

दिनदर्शिकेवर जून महिन्यातील पानावर छापले चित्र
राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दुनेश्वर पेठेंविरुद्ध भाजप युवा मोर्चाची तक्रार
नागपूर,ता.२७ जून २०२३: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष दूनेश्वर पेठे यांच्याद्वारे छापलेल्या २०२३ च्या दिनदर्शिकेच्या (कॅलेंडर) जून महिन्याच्या पानावर महाराष्ट्राचे आराध्यदैवत विठ्ठलाच्या चित्रावर (चेहऱ्यावर) विचित्र बकरा व मस्जिदचे चित्र छापल्याचे समोर आले.यामुळे असंख्य हिंदू धर्मीय लोकांचा अपमान झाला असून याविरुद्ध आज भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा नागपूर शहराचे महामंत्री सचिन करारे यांच्या नेतृत्वात आणि युवा मोर्चा पूर्व नागपुरचे अध्यक्ष सन्नी राऊत यांच्या उपस्थितीत, शहर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना दुनेश्वर पेठेंवर त्वरित कार्यवाही करण्यात यावी याकरिता निवेदन देण्यात आले.येत्या २९ जून रोजी आषाढी एकादशी व बकर ईद हे दोन्ही सण एकाच दिवशी साजरे होणार आहेत.
आषाढी एकादशीचा सण हा संपूर्ण महाराष्ट्रात श्रद्धा व भक्तीभावाने उत्साहात साजरा होत असतो.अश्यावेळी विठ्ठलाच्या चेह-यावरच मस्जिद तसेच बक-याचे चिन्ह छापण्याचे काय कारण होते?असा संताप सचिन करारे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.यावरुन राष्ट्रवादी पक्षाची मानसिकता ही काय आहे हे दिसून पडते.हिंदूंच्या विषयी या पक्षाचे विचार या चित्रावरुन स्पष्ट होतात अशी टिका त्यांनी केली.

(छायाचित्र : पोलिस आयुक्तांन निवेदन देताना भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते)
हिंदूंच्या श्रद्धास्थानांचा एवढा गंभीर अवमान करण्याचा अधिकार मूळात राष्ट्रवादीला कोणी दिला आहे?पेठे यांच्या विरोधात आम्ही काल पारडी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली असून, आज पोलिस आयुक्तांकडे देखील पेठेंवर त्वरित कारवाई करण्यासाठी निवेदन दिले असल्याचे करारे यांनी सांगितले.येत्या दोन दिवसात पोलिस आयुक्तांनी दुनेश्वर पेठेंविरुद्ध कारवाई केली नाही तर भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे कार्यकर्ते हे रस्त्यावर उतरुन आंदोलन करतील असा इशारा त्यांनी दिला.
भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते हे आपले हिंदू देवदेवता व धर्माचा अपमान कधीही सहन करणार नाहीत आणि कोणालाही करु देणार नाहीत.राष्ट्रवादीचे दुनेश्वर पेठे यांनी जाहीररित्या त्वरित संपूर्ण हिंदू समाजाची माफी मागितली पाहिजे.असे कॅलेंडर छापून त्यांना काय सिद्ध करायचं होतं,याचा खुलासा त्यांनी करावा तसेच पोलिस आयुक्तांनी पेठे यांच्यावर तातडीने कारवाई करावी अन्यथा भाजप युवा मोर्चा आपल्या स्टाईलने कारवाई केल्याशिवाय राहणार नाही,असा इशारा करारे यांनी दिला.
या वेळी एजाज शेख, आशीष मेहर, अन्नू यादव, विकास रंहागले, शुभम पथाले, नितिन इटनकर, गोविंदा काटेकर, जयेश बिहारे, रित्रिक कापसे, शैलेश नेताम, कपिल लेंडे, शंकर विश्वकर्मा व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
……………………




आमचे चॅनल subscribe करा
