्यूरॉन्स म्हणतात जे स्नायूंच्या हालचाली नियंत्रित करतात. एकदा का एखादी  नर्व्ह सेल निकामी झाली  की, शरीराच्या त्या भागाला होणारे नुकसान जवळजवळ अपरिवर्तनीय असते. विहानला आधीच पायात कमकुवतपणा, श्वासोच्छ्वास आणि आधाराशिवाय बसता किंवा उभे  न राहता येणे अशी लक्षणे दिसून आली आहेत. त्यामुळे, विहानसाठी औषध लवकरात लवकर उपलब्ध करून देणे महत्त्वाचे आहे.

[डॉ.विक्रांत अकुलवार यांचा संपर्क क्रमांक- 7798355777]

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या