फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeक्राइमरिक्षात महिला प्रवाशासोबत अश्लील वर्तन

रिक्षात महिला प्रवाशासोबत अश्लील वर्तन

Advertisements

मुंबई: प्रवासादरम्यान रिक्षातील प्रवासी तरुणीसोबत रिक्षाचालकाने अश्लील वर्तन केल्याची घटना गोरेगाव परिसरात शनिवारी घडली. याबाबत तरुणीने ट्विटरच्या माध्यमातून तक्रार करताच पोलिसांनी रिक्षाचालकाचा शोध घेऊन त्याला अटक केली.

गोरेगाव येथे राहणाऱ्या १८ वर्षीय तरुणीने शनिवारी सकाळी आपल्या घराजवळून रिक्षा पकडली. रिक्षात बसल्यापासून ४८ वर्षीय रिक्षाचालक तिच्याकडे अश्लील नजरेने पाहत होता. सुरुवातीला तिने त्याच्याकडे कानाडोळा केला. मात्र सिद्धार्थ नगर, गोरेगाव पश्चिम ते एमटीएनएल सिग्नल गोरेगाव पश्चिम यादरम्यान रिक्षाचालकाने तिच्याकडे पाहून अश्लील वर्तन केले. रिक्षाचालकाचे वागणे पाहून तरुणी प्रचंड घाबरली. तिने रिक्षाच्या क्रमांकासह मुंबई पोलिसांच्या ट्विटर हँडलवर तक्रार केली. या तक्रारीची त्वरित दखल घेत पोलिसांच्या ट्विटर टीमकडून ही माहिती गोरेगाव पोलिसांना देण्यात आली.

सीसीटीव्ही फुटेज तसेच इतर तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी रिक्षाचालकाला शोधून काढले. सोमवारी या रिक्षाचालकाला अटक करण्यात आली असून उद्या मंगळवारी त्याला न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती गोरेगाव पोलिसांनी दिली.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या