

चंद्रपुर जिल्ह्यातील दारूबंदी हटविण्याचा निर्णय दुर्दैवी
नागपूर राष्ट्रवादी काँग्रेस अर्बन सेल तथा विदर्भ अन्याय निवारण समितीचा जाहीर विरोध
नागपूर,ता. २ जून: चंद्रपुर जिल्ह्यातील दारूबंदी हटविण्याचा निर्णय ताबडतोब मागे घेण्यात यावा या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अर्बन सेलच्या शहर अध्यक्षा ज्वाला जांबुवंतराव धोटे यांच्या नेतृत्वाखाली राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पोस्टा द्वारे पत्र आणि रिकाम्या दारूच्या बाटल्या पाठविण्यात आल्याची माहीती विदर्भ अन्याय निवारण समितीच्या शहर अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस अर्बन सेल नागपूरच्या शहर उपाध्यक्ष ज्वाला धोटे यांनी पत्रकाद्वारे दिली.
चंद्रपुर जिल्ह्यातील दारूबंदी म्हणजे हजारो महिलांच्या आंदोलनाचे फळ आहे आणि म्हणूनच चंद्रपुर जिल्ह्यातील दारूबंदी हटविणे म्हणजे एक प्रकारे “स्री शक्ती”” चा अनादर आणि अपमान असल्याचे त्या सांगतात.
सरकारी तिजोरी जर रिकामी झाली असेल तर रेवेन्यू (Revenue) वाढविण्यासाठी अनेक मार्ग आहेत. परंतु विदर्भातील जनतेला दारू पाजून सरकारी तिजोरीवरचा भार कमी करणे म्हणजे नैतिकतेच्या पलिकडचे आहे.
एकीकडे शासन व्यसनमुक्ती संदर्भात जनजागृती करते आणि दूसरीकडे दारूबंदी हटविण्याची घोषना करते हे तर फारच हास्यास्पद आहे! समाजातील सर्व स्तरातून सरकारच्या या निर्णयाचा विरोध होत असल्यामुळे महाराष्ट्र शासनाची प्रतिमा मलीन झाल्या शिवाय राहणार नाही.
जर ‘अवैध’ दारू निर्मिती व विक्रीचे कारण सांगून दारूबंदी हटविण्यात येत असेल तर पोलिस विभागाचे आणि गृहविभागाचे मोठे ’अपयश’ समजले जाईल.
चंद्रपुरचे पोलिस कुठे तरी प्रलोभन आणि अामिषाला बळी पडत आहेत,असा संशय त्यांनी व्यक्त केला. दारू माफियांकडून नियमित भली मोठी रक्कम पोलिसांच्या पदरी पडत असावी म्हणूनच अवैद्य दारू निर्मिती व विक्री चंद्रपुर जिल्ह्यात सूरू आहे का? असा सवाल जनता करीत आहे आणि ही अवैद्यता रोखण्यासाठी दारूबंदी हटविणे हा काही ऊपाय नसून भ्रष्ट पोलिसांवर कारवाई करून अवैद्य हालचालींवर अंकुश लावण्याची मागणी मुख्यमंत्री यांना त्यांनी पत्राद्वारे केली.
काँग्रेस पक्षाचे आदर्श म्हणजे महात्मा गांधींनी नेहमीच दारूचा विरोध केला आहे आणि या अनुषंगाने वर्धा जिल्ह्यात महात्मा गांधींचे सेवाग्राम आश्रम असल्या मूळे जिल्हयात दारू बंदी आहे परंतु काँग्रेस पक्षाचे चंद्रपुरचे खासदार धानोरकर आणि मंत्री वडेट्टीवार दारूबंदी हटविण्याची भाषा बोलतात ही अतिशय निंदनीय आणि दुर्दैवी बाब असल्याची टिका त्यांनी केली.
काँग्रेस गांधीजींची विचारधारा विसरली का ? असा सवाल करीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तर जाहीर केले होते कि जर आमची सत्ता आली तर आम्ही यवतमाळ जिल्हयात देखिल दारूबंदी लागू करू आणि त्यांच्या या वक्तव्याचा आम्ही आज पर्यंत अभिमान बाळगत असल्याचे त्या म्हणाल्या.
जनता कोरोना महामारीच्या काळात तशीच अर्धमेली झाली आहे आणि त्यात जर महाराष्ट्र शासन दारू पाजून पाजून जर विदर्भातील जनतेला पूर्णपणे मारण्याचा प्रयत्न करणार असेल तर आम्ही हे खपवून घेणार नाही असा इशारा देत विदर्भातील तरूण पिढीला नशेच्या अधीन करण्याचा जर सरकारचा ‘मानस’ असेल तर शासनाचा विरोध करण्याचे देखिल आम्ही धाडस ठेवतो ,असे त्या म्हणाल्या.
दारूबंदी हटविण्याचा निर्णय शासनाने जर मागे घेतला नाही तर सर्वसाधारण जनतेच्या आणि प्रामुख्याने महिलांच्या तीव्र विरोधाला महाविकास आघाडी सरकारला पूढे जावे लागणार असा इशारा ज्वाल धोटे यांनी दिला.
शिष्ट मंडळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अर्बन सेलचे पदाधिकारी डाॅ.श्री.प्रकाश जैन, अनिल पवार, अश्विनी बरलावार, नरेश थापा, अनिस खान, किरण खंडाईत इत्यादी उपस्थित होते.




आमचे चॅनल subscribe करा
