फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeक्राइमरेल्वे बलात्कार पीडीतेच्या गुन्हेगारांना तात्काळ अटक करा:आ.नीलम गो-हे

रेल्वे बलात्कार पीडीतेच्या गुन्हेगारांना तात्काळ अटक करा:आ.नीलम गो-हे

Advertisements


मनोधैर्य योजनेतून पीडीतेला तात्काळ लाभ मिळवून देणार

मुंबई दि.२५ डिसेंबर : मुंबई येथील वाशी रेल्वेच्या पुलावर एक तरुणीला रेल्वेतून खाली फेकून देण्याची घटना दि.२२ डिसेंबर, २०२० रोजी समोर आली. यात पिडीत तरुणीवर लैंगिक अत्याचार करून जबर मारहाण केल्याबाबत रेल्वे पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे. या घटनेची विधानपरिषदेच्या उपसभापती ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी तात्काळ दखल घेतली व यासंदर्भात डॉ.गोऱ्हे यांनी रेल्वे पोलीस आयुक्त .रवींद्र सेनगावकर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून घटनेची सविस्तर माहिती घेतली.

पिडीत मुलीवर मुंबई येथील रुग्णालयात उपचार सुरू असून बेशुद्ध अवस्थेत असल्याने अद्यापपर्यंत जबाब घेण्यात आला नसल्याचे त्यांना सांगण्यात आले तसेच वैद्यकीय अहवाल आल्यानंतर बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतील असे सेनगावकर यांनी डॉ.गोऱ्हे यांना सांगितले.
सेनगावकर व रेल्वे पोलिस यांनी तत्परतेने केलेली कार्यवाही समाधानकारक असल्याचे आ.गो-हे म्हणाल्या. त्याचप्रमाणे या घटने संदर्भात डॉ.गोऱ्हे यांनी आरोपीला पकडण्याचे निर्देश दिले तसेच पीडित तरुणीला मदत मिळण्याबाबत काही सूचना सेनगावकर यांना दिल्या.
पीडितेला मदत मिळण्याबाबत मनोधैर्य योजनेच्या अंतर्गत प्रस्ताव पोलिसांनी तात्काळ विधी व न्याय प्राधिकरण यांच्याकडे पाठविण्यात यावा,अश्‍या सूचना त्यांनी केल्या.

आरोपींला शोधण्यासाठी रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यासाठी यंत्रणेला आदेश देण्यात यावेत.
पिडीत तरुणीचे आणि कुटुंबाचे समुपदेशन होण्यासाठी उचित कार्यवाही करण्यात यावी,असे निर्देश त्यांनी दिले.
सदरील पीडितेच्या लढयात शिवसेना महिला आघाडी आणि स्त्री आधार केंद्रच्या कार्यकर्त्या त्यांना न्यायालयीन मदत, सामाजिक स्तरावरील मदतीसाठी कटिबद्ध असल्याचे यावेळी डॉ.गोऱ्हे यांनी सांगितले. उपसभापती कार्यालयाच्या विशेष कार्य अधिकारी डॉ.अर्चना पाटील यांनी देखील घटनेचा तपशील जाणून ृरुग्णालयातील डॉक्टरांशी संवाद साधून डॉ.गोऱ्हे यांच्यावतीने पीडितेच्या तब्येतीची चौकशी केली.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या