

नागपूर जिल्ह्यातील आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांचाही सहभाग
नागपूर,ता.५ सप्टेंबर २०२२: शिक्षक दिनाचे औचित्य साधून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ५ सप्टेंबर २०२२ रोजी राज्यभरातील २०२१ च्या जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांशी,दुरदुष्य प्रणाली द्वारे थेट संवाद साधला. यात नागपूर जिल्ह्यातील आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षकांचाही समावेश होता.
एनआयसी केंद्र जिल्हाधिकारी कार्यालय नागपूर येथे हा संवाद उपक्रम पार पडला.यावेळी नागपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर,शिक्षणाधिकारी माध्यमिक रविंद्र काटोलकर,शिक्षणाधिकारी प्राथमिक रोहिणी कुंभार यांच्या उपस्थितीत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे शिक्षकांशी मुख्यमंत्र्यांनी हितगुज साधले.

याप्रसंगी नागपूर जिल्ह्यातील १३ तालुक्यातील जिल्हा आदर्श शिक्षक उपस्थित होते. नागपूर ग्रामीण येथील जिल्हा आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षिका सुजाता भानसे , रणजित बागडे मौदा, विजय क्रिपाल हिंगणा आदी शिक्षक उपस्थित होते. राज्य भरातील आदर्श शिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांची अतिशय समाधानकारक उत्तरे मुख्यमंत्र्यांनी याप्रसंगी दिली .
शिक्षकांना ‘अशैक्षणिक’ कामे दिली जाणार नाही असे आश्वासन ही त्यांनी दिले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सर्वांसाठी कसे उपयुक्त आहे याची माहिती यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली. राज्यभरातील शिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांची अत्यंत समाधानकारक उत्तरे मुख्यमंत्र्याद्वारे शिक्षकांना मिळाली.
शिक्षक दिनाच्या सर्व शिक्षकांना शुभेच्छा संदेश देऊन कार्यक्रमाचा समारोप, आभारप्रदर्शनाद्वारे करण्यात आला.




आमचे चॅनल subscribe करा
