फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजवंचित बहुजन आघाडीच्या नागपूर शहर कलावंततर्फे लोकांना धान्य वाटप

वंचित बहुजन आघाडीच्या नागपूर शहर कलावंततर्फे लोकांना धान्य वाटप

Advertisements

नागपूर: वंचित बहुजन आघाडीच्या नागपूर शहर कार्यालयात लोकचहवळीतील शहीर , गायक, व प्रबोधन करणारे कलावंततर्फे लोकांना धान्य वाटप करुन ॲड. बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

ॲड. बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर व  मिराताई यशवंत आंबेडकर यांनी संपुर्ण महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांना वाढदिवसाचे सर्व कार्यक्रम रदद करुन कार्यक्रमाचा निधी लॉकडाऊन मुळे गरीब वंचित जनतेला मदत करण्यासाठी वापरण्याचे आदेश दिले होते. त्यांच्या आदेशानुसार शासनाने जारी केलेल्या अधिसूचनांचे व दिशानिर्देशांचे व फिजीकल डिस्टंनसींग चे पालन करुन नागपूर शहरातील गरीब व गरजू कलावंतांना धान्य,किराणा,भाजीपाला वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या आयोजनाकरीता जेष्ठ नेते मा. राजू लोखंडे, प्रा.रमेश पिसे, इंजि. राहुल वानखेडे साहेब, मंगलमूर्ती सोनकुसरे , अरविंद सांदेकर, दिपाली पाटील, मिलींद मेश्राम, अविराज थुल, नितेश सवाईकर, प्रदिप साठे , अशोक गोंडाणे, शुभांगी डाले, प्रतिभा आवळे, मायाताई शेंडे, इत्यादींनी सहयोग दिला.

या प्रसंगी वंचित बहुजन आघाडी चे नागपूर शहर अध्यक्ष , रविभाऊ शेंडे , ,तसेच सुनिल इंगळे, विनाताई रवि शेंडे , वंदना ताकसांडे, सुनदा साखरकर, कमलाबाई ढाले, राहुल मेश्राम, मोनाल शेंडे, अश्विन मेश्राम, कुणाल शेंडे, अंकुश मोहीले, सुमेधु गेडाम, सोनू शेंडे, जयंत वासनिक, सचिन शेंडे, राहुल वासनिक , राकेश अग्रवाल, सिध्दांत पाटील व इतर कार्यकर्ते उपस्थीत होते.

महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समिती तर्फे विदर्भ अध्यक्ष श्री.धर्मेशजी दुपारे, महेंद्र माणके , विजय मधुमटके, विजय किर्तने व  धनराज राऊत हे उपस्थित होते.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या