फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजविकास ठाकरेंच्या विरोधात भाजपची निवडणूक आयोगात तक्रार

विकास ठाकरेंच्या विरोधात भाजपची निवडणूक आयोगात तक्रार

Advertisements

आमच्या तक्रारींचे काय झाले?अतुल लोेंढे यांचा सवाल

नागपूर,ता.१८ एप्रिल २०२४: लोकसभेच्या उमेदवारीसाठी मतदान काही तासांवर येऊन ठेपले असता,आज भारतीय जनता पक्षाच्या लीगल सेलच्या वकीलाकडून काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांच्या विरोधात आचार संहितेचे भंग केल्याप्रकरणी तक्रार करण्यात आली आहे.ॲड.परिक्षीत गजानन मोहीते यांनी ही तक्रार केली आहे.

काल दिनांक १७ एप्रिल रोजी नागपूरातील एका हिंदी दैनिकात विदर्भ महासभाचे अध्यक्ष सदन यादव यांच्यातर्फे विकास ठाकरे यांच्या समर्थनार्थ एक जाहीरात प्रसिद्ध झाली,त्यात जातीवादाचा उल्लेख करुन मत मागितले असल्याचा आरोप मोहिते यांनी केला.तर सुरेंद्र द्वारकाप्रसाद यादव यांनी देखील नोडल अधिका-याकडे तक्रार नोंदवली.तक्रारीत कलम १२३ अन्वये आदर्श आचार संहितेचा भंग करण्यात आले असल्याची तक्रार करीत विकास ठाकरे यांची उमेदवारी बाद करण्याची मागणी करण्यात आली आहे.

कलम १२३ अन्वये मतांकरिता जात किवा धर्माच्या आधारावर मत मागू शकत नाही,ही बाब उमेदवार,एजेंट किवा कोणत्याही व्यक्तीवर लागू अाहे.असे असताना हिंदी दैनिकात अश्‍या स्वरुपाची जाहिरात प्रसिद्ध केल्यामुळे हिंदी दैनिकाचे संपादक,उमेदवार विकास ठाकरे तसेच जाहीरात देणारे सदन यादव यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.ही जाहीरात जाती-जातींमध्ये तेढ निर्माण करणारी असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

यावर आम्ही देखील उद्या काऊंटर कम्पलेंट दाखल करणार असल्याचे काँग्रसचे प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे यांनी सांगितले.या पूर्वी आम्ही भाजपच्या विरोधात आचार संहितेचा भंग याविषयी जवळपास आठ ते दहा तक्रारी निवडणूक आयोगाकडे केल्या आहेत मात्र,अद्याप त्यावर कारवाई झाली नसल्याचे त्यांनी सांगितले.सोलापूरचे उमेदवार राम सातपुते यांचा व्हिडीयो व्हायरल झाला असून ज्यात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमूक एका जातीवरील लोकांवरील गुन्हे परत घेण्याची भाषा वापरली आहे.

अमरावतीच्या काँग्रेसच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या जात वैधता प्रमाणपत्राबाबत सर्वोच्च न्यायलयाचा निकाल येण्या पूर्वीच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे यांनी त्यांच्या जातीचे प्रमाणपत्र वैद्य असल्याचे सांगून त्या निवडणूकीत उभे राहणार असल्याचे भाकीत वर्तवले.हा सर्वोच्च न्यायालयाच्या अवमान तसेच आचार संहितेचा भंगच होता.

चंद्रपूरचे भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवारांनी पंतप्रधान मोदींसमोर प्रचार सभेत पुरोगामी महाराष्ट्रात न शोभणारी भाषा बहीण-भावाविषयी, काँग्रेसचा उल्लेख करताना उच्चारली.
नागपूरातील भाजपचे उमेदवार व केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या प्रचार सभेत ‘शिलाजित’देऊ अश्‍या शब्दांचा वापर केला होता.दक्षीण नागपूरचे भाजपचे आमदार मोहन मते यांनी प्रचार फलकांवर भगवान श्री रामाचे छायाचित्र ,त्या खाली स्वत:चे छायाचित्र लाऊन ’जो श्रीराम को लाये है हम उनको लायेंगे’असे जाहीरात फलक लावले आहेत मग हे धर्माच्या आधारावर मत मागणे नव्हे का?

अजूनही सरकारी बसेसवर मोदी यांचे छायाचित्र व योजना सागंणा-या जाहीराती हटविण्यात आले नाही.ना पेट्रोल पंपावरील जाहीराती हटवल्या.काँग्रेसने देखील निवडणूक आयोगांकडे अनेक तक्रारी केल्या असून आम्हाला देखील आयोगाकडून आमच्या तक्रारींवर कारवाईची अपेक्षा आहे,असे त्यांनी सांगितले.
………………………………

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या