

पश्चिम नागपूर विधानसभा मतदार संघात झंझावाती संपर्क दौरा
नागपूर, ता. १९ – मागील आठ दिवसांपासून नागपूर पदवीधर मतदार संघातील सर्व भागात जाऊन पदवीधर, बेरोजगार, शिक्षक, नोकरदारांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहे. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचा एक सर्वसामान्य कार्यकर्ता पासून सुरू झालेला जबाबदाऱ्यांचा प्रवास आता महापौर पदावरून पुढे जात आहे. विभागातील पदवीधर, बेरोजगार, शिक्षक आणि अन्य नोकरदारांच्या अनेक समस्या आहेत. यासोबतच विदर्भावर सातत्याने होत असलेला अन्याय हा सुद्धा एवढे वर्ष वैदर्भीयांच्या अधोगतीस कारणीभूत ठरला आहे. सत्तेत असताना येथील कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सरकार असो वा आताच्या महाविकास आघाडी सरकाने प्रत्येकवेळी विदर्भावर अन्यायच केला आहे. कोरोनाचे कारण दाखवून नागपूर करार भंग करीत हिवाळी अधिवेशन मुंबईला घेतले जात आहे. पावसाळ्यात पूर परिस्थितीत मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र येथील पूरामध्ये भेदभाव केला जात आहे. विदर्भातील शेतकऱ्यांना नुकसानभरपाईचे आश्वासन देऊन मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना लाभ दिला जात आहे. हा सातत्याने होणारा अन्याय आता सहनशक्तीच्यापलीकडे झालाय. या अन्यायकर्त्या सरकारला पदवीधरच्या ‘बॅलेट’ने त्यांची जागा दाखवून विदर्भाला न्याय देण्याच्या संघर्षात योगदान द्या, असे आवाहन भाजपा, बहुजन रिपब्लिकन एकता मंच व खोरिप युतीचे अधिकृत उमेदवार नागपूरचे महापौर संदीप जोशी यांनी केले.
पश्चिम नागपूर विधानसभा मतदार संघामध्ये गुरुवारी(ता.१९) संदीप जोशी यांनी संपर्क दौरा केला. संपर्क दौऱ्याच्या माध्यमातून विविध भागात पदवीधर तसेच कार्यकर्त्यांशी संवाद सभा घेण्यात आल्या. यावेळी पश्चिम नागपूरचे माजी आमदार सुधाकर देशमुख, मनपातील सत्तापक्ष नेते संदीप जाधव, विनोद कन्हेरे, किसन गावंडे, भाजपा दिव्यांग आघाडीचे शहर अध्यक्ष श्रीकांतजी भोगे, नगरसेविका प्रगती पाटील, नगरसेवक सर्वश्री संजय बंगाले, भूषण शिंगणे, निशांत गांधी, प्रमोद कौरती, मनपाच्या महिला व बालकल्याण समिती सभापती संगीता गिऱ्हे, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, विष्णू मनोहर, विनय उपासने, ॲड. राजू भोयर, अनिरुद्ध पालकर, डॉ.अनूप मरार, सुरेश गुप्ता, रमेश जोशी, जयप्रकाश गुप्ता, रमेश चोपडे, भाजपा पश्चिम नागपूर ओबीसी आघाडीचे अध्यक्ष नरेश बरडे, माजी नगरसेविका संध्या बरडे, नगरसेविका शिल्पा इशांत धोटे, नागपूर शहर आदिवासी आघाडी अध्यक्ष श्री. पेंदाम
अभय दीक्षित, सुरेश कोंगे, घनश्याम चौधरी, आशीफ खान, विनय दाणी, कमलेश पांडे, रेखा दैने यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सुशिक्षित, जाणकार पदवीधरांच्या समस्या, त्यांचे प्रश्न विधानपरिषदेत मांडले जावेत, त्यांना मिळावा या हेतूने ५८ वर्षापूर्वी राज्यात ५ पदवीधर मतदारसंघ निर्माण करण्यात आले. यामध्ये नागपूर पदवीधर मतदारसंघ हा राज्यातील सर्वात मोठा मतदारसंघ आहे. या मतदार संघात नागपूरसह वर्धा, गडचिरोली, चंद्रपुर,भंडारा, गोंदिया हे सहा जिल्हे आहेत. यात ६ खासदार, ३३ आमदार, ६ विद्यापीठ, ६६ तालुके आणि ५ मोठी शहरे आहेत. एवढ्या मोठ्या मतदारसंघात सुमारे २ लाख ६ हजार मतदारांनी नोंद केलेली आहेत. या सर्व मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू आहे. राज्यातील कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस किंवा आताच्या महाविकास आघाडी सरकारकडून नेहमीच विदर्भाला सापत्न वागणूक देण्यात आली आजही ते आपण अनुभवत आहोत. आमच्याकडील पूर, शेतकऱ्यांना नुकसानभरपाई, वीज बिल या सर्व बाबतीत सरकारने गाजरच दाखविले आहे. या सरकारच्या सर्व वागणुकीला सडेतोड उत्तर देण्याची संधी आता पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीने दिली आहे. त्याची जाण ठेवून, केलेल्या कामाची दखल घेऊन पसंतीक्रम द्यावा, असेही आवाहन संदीप जोशी यांनी केले.
प्रचारासाठी अवघे १७ दिवस मिळाले असताना सहाही जिल्ह्यातील मतदारांना भेटून त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहे. या सर्व समस्या जाणून घेत त्यांचा जाहिरनाम्यामध्ये समावेश केला जाईल. पदवीधर दिव्यांग बांधवांच्या समस्याही सोडविण्याकडे प्राधान्याने लक्ष देणार आहे. पदवीधरांचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी पक्षाने टाकलेला विश्वास सार्थ ठरविण्याची जबाबदारी आपण सर्व मिळून पार पाडणार आहोत. नागपूर पदवीधर मतदारसंघ हा पंडीत बच्छराज व्यास, गंगाधरराव फडणवीस यांच्यापासून ते पुढे ना. नितीन गडकरी आता प्रा. अनिल सोले यांनी जोपासला आहे. भाजपाचा बालेकिल्ला राहिलेला हा मतदारसंघ पुढेही कायम राहावा यासाठी सर्वांनी सहकार्य करा, असेही आवाहन संदीप जोशी यांनी केले.
नागपूर शहराचे महापौर संदीप जोशी यांनी पश्चिम नागपूर ओबीसी आघाडीचे अध्यक्ष नरेश बरडे यांच्या निवासस्थानी पदवीधर तरुणांशी संवाद साधला. याशिवाय भरतनगर येथे भाजपा दिव्यांग आघाडीचे शहर अध्यक्ष श्रीकांत भोगे यांचे निवासस्थान, भूषण शिंगणे यांचे निवासस्थान, फ्रेन्ड्स ज्येष्ठ नागरिक मंडळ, दी विदर्भ प्रीमियम को ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, शिक्षक सहकारी बँक, गांधीबाग सहकारी बँक लिमिटेड नागपूर, जाफरनगर, अनंतनर, छावनी येथील दुर्गामाता मंदिर सभागृह आदी ठिकाणी सभा घेतल्या.
विविध शासकीय, निमशासकीय, खाजगी कर्मचाऱ्यांनी दिले विजयासाठी समर्थन
संपर्क दौऱ्यामध्ये संदीप जोशी यांनी शहरातील विविध शासकीय, निमशासकीय, खाजगी संस्थांच्या कर्मचाऱ्यांची भेट घेतली. या भेटीमध्ये संस्थांच्या कर्मचाऱ्यांनी संदीप जोशी यांना विजयासाठी समर्थन दिले. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण मध्य विभाग, भारतीय खान ब्यूरो, वेकोलि मुख्यालय, बीएसएनएल, वनभवन, एएमसी, महालेखाकार कार्यालय, वस्तू व सेवा कर, दी विदर्भ प्रीमियम को ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, शिक्षक सहकारी बँक, गांधीबाग सहकारी बँक लि. नागपूर , फ्रेन्ड्स ज्येष्ठ नागरिक मंडळ आदी संस्थांच्या कर्मचाऱ्यांची महापौर संदीप जोशी यांनी भेट घेतली.




आमचे चॅनल subscribe करा
