फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeक्राइम लॉकडाऊनचे साईड इफेक्ट्स: नागपूरमध्ये दोन बीअर बार फोडले

 लॉकडाऊनचे साईड इफेक्ट्स: नागपूरमध्ये दोन बीअर बार फोडले

Advertisements
नागपूर: करोनाची लागण होऊ नये यासाठी लावण्यात आलेल्या संचारबंदीमुळे दारुड्यांचे हाल होत आहेत. दारुड्यांनी आता चक्क बीअर बार फोडायला सुरुवात केली आहे. नंदनवनमधील खबरी येथील आनंद बीअर बार व सावनेरमधील गोविंद बीअरबार फोडून चोरट्यांनी लाखो रुपयांचा मद्यसाठा लंपास केला. बुधवारी सकाळी या दोन्ही घटना उघडकीस आल्या.
उपराजधानीत जमावबंदीचा आदेश लागू झाल्यानंतर शहरातील सर्वच प्रतिष्ठाने, बाअर बार बंद आहेत. मंगळवारी मध्यरात्री चोरट्यांनी आनंद बार अँड रेस्टॉरेंटच्या दरवाजाचे कुलूप तोडले. बारमधील दारूरुच्या बाटल्या चोरी केल्या. याचप्रमाणे सावनेर येथील गोविंद शेटे याच्या मालकीच्या गोविंद बारचे शटर वाकवून चोरटे आत घुसले. बारमधील ४० हजार रुपयांचा मद्यसाठा चोरी केला. दोन्ही प्रकरणी पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. दोन दिवसांपूर्वी चोरट्याने एमआयडीसीतील देशी दारूचे दुकान फोडून दारूच्या ३३ पेट्या लंपास केल्या होत्या.
गर्दी टाळणे हा करोनावर मात करण्याचा सर्वात प्रभावी उपाय आहे. हे लक्षात घेऊन केंद्र सरकारनं देशभरात लॉकडाऊन पुकारला आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. जीवनावश्यक वस्तू वगळता अन्य सर्व दुकानं तेव्हापासून बंद आहेत. रोजच्या रोज पिऊन तर्रर्र राहणाऱ्यांची मात्र यामुळं गोची झाली आहे. एरवी वर्षातून काही दिवस असणाऱ्या ‘ड्राय डे’ची तळीरामांना सवय असते. ‘ड्राय डे’ची तजवीज म्हणून अनेकदा आधीच स्टॉक करून ठेवला जातो. मात्र, इतके दिवस दुकानं बंद राहण्याची ही पहिलीच वेळ असल्यानं स्टॉकही संपला आहे. संचारबंदी असल्यानं मागच्या दारानं मिळण्याचीही सोय नाही. त्यातून बार फोडीचे हे प्रकार घडत असल्याचं बोललं जात आहे.
Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या