

दूकानदारांनी पैसे किवा पर्यायी दूकाने घ्यावी
नागपूर,ता. ८ सप्टेंबर २०२१:रेल्वे स्टेशनच्या पश्चिम दिशेला अस्त्विात असलेल्या उड्डाणपुला ऐवजी सहा पदरी रस्ता बांधण्याकरीता उड्डाणपुलासह त्या खालील दूकान संकूल पाडण्यासाठी २९ सप्टेंबर २०१८ रोजीच्या मनपाच्या सर्वसाधारण सभेत ठराव संमत करण्यात आला होता.संकूलातील दूकाने रिकामे करुन घ्यायची व बाधित होणा-या संपूर्ण दूकानदारांना मनपाच्या सहमतीने महामेट्रोकडून पुर्नस्थापित करण्याचे अपेक्ष्ति होते परंतु महामेट्रोद्वारा तात्पुरत्या स्वरुपात बांधकाम केलेल्या व भविष्यात कायम स्वरुपी बांधण्यात येणा-या व्यापारी संकुलात स्थानांतरित होऊ इच्छित नाही अश्या दुकानदारांना मनपाने त्यांची ३० वर्षां पैकी १२ वर्ष त्यांनी दूकानांचा वापर केला असल्याने उर्वरित १८ वर्षांची अग्रीम जमा रक्कम परत घेण्याचा पर्याय दिला असून ज्या दूकानारांना पैसे परत घेण्याची ईच्छा नसेल तसेच सध्या त्यांना उपलब्ध करुन दिलेल्या अस्थायी पर्यायी जागा दूकान म्हणून वापरतील त्यांना भविष्यात सिताबर्डी रेल्वे स्टेशन लगत बांधण्यात येणा-या प्लाझा मधील २०० दूकानांमधील दूकाने कायमस्वरुपी देण्यासाठीचा मनपा प्रशासनाचा प्रस्ताव सभेत मांडण्याचा आला.
नुकतेच याबाबत मनपा आयुक्तांना केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी ९ जुलै २०२१ च्या बैठकीत निर्देश दिले होते.
प्रशासनातर्फे हा प्रस्ताव सभेत आला असता यावर विस्तृत चर्चा घडली.२०० दूकानांपैकी ७२ आरक्ष्ति दूकाने आहेत.सध्या मेट्रोने जुना मोटर स्टॅण्ड जवळ या दूकानदारांना अस्थायी दूकाने उपलब्ध करुन दिली आहे.मात्र अनेक दूकानदारांचे म्हणने आहे त्यांची दूकाने ही अगदी रेल्वे स्टेशन समोर येत असल्याने या दूकानांचा दूकानदारांना फायदा काय?
मानवीय दृष्टिकोणातून या दूकानदारांचा विचार व्हायला पाहिजे असे महापौर म्हणाले.त्यांना व्याजासकट भरपाई किवा अडीच पट मोबदला देण्यात यावा,दूकानदारांनामध्ये कोणताही भेदभाव केला जाऊ नये.
विरोधी पक्ष् नेते तानाजी वनवे यांनी गडकरी यांच्या विकास कामांना विरोध नाही मात्र महामेट्रो किती वर्षात हा प्रकल्प पूर्ण करणार अशी त्यांनी विचारणा केली.पिंटू झलके यांनी हा विषय गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला असून रेल्वे स्टेशन ते सी.ए.रोड ट्रॅफिक सुचारु व्हावे यासाठी सर्व दुकानदारांच्या प्रस्तावाला तात्काळ मंजूरी प्रदान करावी,हा एक महत्वाकांक्ष्ी प्रकल्प असल्याचे ते म्हणाले.
सत्ता पक्ष् नेते अविनाश ठाकरे यांनी प्रशासनाने जो प्रस्ताव पाठवला आहे त्या एकाच प्रस्तावात आठ टक्के व साढे आठ टक्के असा उल्लेख आहे.गेल्या १२ वर्षांपासून दूकानदार दूकान वापरत होते.१८ कोटींच्या रकमेतून साढे आठ टक्के शिल्लक आहे,चक्रीव्याज धरुन १८ कोटी नमूद आहे,प्रशासनाला नेमकी काय अपेक्ष्ा आहे?आठ की साढे आठ?असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
यावर उत्तर देताना आयुक्त म्हणाले की हा युडीसीपीआर दर आहे.स्वत:ची जागा असेल तर अडीच पट नुकसान भरपाई दिली जाते.यावर ज्येष्ठ नगरसेविका आभा पांडे यांनी मानवतेच्या दृष्टिने या दूकानदारांना नुकसान भरपाई देण्यात यावी,अशी मागणी केली.
यावर बोलताना महापौरांनी सभागृहाने आधीच दूकाने तोडण्याच्या प्रस्तावाला मंजूरी प्रदान केल्याचे सांगितले मात्र दूकाने तोडण्या पूर्वी आता धोरणात्मक निर्णय घ्यायचा आहे.प्रशासनाने प्रस्ताव पाठवला आहे.२०० पैकी ६०-६२ दूकाने ही अगदी रेल्वे स्टेशन समोर येते.१४० दूकाने ही इतरत्र येत आहेत.हा प्रस्ताव प्रस्थापित शासकीय नियमांच्या अधीन पटलावर आला आहे.ज्या दूकानदारांना पैसे हवे त्यांना पैसे दिले जातील,ज्यांना महामेट्रोच्या प्लाझामध्ये दूकाने हवी त्यांना दूकाने दिली जातील,असे महापौर यांनी सांगितले.




आमचे चॅनल subscribe करा
