फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeक्राइमरेशनिंगचा गहूं काळ्या बाजारात!

रेशनिंगचा गहूं काळ्या बाजारात!

Advertisements

(संग्रहीत छायाचित्र)

४६५ गव्हाच्या पोत्यांची अफरातफर

जरीपटका पोलिसांचा छापा:३ धान्य तस्करांना अटक

नागपूर,ता. १६ ऑक्टोबर: शासकीय स्वस्त धान्य दुकान रेशनिंगमध्ये जाणारा गव्हाचा ट्रक चक्क काळ्याबाजारात जात असताना जरीपटका पोलिसांनी छापा घालून पकडला.पोलिसांनी ४६५ पोते गहू जप्त केला असून तीन धान्य तस्करांना अटक केली.गेल्या वर्षभरातील पोलिसांची ही सर्वात मोठी कारवाई आहे.

हरविंदरसिंह रविंदरसिंह भाटिया(२९),अमनसिंह रविंदरसिंह भाटिया(३३,पाटनकर चौक,तथागत कॉलनी),नसीम अकबर खान(२६,नाका.नं २,खसाळा-मसाळा)अशी अटकेतील धान्यतस्कारांची नावे आहेत.तर लक्ष्मण हा आरोपी फरार आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,हरमिंदर,अमनसिंह आणि नसीम हे धान्य काळाबाजारात विक्री करणा-या मोठ्या रॅकेटचे सूत्रधार आहेत.त्यांनी आतापर्यंत अनेकदा काळ्या बाजारात रेशनचे धान्य विक्री केले आहे.

सार्वजनिक वितरण व्यवस्था प्रणालीच्या ट्रकमध्ये(एमपी २२ एच १९३१)वाणाचा जवळपास ४६५ पोते रेशनिंगचा गहू होता.तो ट्रक निर्धारित केलेल्या मार्गावरुन सरकारी धान्य गोडावूनमध्ये नेण्यात येत होता.

तिघांनी शुक्रवारी रात्रीच्या सुमारास तो ट्रक थेट पाटनकर चौक,तथागत कॉलनीत नेला.तेथे अंधारात ट्रक उभा करुन दुसरे टाटा एस.वाहनात गव्हाचे पोते काढणे सुरु केले होते.

दरम्यान ही माहिती जरीपटक्याचे ठाणेदार वैभव जाधव यांना मिळाली.त्यांनी लगेच झोनल अधिकारी रागिनी गायकवाड आणि धान्य पुरवठा निरीक्षक रवींद्र राठोड यांना सूचना देऊन पोलिस ठाण्यात बोलावून घेतले.त्यानंतर पोलिसांचे एक पथक तयार करुन घटनास्थळावर रवाना झाले.पोलिसांनी सापळा रचून छापा घातला.

ही कारवाई आयपीएस मनीष कलवानिया यांच्या मार्गदर्शनात पीआय वैभव जाधव,एपीआय विजय धुमाळ,रामचंद्र गजभे,गजानन निशितकर,अजय गिरडकर,आनंद म्हसरकोल्हे,संतोष पांडे,सुशील महाजन यांनी केली.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या