फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजविकास ठाकरे यांनी आणखी एकदा हिम्मत करुन कॉटन मार्केटला यावे!

विकास ठाकरे यांनी आणखी एकदा हिम्मत करुन कॉटन मार्केटला यावे!

Advertisements

आमदार विकास ठाकरेंच्या नेतृत्वात जनतेनी कॉटन मार्केटमधील लाकडी अवरोधक काढून फेकले

नागपूर,२८ मे: काल बुधवार दि.२८ मे रोजी शहराचा मध्यवर्ती भाजी असणारा बाजार कॉटन मार्केटला ४ वाजताच्या सुमारात भीषण आग लागली.या जवळपास २० ते २५ दूकाने जळून खाक झाली. मात्र महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानुसार कॉटन मार्केटच्या आतील गल्ल्या या सर्व लाकडी बल्ल्लया व टिना टाकून सील करण्यात आल्यामुळे आगीचा वणवा जास्त भडकला असल्याचा अारोप येथील व्यापा-यांनी आमदार विकास ठाकरे यांच्याकडे केला.परिणामी आज सकाळी आ.विकास ठाकरे यांनी कॉटन मार्केटमध्ये भेट देताच येथील नागरिकांनी बाजारातील आतील भागात गल्लोगल्ली असणारे अडथळे उस्फूर्तपणे काढून फेकले.
आ.विकास ठाकरे यांनी भेट दिल्यामुळे येथील भाजी विक्रेत्यांना व ठोक व्यापारांना मानसिक दिलासा मिळाला आहे. विकास ठाकरे यांनी आणखी एकदा कॉटन मार्केटला भेट दिल्यास आमची खचलेली हिम्मत पुन्हा येईल व आम्ही मुंढेंच्या अन्यायाविरोधात लढा देऊ शकू,असे विधान येथील व्यापा-यांनी केले.

एप्रिल महिन्यात महापौर संदीप जोशी यांनी देखील कॉटन मार्केट येथील व्यापा-यांशी बोलणे करुन,कोरोनासंबंधी शासनाचे सर्व दिशानिर्देशांचे पालन करुन हा बाजार अडतिया,ठोक विक्रेते,फूटकल विक्रेते व ग्राहकांसाठी सुरु करण्यात यावा,असे आदेश मनपा प्रशासनातील अधिका-यांना दिले होते मात्र मुंढे यांनी महापौरांचे आदेश धूडकावत ‘कॉटन मार्केट बंदच राहील’अशी आठमुठी भूमिका घेतली होती.

परिणामी चौथे लॉक डाऊन संपत आले असले तरी कॉटन मार्केटमधील व्यापा-यांमागील संकाटांचे शुक्लकाष्ठ संपता संपत नाही. गेल्या तीन महिन्यांपासून दूकाने बंद असल्यामुळे येथील व्यापारी वर्ग अत्यंतिक आर्थिक अडचणीत अाला असून आता त्यांचे मानिसिक व भावनिक खच्चीकरणही होत आहे.आ.विकास ठाकरे यांच्या आजच्या आंदोलनामुळे येथील व्यापा-यांनी आपापल्या दूकानांचे शटर पटापट उघडले,हे विशेष्!

गरीबाकडून वसूल केला मनपाने दंड-
कर्तव्य कठोर मुंढे यांच्या शिस्तीचा असर वसूली करणा-यांवर देखील किती खोलवर रुजला आजे याचे उदहारण म्हणजे एका अत्यंत गरिब आलू-कांदे विक्री करणा-या विक्रेत्याकडून मनपा प्रशासनाच्या कर्मचा-यांनी सायंकाळी ७ नंतर अगदी थोडासा उशिर झाला आणि त्याने एका ग्राहकाला आलू-कांद्याची विक्रि केली.इतक्यात बाजारात चोख बंदोबस्त ठेवणारे कर्मचारी त्याच्या जवळ पोहोचले आणि…रोख दंड वसूल केला. नाव न छापण्याच्या अटीवर त्याने खास ‘सत्ताधीश’कडे हे दू:ख व्यक्त करुन सांगितले,‘मॅडम तुम्हाला दंडाची रक्कम आणि पावतीचे चित्र पाठवले तर ते मला ओळखून घेतील’त्यामुळे ‘सत्ताधीशने’ तो गरीब विक्रेता अडचणीत येऊ नये म्हणून बातमीत दंडाची रक्कम नमूद केली नाही.रणरणत्या उन्हात दिवसभर त्या गरीब विक्रेत्याने जे कमावले ते कर्तव्यकठोर आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखालील कार्यरत मनपा प्रशासानाने एका क्ष् णात त्याच्याकडून वसूल केले,काय गुन्हा होता त्याचा? तर त्याने ७ वाजून काही मिनिट झाल्यावर एका ग्राहकाला आलू-कांद्याची विक्रिी केली!

दिहाडी महीला मजुरांच्या डोळ्यात तरळले अश्रू-
एकेकाळी ग्राहक,अडतिया,ठोक विक्रेते,आलू-कांदे विक्रेते, फूटकळ विक्रेते यांनी गजबजलेले कॉटन मार्केट हे गेल्या तीन महिन्यात प्रशासनाच्या निर्णयामुळे पूर्णपणे आसे पडले आहे. या बाजाराची पार रयाच गेली असल्याने,मनभर भार दिवसभर आपल्या डोक्यावर उचलणा-या काही दिहाडी महीला मजुरांच्या डोळ्यात आज चक्क पाणी आले. पोटाचा प्रश्‍न त्यांनाही छळत होता. परप्रांतातील असल्यामुळे घर भाड्याने घेऊन नागपूरात राहत आहे मात्र अाता घरमालकाने देखील पैश्‍यांसाठी मागे तकादा लावला आहे.येथे बाजारात मात्र व्यवसायच होत नाही. सगळा कारभार ठप्प पडला आहे.
कोरोनातर नागपूर शहरात तसाही वाढला. करु दिला असता व्यवसाय तर प्रशासनाचे काय बिघडले असते?आम्ही सगळे नियम-अटी पाळल्या असत्या.मात्र मुंढेंनी पोटावरच लात घातली असल्याचा संताप येथील काही व्यापारी व्यक्त करीत होते.

आधीच २५ गुन्हे,मुंढेंनी आणखी गुन्हे दाखल करावे,जनतेसाठी आंदोलन करीत राहणार-आ. विकास ठाकरे
माझ्यावर अाधीच राजकीय आंदोलनाचे २५ गुन्हे दाखल आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आणखी कितीही गुन्हे दाखल केले तरी जनतेच्या प्रश्‍नासाठी रस्त्यावर लढतच राहणार. मुंढे हे २००५ साली नागपूरात जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी जरी राहीले असतील तरी मी गेल्या १५ वर्षांपासून महापालिकेतील नगरसेवक असून ३ वर्ष महापौर पदी होतो.मला जनप्रतिधिनी म्हणून जनतेच्या प्रश्‍नाची जाणीव आहे. कॉटन मार्केटबाबतचा निर्णय मुंढे यांनी परस्पर घेतला. कोणत्याही जनप्रतिनिधींना विश्‍वासात घेतले नाही.
कॉटन मार्केट हे १५० वर्ष जुने मार्केट असून या ठिकाणी संपूर्ण भाजी मार्केटसंबधी पायाभूम साेयी निर्माण करण्यात आले आहे. भाजी मार्केट,ठोक व्यवसायी,आलू-कांदा ओळ इ. सुविधा नागपूर शहरात इतर कोणत्याही ठिकाणी नाही. तरी देखील अट्टहासाने मुंढे यांनी संपूर्ण मार्केट गेल्या तीन महिन्यांपासून बंद ठेवले व शहरातील नागरिकांच्या घरासमोर भाजी बाजार भरवला.आयएसआय अधिका-याचा यालाच दूरदर्शी निर्णय म्हणतात का? घरा समोर भाजी बाजार भरवण्यात आल्यामुळे शहरातील नागरिक एक तर प्रचंड दहशतीखाली आले दूसरे त्यांना भयंकर त्रास झाला. कॉटन मार्केटमध्ये समजा ३०० व्यापारी आहेत तर १००-१०० व्यापा-यांना आठवड्यातून तीन दिवस व्यवसाय करण्याची दूरदर्शिता मुढेंनी का नाही दाखवली?

या शहरातील जनतेने ४ लॉक डाऊन आधीच सहन केले आहे. नागरिकांचा संयम आता संपत आला आहे.अापापला व्यवसाय,दूकाने बंद करुन नागरिकांनी घरातच बसावे,तर लाेकं जेवणार काय?कुटुंबियांचे भरण-पोषण करणार कसे?नागपूरात फक्त मुंढेंची फक्त ‘दडपशाही’सुरु असल्याचा अारोप ठाकरे यांनी केला.

अनेक झोन आणि प्रभाग प्रतिबंधित क्ष्ेत्र घोषित करताना ५-५ किलोमीटरचा रस्ता बंद करण्यात आला. येथील नागरिकांना बंदिस्त कारागृहात राहवे लागत असून या भागातील गुरे-ढोरे हे उपाशी मरत आहेत. २८ दिवसांचा नियम सांगून आता कुठे दोन दिवसांपूर्वी यामधील ६ क्ष्ेत्र त्यांनी खुले केले मात्र या क्ष्ेत्रातील नागरिकांना जिवनावश्‍यक गोष्टींसाठी देखील भर उन्हात वणवण भटकावं लागलं.
कायद्याप्रमाणे कंटेनमेन्ट झोनमध्ये जिवनावश्‍यक वस्तूंची दूकाने,औषधांची दूकाने, चिकन-मटणची दूकाने,मोबाईल रिचार्जची दूकाने ही सुरु राहीली पाहिजे.नागपूरात ४० च्या वर प्रभाग मुंढेंनी सील केले,यात शहरातील सहा सर्वात मोठे झोन होते, या भागातील हजारो नागरिकांना या सर्व जिवनावश्‍यक वस्तू मिळवण्यात तो त्रास झाला त्याला जवाबदार कोण?असा सवाल त्यांनी केला.

शहरासंबधी निर्णय घेताना मुंढे हे पदाधिकारी,जनप्रतिनिधी,नगररसेवक कोणाचीही चर्चा करीत नाहीत. स्वत:पालकमंत्री नितीन राऊत यांचे विधान आहे’नागपूर शहराला पुन्हा रेड झोन घोषित करताना मुंढे यांनी कोणत्याही मंत्र्यांनातर सोडा पालकमंत्र्यांना देखील विश्‍वासात घेतले नाही!’

काँग्रेसच्या नगरसेवकावर मुंढेंची कारवाई-
सतरंजीपुरा येथील काही नागरिकांना विलगीकरण केंद्रात घेऊन जाण्याचा मुंढे यांनी अादेश दिला मात्र या नागरिकांना कपडेलत्ते,औषधे,जिवनावश्‍यक गरजेच्या वस्तूसोबत घेऊन जाण्याचाही वेळे प्रशसनाने न दिल्यामुळे काँग्रेसचे नगरसेवक यांनी नितीन साठवणे यांनी विरोध केला. आधी येथील नागरिकांना दोन तासांचा वेळ देण्यात यावा मग विलगीकरणात घेऊन जावे,अशी मागणी त्यांनी केली मात्र शासकीय कामात अडथळे आणल्याच्या विरोधात कलम १८८ लावून त्यांच्या विरोधात लकडगंज पोलीस ठाण्यात मुंढेंनी गुन्हा दाखल केला.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या