
नागपूर, ता.२ : वर्षातून दोनदा येणा-या छठ पूजा पर्वामध्ये कार्तिक महिन्यात येणा-या छठ पर्वाचे विशेष महत्व आहे. पूर्वी फक्त उत्तर भारतात साजरा होणारा हा उत्सव उत्तर भारतीय बांधवांमुळे देशात सर्वत्र साजरा केला जात आहे. यामध्ये ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांच्या पुढाकाराने आपल्या नागपुरातही हा उत्सव साजरा होतो ही आनंददायी बाब आहे. उत्तर भारतीय बांधवांच्या या महत्वाच्या उत्सवात कोणत्याही प्रकारची गैरसोय होउ नये यासाठी मनपातर्फे आवश्यक सुविधा प्रदान करण्यासाठी मनपा तत्पर आहे, असे महापौर नंदा जिचकार म्हणाल्या.
संपूर्ण देशभरात साजरा होणारा छठ पूजा पर्व शनिवारी नागपुरातही उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील अंबाझरी तलावावर उत्तर भारतीय बांधव आणि भगीनींनी उत्साहात छठ पूजा केली. छठ पूजेनिमित्त शनिवारी महापौर नंदा जिचकार यांनी अंबाझरी तलावावरील पूजा स्थळाला भेट दिली. नागपूर महानगरपालिकेतर्फे अंबाझरी तलावावर प्रदान करण्रयात आलेल्या सुविधांची यावेळी महापौरांनी पाहणी करुन सुविधांचा आढावा घेतला.
याप्रसंगी महापौर नंदा जिचकार यांच्यासह आमदार विकास ठाकरे, ज्येष्ठ नगरसेवक तथा छठ पूजा पर्वचे आयोजक दयाशंकर तिवारी, नगरसेविका तथा सत्तापक्ष उपनेत्या वर्षा ठाकरे, नगरसेवक संजय बंगाले, आर,आर, मिश्रा, एनपीटीआय चे माजी संचालक विजय सिन्हा वेकोलि चे जनसंपर्क अधिकारी सत्येन्द्र प्रसाद सिंह, बृजभूषण शुक्ला, भोजराज डुंबे, अजय पाठक, संजय सिन्हा, राजेश शुक्ला, विजय तिवारी, अखिल बिहारी मंचचे अध्यक्ष कौशल पाठक, विभूति भूषण राय, अशोक शुक्ला, वीरेंद्र पांडे, राजेश यादव, शैलेंद्र मिश्रा, शिवशंकर चतुर्वेदी, रामभूषण त्रिपाठी, नरेंद्र चतुर्वेदी, जयशंकर सिंग, अमर पारधी, संदीप पांडे, अजय सिन्हा, धर्मेंद्र दुबे, राकेश तिवारी, बहुराष्ट्रीय छठ पूजा समितीचे संजय शर्मा, पंडित दिनेश मिश्रा, कृपाशंकर तिवारी, अजय गौर , राकेश तिवारी, प्रियदर्शनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एम पी सिंह, वकील सिंह आदी उपस्थित होते.
छठ पूजेकरीता अंबाझरीसह फुटाळा, गोरेवाडा, पोलिस लाईन टाकळी व सक्करदरा तलाव येथेही व्यवस्था करण्यात आली आहे. मनपाच्या अग्निशमन विभागासह, आरोग्य विभागाचे स्वच्छता कर्मचारीही सेवा प्रदान करीत आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने पूजा स्थळी उभे राहणयासाठी स्टॅन्ड उभारण्यात आले याशिवाय पाय-यांवर, तलावाच्या काठावर बॅरिकेट्रस लावण्यात आले आहेत. तलाव परिसरात कुठेही अंधार राहू नये यासाठी ठिकठिकाणी विद्युत दिव्यांची व्यवस्था करण्यात आली. तलावावर होणारी गर्दी लक्षात घेता अंबाझरी तलावावर अंबाझरी उद्यान, स्वामी विवेकानंद स्मारकाजवळून व अंबाझरी मेट्रो स्टेशन अशा तीन ठिकाणी प्रवेशद्वार उभारण्यात आले. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्रटीने पूजा स्थळी व परिसरात पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आले.




आमचे चॅनल subscribe करा
