फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजविकास ठाकरे यांच्या कारमधून भरारी पथकाने केले एक लाख ५ हजार रुपये...

विकास ठाकरे यांच्या कारमधून भरारी पथकाने केले एक लाख ५ हजार रुपये जप्त

Advertisements

नागपूर: पश्चिम नागपूर मधून काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांच्या कारमधून निवडणूक विभागाच्या भरारी पथकाने एक लाख ५ हजार रुपये जप्त केले.

रविवारी रात्री परिमंडळ ५ चे पोलिस उपायुक्त निलोत्पल यांची संपूर्ण शहरात रात्रगस्त होती. रात्रगस्त करीत असताना ते सदर हद्दीतील राजनगर येथील मसंद हॉस्पिटलसमोर आले. त्यावेळी निलोत्पल यांना सिल्वर रंगाची मारूती स्विफ्ट कार संशयास्पद अवस्थेत दिसून आली. कारजवळच पश्चिम नागपूरचे काँग्रेसचे उमेदवार विकास पांडुरंग ठाकरे  आणि आमदार प्रकाश गजभिये हजर होते. पोलिसांनी कारची झडती घेतली असता त्यात पांढऱ्या रंगाच्या २० लिफाफ्यामध्ये प्रत्येकी ५ हजार रुपये आणि खुल्या स्वरूपात ५ हजार असे १ लाख ५ हजार रुपये मिळून आले.

कारमध्ये पैसे मिळाल्याचे समजताच परिमंडळ २ च्या उपायुक्त विनिता साहू, सहायक पोलिस आयुक्त रेखा भवरे आदी अधिकारी घटनास्थळी आले. त्याचप्रमाणे भरारी पथक ४ चे प्रभारी लोकेश गुप्ता आणि ३ चे अशोक गोटांगळे यांनाही घटनास्थळी पाचारण करून त्यांच्या ताब्यात पैसे दिले. त्याचप्रमाणे ज्या कारमध्ये नोटा सापडल्या ती कारसुद्धा जप्त करण्यात आली. भरारी पथकाच्या ताब्यात पैसे आणि कार देण्यात आली.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या