फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeक्राइमविकृत मानसिकतेच्या संपादकाविरुद्ध ‘ती’चा लढा

विकृत मानसिकतेच्या संपादकाविरुद्ध ‘ती’चा लढा

Advertisements

(संग्रहित छायाचित्र)

(पत्रकारितेच्या क्षेत्रातला डर्टी पिक्चर-भाग ४)

पत्रकारितेच्या क्षेत्रात फोफावलेल्या कीडला चक्क ‘राजाश्रय’

पंतप्रधान कार्यालयाला लिहलेल्या ‘ती’च्या पत्राबाबत कोणाचा ‘मौन’राग?

वेब पोटर्लवरील ‘ती’ची बातमी अवघ्या काही तासात गायब! आता ‘राजकारणी’ठरवणार का नागपूरात बातम्यांचे स्वरुप? प्रामाणिक पत्रकारांचा संताप

काँग्रेसवाल्याने केली भाजपवाल्यांची  ‘नैतिक’ मदत!नागपूरकरांमध्ये तीव्र संतापाची भावना

डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)

नागपूर,ता.३१ मार्च २०२३: याच वर्षी फेब्रुवरी महिन्यात’ती’ने पंतप्रधान कार्यालयाला लिहलेले पत्र दोन दिवसांपूर्वी नागपूरातील पत्रकार जगतात व्हायरल झाले आणि….प्रामाणिक पत्रकारांच्या डोक्याची आग मस्तकात गेली…‘ती‘चं पत्र इतकं व्हायरल झालं की अक्षरश: फक्त पत्रकार क्षेत्रातीलच नव्हे तर अनेक सनदी अधिकारी,शासकीय कर्मचा-यांच्या व्हाॅट्स ॲपवर ते पोहोचले! एका प्रतिष्ठित इंग्रजी दैनिकात काम करणा-या ’ती’ने या पत्रात तिच्या मनोविकृत संपादकानी स्त्री म्हणून,माणूस म्हणून आणि पत्रकारितेसारख्या पवित्र समजणा-या क्षेत्रातीत डेस्कवर काम करणारी एक अतिशय प्रामाणिक कर्मचारी म्हणून, तिचा गेल्या ३३ वर्षांपासून जो छळ मांडला आहे,त्याची व्यथाच या पत्रात तिने पंतप्रधान कार्यालयात पोहोचवली…..!

आपल्या पत्रात अनेक धक्कादायक मुद्दांना स्पर्श करत तिने पंतप्रधानाकडे न्यायाची अपेक्षा व्यक्त केली.मुळात काही वर्षांपूर्वी तिने धंतोली पोलिस ठाण्यात या मनोविकृत,लिंगपिसाट,स्त्रियांच्या देहाला मनोविकृत आनंदाचं खेळणं समजून, त्यांच्या आत्मसन्मानाला वारंवार जखमा करणा-या एका ज्येष्ठ संपादकाविरुद्ध तक्रार दाखल केल्यावरही, तिच्यावर पंतप्रधान कार्यालयाला पत्र  लिहण्याची वेळ का यावी?यावरच चर्चा घडत असून, त्या मनोविकृत संपादकाचा मालक भारतीय जनता पक्षातील एका घटनात्मक व प्रतिष्ठित पदावर असल्यामुळे, ज्या पोलिस अधिका-याने त्यावेळी तिची तक्रार नोंदवून घेतली होती त्याच्यावरच सस्पेंड होण्याची वेळ आली असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे!

एका अतिशय चांगल्या घराण्यातली स्त्री ही पत्रकारितेसारख्या क्षेत्रात मनोविकृत संपादकांच्या पुरुषी अहंकाराला दाद देत नसेल ,तर तिचा अगदी तीन-तीन दशके इतका छळ करावा?पुरुषार्थ तर बाजूला राहीला माणूसकीच्या कक्षात तरी असं वर्तन बसतं का?पोलिस ठाण्याच्या स्तरावर,न्यायाच्या दारावर तिच्या आत्मसन्मानाचा लढा अयशस्वी होताच, तिच्यावरील मानसिक,भावनिक छळवाद पराकोटीने वाढविणारा हा उन्मादी,मस्तवाल संपादक आहे तरी कोण?याचा शोध गेल्या दोन दिवसांपासून नागपूरच्या पत्रकारितेच्या क्षेत्रात घेतला जात आहे.

ती’चे पत्र वाचून दगडाला देखील पाझर फूटेल,वयाच्या वीसाव्या वर्षी प्रतिष्ठित समजल्या जाणा-या इंग्रजी दैनिकात, पवित्र समजल्या जाणा-या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाल्याने, डोळ्यात अनेक स्वप्न घेऊन ती रुजू झाली मात्र…फार फार भयाण वास्तव तिच्या वाटेला आले .क्षेत्र जरी पवित्र असलं तरी शेवटी ते ‘पुरुषच’चालवित असतात आणि पुरुषाला देवाने ‘लिंग’नावाचे एक अवयव दिले असल्याने त्या लिंगाला ,स्त्रीत्व आनंद देणारी बाब असल्यानेच, आपल्या वृत्तपत्रात काम करणा-या मुली,महिला या जणू आपलीच जागीर आहे अश्‍या समजूतीतून. हा लिंगपिसाट,मनोविकृत संपादक अनेकींचा छळ करु लागला,अद्याप ही करतो आहे….या नीच माणसाची मजल इतपर्यंत गेली ,सकाळच्या ऐवजी रात्री उशिरापर्यंत मुलींना शिफ्टमध्ये गुंतवून ठेवणे,मग घरी सोडण्याच्या बहाण्याने कारमध्ये बसवणे,त्यांना जबरीने मिठीत घेणे, त्यांच्या देहाला नको तिथे स्पर्श करीत विकृत आनंद घेणे हा त्या थेरड्याचा छंद बनत गेला…!ज्या मुलींनी विरोध केला त्यांच्या वाट्याला ‘ती‘च्या सारखा पराकोटीचा आणि तितकाच जीवघेणा छळ आला……!

त्याची मजल इथपर्यंत गेली तो संगणकावर काम करीत असलेल्या तरुण मुलींना कधीही जाऊन नको त्या ठिकाणी स्पर्श करीत असतो,असे का करता असा प्रश्‍न त्याला त्या ‘प्रतिष्ठित‘वृत्तपत्रात काम करणा-या तरुणी विचारतात तेव्हा हा  मस्तवाल संपादक ’एवढ्या मोठ्या वृत्तपत्रात तुम्हाला काम करण्याची संधी देतोय ही त्याची परतफेड आहे!’असे उत्तर देतो….!

वार्धक्याकडे पार झुकलेल्या या संपादकाने वयाची पंचाहत्तरी ही ओलांडली आहे मात्र ‘कृत्य’तरुणाईलाही लाजवेल अशी करत असतो. दूर्देव आहे त्या तरुणींचे की त्यांचा मालक एवढ्या बलाढ्य राजकीय पक्षाचा .नेता आहे.. सत्तेच्या उन्मादात ज्यांच्या लेखी स्त्री म्हणून या धरणीवर जन्माला आलेल्या स्त्रियांच्या शारिर वा आत्मिक भावनांना काडीचीही किंमत तो राजकारणी देत नाही आणि आपल्या संपादकाची… त्यांच्या वृत्तपत्रात काम करणा-या महिलांच्या एवढ्या तक्रारी आल्यानंतरही  उचलबांगडी करत नाही,…!

श्‍मशान घाटावर गोव-या पोहचलेल्या या अतिशय नालायक वयोवृद्ध, संपादकाला हात ही लावण्याची हिंमत या राजकारणी मालकाला का होत नाही? या बाबत गेल्या अनेक वर्षांपासून नागपूरच्या वृत्तपत्र जगतात चर्चा होत असते… मालकाच्या भ्रष्टाचाराचा संपूर्ण लेखाजोखाच  त्याच्याकडे असल्याची चर्चा ही रंगते…!मालकाची हिंमत किमान तो मरेपर्यंत तरी त्याला कितीही तक्रारी आल्यातरी पदावरुन हटविण्याची होत नसल्याचे किस्से ही रंगतात…! त्यामुळेच या नालायक संपादकाची मजल.. आपल्याच वृत्तपत्रात काम करणा-या तरुणी व महिलांचे खुलेआम लैंगिक शोषण करण्यापर्यंत पोहोचली असल्याचे बोललं जात असतं…!

ती‘ च्या दूर्देवाने नागपूरातील तत्कालीन खरोखरंच चांगल्या इंग्रजी दैनिकात रुजू होण्या ऐवजी तिला या वृत्तपत्रात प्रशिक्षणार्थी उपसंपादक म्हणून काम करण्याची संधी मिळाली,लेखी परीक्षा व मुलाखत उत्तीर्ण झाल्यावर या वृत्तपत्राच्या मालकाने तीला रुजू करुन घेतले,तिच्या तरुण देहामुळे नव्हे तर तिच्यातील कर्तृतव व बुद्धिमत्ता बघून तिला ही नोकरी मिळाली होती.

ती रुजू होताच तरुणींना आपल्या बापजाद्यांची जागीर समजणा-या या संपादकाने तिला तिचे काम सोडून त्याच्यासोबत ‘बाहेर’येण्यास सांगितले!त्यावेळी ती चार महिन्यांची गरोदर होती.त्याच्या लैंगिक चर्चा व विकृतीला तीने दाद दिली नाही.तिचा नवरा ही याच वृत्तपत्रात चांगल्या पदावर काम करीत होते..त्यांचा प्रेमविवाह होता…स्त्री ही आपल्या देहाला त्यालाच स्पर्श करु देते ज्याच्यावर तिचं प्रेम असतं,वृत्तपत्र क्षेत्रातील जरी काही स्त्रिया‘शॉर्ट कट’मार्गाने व संपादकांना खुश करुन वरिष्ठ पदापर्यंत पोहोचल्या असल्या तरी ‘ती’तशी नाही….!,

तिच्या दूर्देवाने १५ जुलै २००२ रोजी मुलांना सेंट झेव्हीयर शाळेतून आणण्यासाठी गेले असता हिंगणा टी.पॉईंटवर झालेल्या अपघातात तिच्या पतीचा मृत्यू झाला.हा अपघात देखील संशयास्पद असल्याची चर्चा त्यावेळी देखील रंगली होती…!रामदासपेठेतील एका मोठ्या रुग्णालयात त्याचे कलेवर डोळ्यासमोर असतानाही पूर्णत:कोसळून पडलेल्या… तिला या संपादकानी आपल्या कवेत नव्हे तर घट्ट मिठीतच घेतले…. काळजी कशाला करतेस मी आहे ना?अश्‍या शब्दात तिचे सात्वन केले……!

ती‘चे वय त्यावेळी फक्त ३७ वर्ष होते.ऐन तारुण्यात वैधव्याचं दूखं,कामाची गरज,मुलांचा एकटीने सांभाळ त्या एक लिंगपिसाट संपादकाच्या हाताखाली चारित्र्य व आत्मसन्मान सांभाळून काम करने,या दिव्यातून ती जात होती,आता तर तीची लढाई ही एकटीची होती,सहकारी,संपादक,मालक आणि नियती यासर्वांसोबतचा तिचा लढा सुरु होता…!

एवढ्या वर्षात कोणकोणत्या दिव्यातून तिला जावे लागले,तिचा पगार,तिच्या सुट्या,लहान लहान मुले एकटी घरी असताना तिला रात्री ९ वाजेपर्यंत कामच देत राहणे,मुद्दामून तिच्या कामात शुल्लक अश्‍या त्रुट्या काढणे,पुन्हा कामाला जुंपणे,तिच्या कामावर ‘विधवा टाळा’असा शेरा देणे….कोणत्याही संवेदनशील मन असणा-या माणसाकडून असे वर्तन घडूच शकत नाही मात्र मुळात जो माणसाच्या वेशात दानव आहे…ज्याला अश्‍या अमानवीय वर्तनाचे काहीच वैषम्य वाटत नाही.

या सर्व सततच्या व इतक्या दशकांच्या तानतणावात तिला स्तनाचा कर्करोग झाला….!२२ ऑक्टोबर २०२१ रोजी नॅशनल इन्सिटट्यूट ऑफ कॅन्सर जामठा येथे तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.प्रत्येकी १५ दिवसांच्या फे-यात तिला किमोथेरपी घ्यावी लागली.किमोच्या आठ फे-या तिला सोसाव्या लागल्या.रेडिएशनचे वीस चक्र घ्यावे लागणार असल्याने, अनेक महिन्यांच्या रजेची तिला गरज होती.मालकाने ‘उदार’ मनाने तिच्या रजेचा अर्ज मंजूर ही केला मात्र डॉक्टरांच्या सल्ल्याने १५ मे २०२२ रोजी ती पुन्हा कामावर रुजू झाल्यावरही… तिच्या सुट्यांचा पगार त्या माणूसकी नसलेल्या संपादकांनी कापला…..!घरगुती खर्च त्यात वैद्यकीय उपचार यासाठी त्या स्वाभिमानी स्त्रीच्या डोळ्यात पाणी तरळले….!
.

अजूनही तिच्या निवृत्तीचे दोन वर्ष बाकी आहेत,या सर्व तानताणावामुळे तिला स्तनाच्या कर्करोगासोबतच अस्थमाही जडला.तिला श्‍वास घ्यायला त्रास होतो तेव्हा तिच्या डोक्यावरील पंखाही हा संपादक जाणून बंद करतो,ती कासाविस होते,घामाघूम होते मात्र तिच्या देहाच्या आणि मनाच्या वेदना या असूर संपादकाला आसुरी आनंद देणा-याच ठरतात.

नागपूरच्या पोलिस ठाण्यापासून तर नागपूरच्या कोणत्याही न्यायालयात जरी ती गेली तरी तिला दाद मिळणार नाही असे बेधडकपणे हा संपादक तिला सांगतो..या मागे राजकीय वजन,मालकाची हतबलता,तंत्र मंत्रांची शक्ती...सगळं जणू तिच्या विरोधातच काम करतेय,अश्‍यातच तिने शेवटचा पर्याय म्हणून सदैव ’मन की बात’करणा-या पंतप्रधान नरेंद्र मोदींना हे पत्र लिहले…मोदींनी मनाची नव्हे तर पुरोगामी महाराष्ट्राच्या उपराजधानीत त्यांच्याच राजकीय पक्षाच्या एका प्रतिष्ठित नेत्याच्या वृत्तपत्रात, अतिशय प्रामाणिकपणे काम करणा-या एका ‘स्त्री ची बात’ऐकावी व त्यावर कारवाई करावी,अशी तिची अपेक्षा आहे.

पंतप्रधान कार्यालयाला फेब्रुवरी महिन्यात दिलेल्या या पत्रावर अद्याप काय कारवाई झाली?हे गुलदस्त्यातच आहे.या तक्रारी बाबत योग्य दखल घेण्याची सूचना नागपूरच्या पोलिस आयुक्तांना तेव्हाच दिल्याची देखील चर्चा आहे किवा आपल्या पक्षाची बदनामी नको म्हणून हेतुपुरस्सर या पत्राला पंतप्रधान कार्यालयाने केराची टोपली दाखविल्याचा देखील कयास लावला जात आहे.

मात्र,याच पत्राचा आधार घेऊन नागपूरातील एका वेब पोर्टलने फार दिमाखाने ही बातमी प्रसिद्ध केली.सर्व व्हाॅट्स ॲप ग्रूप्सवर ती व्हायरल झाली मात्र माशी लगेच ‘राजकीय’स्तरावर शिंकली अन्…..दोन प्रामाणिक पत्रकारांना या वेब पोर्टलसाठी केलेल्या बातमीला वेबसाईटवरुन डिलीट करावे लागले…….!

या वृत्तपत्राचा मालक भाजपचा असला तरी या वेब पोर्टलची पन्नास टक्के भागीदारी ही काँग्रेसच्या एका माजी खासदार पुत्राकडे आहे…..!या वृत्तपत्राच्या मालकाने या काँग्रेसच्या नेत्याला फोन लावताच….त्यांच्या सूचने बरहूकूम क्षणार्धात ही बातमी त्याने वेबसाईटवरुन काढायला सांगितली….!

जमीनीस्तरावर अदानी व राहूल गांधी यांच्या खासदारकी रद्द करण्यावरुन या दोन्ही राजकीय पक्षात सध्या पराकोटीचे रणकंदन माजले असून …आंदोलनाची धग पेटली असतानासुद्धा ’नैतिक’बाबीमध्ये हे दोन्ही पक्ष किती समसमान आहे,याची प्रचिती नागपूरकर जनतेनी अनुभवली….!.

एकीकडे बातम्यांची खातरजमा करण्याचे अधिकार प्रेस इन्फमेंशन ब्यूरोला(पीआयबी)ला देण्याचे आणि दुसरीकडे सोशल मिडीयावरील ‘फेक’वाटणारा तपशील ‘ऑनलाईन मध्यस्थ’ काढून टाकतील,अशी एक नवी दुरुस्ती इलेक्ट्रॉनिक्स अँड आयटी मंत्रालयाने… माहिती तंत्रज्ञान नियम २०२१ मध्ये केली,त्या विरोधात काँग्रेस पक्षाने निकरीचा लढा देण्याऐवजी भाजपवाल्यांच्या मदतीसाठी चक्क व्हायरल झालेली बातमीच आपल्या वेबसाईटवरुन काढून टाकणे, हे काँग्रेस पक्षाच्या कोणत्या नैतिकतेत बसतं?असा सवाल आता नागपूरातील काँग्रेस नेत्यांना विचारला जात आहे. या कायद्याच्या माध्यमातून सरकारला न्यायालयाच्या हस्तक्षेपाशिवाय कोणतेही वृत्त थांबविणे,दुरुस्त करणे किवा डिलीट करण्याचा अधिकार मिळणार आहे.यामुळे डिजिटल वृत्त माध्यमांवर आणि पर्यायाने माध्यमांवर अनावश्‍यक निर्बंध या विधेयकामुळे लादले जाणार आहेत,हे विशेष!

एकीकडे दिल्ली पोलिसांनी नुकतेच ‘द वायर’चे संपादक सिद्धार्थ वरदराजन, एम.के.वेणू,सिद्धार्थ भाटिया आणि जान्हवी सेन यांच्या निवासस्थानी छापे टाकले,संपादकांच्या घरातून लॅपटॉप,मोबाईल फोन आणि अन्य उपकरणे जप्त करण्यात आली. भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते अमित मालवीय यांनी तक्रार केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली,हे विशेष. साेशल मिडिया कंपनी ‘मेटा’बाबत ‘द वायर’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्त मालिकेसंबंधी मालवीय यांनी ही तक्रार केली होती .विशेष म्हणजे २३ ऑक्टोबर रोजी ‘द वायर’ ने या बातम्या मागे घेतल्या मात्र सत्ताधारी पक्षाच्या प्रवक्त्यांनी दाखल केलेल्या बदनामीच्या ‘खासगी’ तक्रारीच्या आधारे पोलिसांनी संपादकांच्या घरांवर छापे टाकले….!

नागपूरात मात्र काँग्रेसचा एक युवा नेताच अप्रत्यक्षपणे भाजपच्या या अश्‍या कृत्यांना समर्थन देत.. वेबसाईटवरील पन्नास टक्के भागीदारीतून… एक कर्करुग्ण झालेल्या व खूप काही भोगलेल्या स्त्रीची व्यथाच लगेच काढून फेकतात….त्यांच्या या कृतीसाठी नैतिकतेच्या व कायद्याच्या कोणत्या भाषेत शब्द शोधावे…?असा सवाल आता विचारला जात आहे.

आपली लोकशाही आत विकसित झाली आहे,त्यामुळे टिका आणि व्यंग हे लोकशाहीचे हॉलमार्क बनले आहे,अशात सोशल मिडिया हे अभिव्यक्तीचे सशक्त व्यासपीठ आहे,असे निरीक्षण २२ डिसेंबर २०२२ रोजी म्हणजे अवघ्या चार महिन्यांपूर्वीच मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नोंदविले आहे. बडनेराचे आमदार रवी राणा यांच्या फेसबुक पेजवर अपमानास्पद आणि आक्षेपार्ह्य पोस्ट केल्याप्रकरणी एका तरुणा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला,तो गुन्हा रद्द करण्याची विनंती करणारी याचिका त्या तरुणाने दाखल केली,त्यावरील सुनावणी दरम्यान न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवले होते.एकीकडे न्यायालये सोशल मिडीया अभिव्यक्तीचे सशक्त माध्यम असल्याचे मत व्यक्त करीत असताना,हीच माध्यमे… काही राजकीय नेते… केवळ एकमेकांच्या सोयीस्कर स्वार्थासाठी कशी वापरतात,त्या वेबसाईटवरुन गायब केलेल्या ’ती’च्या बातमीवरुन याची प्रचिती येते.

एवढंच नव्हे तर आज आपण २१ व्य शतकात आहोत,तरी आजही मुलींना वस्तू म्हणून सजजले जात आहे आणि तशी वागणूक देत त्यांचा आर्थिक लाभांसाठी वापर केला जातो,हे नीतीमूल्ये व मानवी हक्क व तत्वाच्या दृष्टिने अत्यंत आक्षेपार्ह्य आहे,असा तीव्र संताप मुंबई उच्च न्यायालयाने आर्थिक चणचण असलेल्या महिलेची एक वर्षाची मुलगी विकत घेणा-या आरोपी महिलेच्या जामीन अर्जावर व्यक्त केला होता.स्त्रीत्वाचा सन्मान करणा-या त्याच न्यायालयापर्यंत दशकांपासून एका मनोविकृत मानसिकतेच्या संपादकाशी लढा देणा-या एका स्त्रीची व्यथा पोहोचणे दुष्कर झाले आहे….!

नुकतेच सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी एका कार्यक्रमात बोलताना,न्यायालयीन खटल्यांमधून स्त्रीत्वाचा अपमान करणा-या ‘रखेल’सारखे शब्द हद्दपार करुन त्या ठिकाणी पर्यायी शब्द रुजू करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे सांगितले.दूसरीकडे वृत्तपत्रासारख्या क्षेत्रात काम करणा-या मुलींच्या देहाला एक मनोविकृत संपादक हवे तेव्हा किळसवाणा स्पर्श करुन त्यांच्या आत्मसन्मानाची दररोज राखरांगोळी करताना आढळतोय…..!

‘सत्ताधीश’ने ’ती’च्या सोबत संवाद साधला असताना,मी लढत राहणार जोपर्यत मला न्याय मिळणार नाही असा निर्धार तीने व्यक्त केला…..!माझा लढा हा आता माझ्यासाठी नसून या क्षेत्रात येणा-या व काम करणा-या तरुण मुलींच्या स्वाभिमानासाठी असल्याचे ‘ती’सांगते….!

पोलिस विभागाने राजकीय दबावातून जरी माझ्या तक्रारीला केराची टोपली दाखवली,कामगार न्यायालयातून मला माझा लढा मागे घ्यावा लागला असला तरी….कदाचित न्यायदेवतेसमोर व राज्य महिला आयोगासमोर दाद मागणार असल्याचेही मनोगत ‘ती’व्यक्त करते……!

‘सत्ताधीश’चा ’ती’च्या या चारित्र्य व आत्मसन्मानाच्या लढ्याला कोटी कोटी सलाम…!

सत्ताधीश’कडे ’ती’चे पत्र…..
To,
The PMO,
NEW DELHI.
Sir,
My name is…… I am 57. I joined The ……..as a trainee Sub-Editor in April 1990
after clearing written test and interview.
………….was the Managing Editor while his son ………….was then the General Manager. Presently, he is the Managing Director of ………..
Soon after I joined, the Editor…. asked me to leave my work and accompany him
outside for a ‘coffee,’ a ruse for engaging in filthy sex talk with women staffers. This was despite the fact that I was four months pregnant! My husband was in the same shift. My husband and I quietly continued our work with bowed heads. The Editor, to this day, continues to harass me over this move. I apprised ……..of the ongoings. No action was visible on the ground.
Violation of basic rules: The Editor has superannuated 15 years ago. Yet, ………has adamantly refused to find a suitable person for the job and Mr ……..continues to be the Editor at 75 years of age! Needless to say, he ill-treats the staff with impunity and openly philanders with women staffers.

Ill treatment of women staffers in night shifts: Given his weakness for women, the Editor has brazenly gone ahead and employed a substantial number of women staffers. They are coerced into doing night shifts. The Editor offers to drop them home in his car when they get late at work and embraces and gropes them in his car. The women staffers have been forced to put up with this behaviour as the Management has adamantly refused heed to complaints about him.
Misbehaviour by Editor in full public view: Even in the morning shift, the Editor has been known to approach women staffers’ desks and grope and touch them inappropriately. When asked why they put up with the shoddy behaviour, they say that this is the price one pays for working in ‘………’.
Absence of HR Department and Women’s Cell: Though ……….a employs a large number of women
staffers, no effort has ever been made to put in place a mechanism to redress their grievances.

There is neither a H.R. Department nor a Women’s Cell as stipulated by rules. In case of work place related grievances, I have been left with no alternative but to approach the Managing Director Mr…….. He has repeatedly, adamantly refused to accept that there is trouble brewing in the set up.

Non-implementation of recommendations of Wage Board: –
Though Majithia Wage Board notified in 2011 had suggested a large number of welcome changes in the wage structure of newspaper employees, the same have been brazenly flouted by Mr….. The employees were paid arrears and given a raise five years ago. Though I am one of the senior most employees at the Maindesk, the pay hike was nominal. The Management has not effected a single pay hike after this in total contravention of Wage Board recommendations. …….workers union has filed a case against the management over non-payment of wage hikes.
Persistent denial of leave: Though the organization offers 15 casual leaves, 10 medical leaves and 30 days of Earned leave, availing of the same has been a permanent problem for me. The Establishment Section is always evasive about the leave available for me and has persistently denied the same. I had availed of leave from January 24 to 28. My salary for the period was cut. I was told that I simply did not have the necessary leave. When I approached Mr ……….., he berated me making an issue of a ‘2-day’ pay cut. He insisted that the organization did not indulge in ‘such activities.’

Denial of salary during cancer treatment: In September 2021, I was diagnosed as suffering from Grade III breast cancer. I had availed of leave to undergo Breast Reconstruction Surgery. The Surgery was performed on October 22, 2021. After recovery, National Institute of Cancer, Jamtha, prescribed 8 rounds of Chemotherapy to be undertaken at an interval of 15 days each. This was to be followed by 20 cycles of Radiation. As the treatment would entail several months of leave, I approached Mr ……..for the same. He cleared leave only after making me sign an application that I will not be entitled to my salary during the period of treatment. My last Radiation cycle was performed on May 4, 2022. With the consent of doctors, I joined office on May 15, 2022, as it became very difficult to manage household and medical expenses in absence of salary.

Acute harassment after my husband’s demise: My husband ………working then as a Deputy Editor with……, passed away in a road mishap on July 15, 2002. a ………..former employee, was recruited in his position. Along with the Editor, Mr …………..made my life a hell. Mr ………..continually derided me in office. He issued a slew of meaningless memos to intimidate me. Though the Management allowed me to operate in morning shifts in view of the fact that my children very young and there was nobody to look after them at home, Mr ……..tried to coerce me come in night shifts. When I refused, he would not let me go home till 9 pm! Even though I would submit my pages well within the deadline, he would force me to complete new comers’ pages till 9 pm. Along with the mindless corrections on my pages, Mr ………..would return my pages with the remark ‘Avoid widows’! My …….would laugh derisively at the daily spectacle. Left with no choice, I approached Mr ………. and apprised him of my daily travails. I pleaded with him to atleast change my section as the daily torment was too much for me.

He listened to me expressionlessly and sure enough, did nothing. This daily torture went on for 14 years till Mr ………. retired in 2017!

Acute workplace harassment by the Editor: Comppletely exasperated by the daily harassment, I submitted a written complaint to the Labour Court . I also filed a complaint against the Editor at
Dhantoli Police station. However, the police shamelessly colluded with the Management and scuttled the case. I was berated by Mr …………….for engaging in activities that would undermine the ‘prestige’ of the organization. I was forced to withdraw my complaint at the Labour Court. No visible action has been taken against the offending Editor who continues to ill treat staff.
Mr …………..is particularly fond of addressing staff meetings lasting over two hours during which he not only heaps the filthiest possible abuse on staffers, he abuses our parents too! The incensed staff apprised Mr ………..of the ongoings. What transpired between the two is not known.
The menace of such senseless meetings continues unchecked!

Difficulty in obtaining in legal counsel in town: Tormented by the persistent workplace harassment,
I have tried to approach several Labour lawyers in Nagpur. They have simply backed out of helping me as Mr ………..is known to brazenly stifle any dissent by staffers in his numerous organisations. When they sought legal help to avail of better payscales, Mr ……………..has subverted the course of justice using his financial resources and his father’s political clout.

Sir, what I have elaborated upon is just the tip of the iceberg. What goes on here is much worse. I sincerely hope justice is done to the long suffering staff of……….. On my part, I promise to render fullest possible co-operation if a probe is undertaken by the authorities concerned.

Thanking you in anticipation,
Yours sincerely,
‘………………..’

…………………..

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या