फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूज‘वाय’स्तंभित करुन जाणारा चित्रपट:स्त्री भ्रूण हत्येचं परखड सत्य

‘वाय’स्तंभित करुन जाणारा चित्रपट:स्त्री भ्रूण हत्येचं परखड सत्य

Advertisements

बीड जिल्ह्यातील सत्य घटनेने प्रेक्ष् कही झाले स्तब्ध:ऑरेंज सिटी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा समारोप

नागपूर: मराठवाड्यातील बीड हा जिल्हा २०११ साली महाराष्ट्रातच नव्हे तर जगभर गाजला तो पांढरपेश्‍या डॉक्टरांनी कसाईप्रमाणे केलेल्या लाखो स्त्री भ्रूण हत्येच्या घटनांमुळे. याच सत्य घटनेवर आधारित एका तरुण दिग्दर्शकाने डॉ.अजित वाडीकर यांनी चित्रपट बनवण्याचं धाडस केलं,नुसतं धाडसच नाही केलं तर ते किळसवाणं,विदारक सत्य अतिशय प्रभावीपणे प्रेक्ष् कांपुढे मांडलं आणि…नागपूरकर प्रेक्ष् क हा चित्रपट बघून ‘स्तब्ध’झाला.

ऑरेंज सिटी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा समारोप रविवार दि. ९ फेब्रुवारी रोजी झाला. दुपारी ४ वा. जसवंत आयनॉक्समधील स्क्रीन-२ वर हा चित्रपट दाखवण्यात आला. या चित्रपटात मुख्य भूमिका करणारी अभिनेत्री मुक्ता बर्वे तसेच डॉक्टर पुरुषोत्तमची नकारात्मक भूमिका करणारे नंदू माधव हे प्रामुख्याने उपस्थित होते. हा चित्रपट अद्याप चित्रपटगृहात प्रदर्शित व्हायचा असून गोवा,पुणे यानंतर नागपूर चित्रपट महोत्सवात प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटाचे कथानक हे मानवी संवेदनांना बोथट करुन जाणारे असून अडीच तासांचा हा चित्रपट बघताना डॉक्टरकी पेशाप्रति अतिशय घृणा दाटून येते. हा चित्रपट दिग्दर्शकाने मातेच्या गर्भातच प्राण असणारा,श्‍वास घेणारा मासाचा गाेळा म्हणजे‘ स्त्री भ्रूण’ ज्या निर्दयतेने खरडून काढून कुत्र्यांना खायला दिल्या गेले त्या अगणिक अर्भकांना समर्पित करण्यात आला आहे. भारतात जवळपास दीड कोटी स्त्री अर्भक या जन्मालाच आल्या नाहीत!

केंद्राने या घटनेनंतर वैद्यकीय क्ष्ेत्रासाठी जो कठोर पीएनटीसी कायद्याची निर्मिती केली, त्या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी वैद्यकीय क्ष्ेत्रातीलच काही डॉक्टरांची नियुक्ती केली.अशीच एक कर्तव्य कठोर वैद्यकीय अधिकारीच्या भूमिकेत सुप्रसिद्ध अभिनेत्री मुक्ता बर्वे आपल्याला पाहयला मिळते. या चित्रपटात देखील तिचा सहज, संयत अभिनय हा प्रेक्ष् कांना मनापासून भावतो. नाल्यात फेकलेले एक स्त्री अर्भक योगायोगाने तिच्यापर्यंत पोहोचतं आणि ती…तिलाच दत्तक घेऊन मोठं करते. एकीकडे जन्मदाते हेच स्त्री अर्भकाच्या अस्तित्वाचे वैरी बनले असताना ही वैद्यकीय अधिकारी त्या अर्भकाला नाव देते,ओळख देते,जीवन देते.

दुसरीकडे डॉ.पुरुषोत्तमसारखे नरभक्ष् क डॉक्टर्स असतात जे आपल्या पेशाला काळीमा फासतात फक्त पैशांच्या लालसेपोटी. स्त्रीच नव्हे तर बीडमध्ये अनेक डॉक्टर्सने पुरुष अर्भकाला देखील स्त्री भ्रूण सांगून पैसे लृटले. अनेक दृष्य हे सरळ अंगावर काटा उभा करतात. भ्रष्ट पोलीस,बेईमान नोकरशाही यांना तर कोणतीही शिक्ष्ा २०११ पासून झालीच नाही मात्र ज्या लाखो जन्मादात्यांनी पैसे देऊन स्त्री अर्भकांचा खून केला त्या पैकी देखील एकालाही कायद्याद्वारे शिक्ष्ा झालीच नाही हे आणखी एक फार मोठे दूर्देवच म्हणावे लागेल. फक्त सामाजिक किवा नैतिक नव्हे तर न्यायव्यवस्थेची आणि मानवतेची ही खूप मोठी ‘हार’असल्याची जाणीव हा चित्रपट करुन देण्यास यशस्वी होतो. ‘सोनोग्राफी मशीन सील करता येतात दृष्टिकाेण नाही’‘माझं दगडाचं काळीज झालं’ यासारखे संवाद सरळ अंगावरच येतात.
पहीलाच चित्रपट असून दिग्दर्शकाने संपूर्ण कसब या चित्रपटाच्या निर्मितीत लावलं असल्यामुळेच हा त्यांचा पहीलाच चित्रपट आहे असे वाटत नाही. २०११ साली डॉ.अजित वाडीकर यांनी ही पटकथा लिहली होती.२०१६ पासून चित्रिकरणाला सुरवात झाली.सर्वात पहीली स्टार कास्ट ही मुक्ता बर्वेच होती. १०३ दिवस चित्रीकरण झाले. ७ महिने पोस्ट प्रोडक्शनसाठी लागले पुन्हा ८ महिने याच कामासाठी लागले असल्याची माहिती त्यांनी चित्रपटानंतर प्रेक्ष् कांशी साधलेल्या संवाददरम्यान दिली. प्रत्येक विभागाने १०० नव्हे ५०० टक्के परिपूर्ण काम दिल्यामुळेच चित्रपटाला प्रेक्ष् कांची अशी दाद मिळाली असे त्यांनी सांगितले.

मुक्ता बर्वे यांनी प्रेक्ष् कांशी संवाद साधताना,वाटत नाही हा दिग्दर्शकाचा पहीला चित्रपट आहे. तर नंदू माधव यांनी डॉ.पुरुषोत्तमची नकारात्मक भूमिका साकारण्यासाठी घेतलेले परिश्रम यांचा उल्लेख केला. अनेक गायनिक डॉक्टर मित्रांकडून सखोल माहिती घेतानाही किती परिश्रम पडले,शेवटी फक्त भूमिका निभावणार आहे हे पटल्यानंतरच त्या मित्रांनी सहकार्य केल्याचे नंदू यांनी सांगितले.दिग्दर्शक हा त्याच्या कामामध्ये किती समर्पित आहे याचे उदाहरण सांगताना,ऑपरेशन थेटरचा सेटमध्ये सर्व शस्त्रे ही चूकीच्या पद्धतीने चुकीच्या ठिकाणी ठेवण्यात आली होती,दिग्दर्शकाला हे सांगतिले असता त्या दिवशीचे चित्रीकरणच त्याने रद्द केले,पुन्हा संपूर्ण सेट उभारला मग दुसरेया दिवशी त्या दृष्याचे चित्रीकरण केल्याची माहिती नंदू यांनी दिली.

या चित्रपटाचे नाव ‘वाय’का ठेवण्यात आले?या प्रश्‍नाच्या उत्तरात याची दोन कारणे त्यांनी सांगितली,एक तर हे इंग्रजी शब्द ‘Why’ म्हणजे मीच का? असा त्याचा अर्थ होतो दूसरे कारण शेवटी मुलगी किवा मुलगा होण्यासाठी पुरुषामधील ‘वाय किवा एक्स’हे दोनच क्रोमोझोन्स कारणीभूत असतात,वाय यांचा संयागे स्त्रीच्या एक्स क्रोमोझोनशी झाल्यास मुलगा होतो आणि दोघांचाही एक्स-एक्स चा संयोग हा मुलीचे भ्रूण निर्माण करतो.या ही अर्थाने ‘वाय’चा अट्टहास मानवाला किती आहे,ही मानसिकता हे शीर्षक अधोरेखित करतो.

फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.चंद्रशेखर मेश्राम यांनी या तरुण दिग्दर्शकाकडून तरुणाईला प्रेरणा मिळेल अशी आशा व्यक्त केली.
सुप्रसिद्ध दिग्दर्शक जब्बार पटेल यांनी जगातील सर्वोकृष्ट चित्रपट व लघूपट जे पुण्याच्या चित्रपट महोत्सवात दाखवण्यात आले तेच सर्व चित्रपट नागपूरातील प्रेक्ष् कांसाठी दाखवण्यात आल्याचे समारोपाप्रसंगी सांगितले.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या