

(संग्रहीत छायाचित्र)
प्रियकराच्यासोबतीने आवळला १२ वर्षीय भावाचा गळा
वाडी पोलिसांची स्तुत्य कामगिरी:चोवीस तासात लावला घटनेचा छडा
नागपूर,ता. १९ ऑक्टोबर: मानवी देहाच्या वासनेला नीती-मुल्याचे काेंदण नसल्यास समाजात जो अनाचार माजतो ते बघता सभ्य समाजाच्या मनाचाही थरकाप उडतो.अशीच एक घटना काल सोमवार दि. १८ ऑक्टोबर २०२१ रोजी सायंकाळी घडली.एका निरागस १२ वर्षीय भावाचा गळा १६ वर्षीय बहीणीने प्रियकराच्या मदतीने निष्ठूरतेने आवळला,त्या निरागस भावाचा दोष एवढाच होता त्याने आपल्या बहीणीला तिच्या प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितले!
वाडीतील द्रुगधामना परिसरातील विद्यानंद नगर,वार्ड क्र.१,निकोसे किराणा दूकानाजवळ सुरज रामटेके नावाच्या निरागस बालकासोबत ही दूर्देवी व तितकीच मन हेलावून टाकणारी घटना घडली.सूरजचे आई-वडील हे खासगी काम करतात.त्याला १६ वर्षीय मोठी बहीण आहे.सोमवारी दूपारी ३ वाजताच्या सुमारास बहीणीने त्याला बाहेर दूकानात पाठवले,सूरज हा नेहमीच वस्तीतल्या मुलांसोबत खेळण्यात रमत असल्यामुळे तो लवकर परत येणार नाही असा कयास बहीणीने लावला.
तेवढ्या वेळात बहीणीचा प्रियकर स्नेहल सागरजी सोनपिंपळे (वय वर्षे १८) हा घरी आला.दूर्देवाने सूरजही लवकरच दूकानातून घरी परत अाल्याने त्याने बहीणीला प्रियकरासोबत आक्षेपार्ह्य अवस्थेत बघितले.त्याने दोघांचेही नाव आई-वडीलांना सांगेल,अशी धमकी बहीणीला दिल्याने तिने आपल्या भावाचे दोन्ही हात धरुन ठेवले तर प्रियकर स्नेहल याने गळ्यातील स्कार्फने त्याचा गळा आवळला!
घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त नुरुल हसन,वाडी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ललिता तोडासे यांच्यासह पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला.पोलिसांनी पंचनामा करुन सूरजचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मेयो रुग्णालयाकडे रवाना केला.
पोलिसांनी घटनास्थळी अतिरिक्त माहिती काढल्यानंतर १६ वर्षीय अल्पवयीन बहीणीचे संबंध घरा समोर राहणा-या १८ वर्षीय स्नेहलसोबत असल्याचे कळले.आरोपीला ताब्यात घेऊन विचारपुस केली असता माणूसकीला काळीमा फासणारे हे विदारक सत्य समोर आले.
फिर्यादी नासिक शालीक रामटेके(वय वर्षे ४२)यांच्या तक्रारीवरुन पो.स्टे.वाडी येथे पोलीस उपनिरीक्षक एस.पी.गोबाडे यांनी आरोपीविरुद्ध कलम ३०२ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करुन आरोपी स्नहेल यास अटक केली व फिर्यादीची अल्पवयीन मुलगी हीला ताब्यात घेतले.




आमचे चॅनल subscribe करा
