फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजलसीकरणात ज्येष्ठांसोबत भेदभाव!आयुक्त कक्षा समोर करणार उपोषण

लसीकरणात ज्येष्ठांसोबत भेदभाव!आयुक्त कक्षा समोर करणार उपोषण

Advertisements

प्रशांत पवार यांचा इशारा

नागपूर,ता. ११ मे: सध्या करोना संसर्गापासून बचावासाठी व आपला व आपल्या कुटुंबियांचा जीव वाचवण्यासाठी लसीकरण हाच एकमेव उपाय नागरिकांच्या हातात असताना नागपूर महानगरपालिका प्रशासन याचे किती भ्रष्ट आणि ढिसाळ नियोजन करत आहे,हे नागपूरकर नागरिक राेजच भोगतच आहे मात्र त्यातही जेव्हा-जेव्हा राज्याकडून नागरिकांच्या लसीकरणासाठी मनपाला लसींचा कोटा देण्यात येतो त्यात वारंवार महाल येथील एकाच विशिष्ट केंद्राची मक्तेदारी असल्याचे दिसून पडत आहे.उर्वरित केंद्रांवर वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक हे भर उन्हात लसीकरणासाठी वणवण भटकत आहेत.मनपाच्या या भ्रष्ट व पक्ष् पाती लसीकरण धोरणाच्या विरोधात मी आता मनपा आयुक्त राधाकृष्णन बी.यांच्या कक्षासमोर उपोषणाला बसणार असल्याचा इशारा ‘जय जवान जय किसान’संघटनेचे अध्यक्ष् प्रशांत पवार यांनी दिला.

दररोज प्रसिद्ध होत असलेल्या लसीकरणाबाबतच्या वृत्तामध्ये वारंवार एकाच केंद्रावर ४४ वर्षाच्या वर,६० वर्षाच्या वर तसेच नुकतेच १ मे पासून केंद्र सरकारने घोषित केल्याप्रमाणे १८ वर्षाच्या वयोगटावरील नागरिकांसाठी लसीकरण सुरु झाले या सर्वच वयोगटातील लसीकरणासाठी महाल येथील हे एकमेव अद्वितीय अश्‍या लसीकरण केंद्रांवर मनपा प्रशासनाचे एवढे पुतणा मावशीचे प्रेम का आहे?
वाठोडा,वाडी,बेसा इ.आऊटर भागातील वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिकांनी मनपा प्रशासनाच्या या अतिशय आवडत्या लसीकरण केंद्रावरच येऊन लस घ्यायची का?त्यांच्या भागातील लसीकरण केंद्रे ओस ठेवली जातात व या एकाच केंद्राला ‘भरभरुन’लसींचं दान का?

मनपा प्रशासनाने उद्यापासून त्यांच्या यादीतून या केंद्राचे नाव न वगळल्यास आयुक्तांच्या कक्षासमोर मी उपोषणाला बसणार आहे,महाल येथील या केंद्राला लसी द्यायच्याच असतील तर शहरातील संपूर्ण केंद्रांवरच लसी उपलब्ध असायला पाहीजे,अन्यथा महालवरील केंद्रावर लसीकरण थांबवून आता नागपूर शहरातील बाह्य भागातील केंद्रांना लसी उपलब्ध करुन देण्यात यावा,अशी मागणी प्रशांत पवार यांनी केली आहे.

अन्यथा या शहरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी मी आयुक्तांच्या कक्षासमोर बेमुदत उपोषणाला बसेल,असा इशारा त्यांनी दिला.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या