फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिन साजरा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिन साजरा

Advertisements

नागपूर,ता.१ मे २०२४: महाराष्ट्र राज्याच्या ६४ व्या वर्धापनदिना निमित्त आणि कामगार दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नागपूर शहर व ग्रामीण कार्यालय येथे ध्वजारोहण समारंभ १ मे २०२४ रोजी सकाळी ९.३० वाजता साजरा करण्यात आला.

मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र स्थापनेसाठी बलिदान दिलेल्या १०७ वीर हौतात्म्यांना विनम्रपूर्वक अभिवादन करण्यात आले. महाराष्ट्र वीरांच्या तसेच त्यांच्या कुटुंबियांच्या त्याग, समर्पणाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आले. स्व.यशवंतराव चव्हाण यांनी दाखवलेल्या शाश्वत विकासाच्या मार्गाने व शिव-शाहू-फुले- आंबेडकर पुरोगामी विचारधारा जपत महाराष्ट्राच्या प्रगतीचा आलेख उंचावण्यासाठी आपण सर्व कटिबद्ध राहू असा विश्वास व्यक करून सर्वांना महाराष्ट्र दिन व कामगार दिना निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शहराध्यक्ष प्रशांत पवार आणि जिल्हाध्यक्ष शिवराज (बाबा) गुजर यांच्या तर्फे सर्व पदाधिकारी व नागरिकांना शुभेच्छा देण्यात आल्या. !

यावेळी ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, गजानन महाकाळकर जिल्हाध्यक्ष सेवादल, योगेश दनूष्कर मुख्य प्रशिक्षक सेवादल, पुंडलिक राऊत मुख्य संघटक सेवादल राज्य, कार्याध्यक्ष श्रीकांत शिवणकर, प्रदेश उपाध्यक्ष अनिल अहिरकर, माजी नगरसेवक राजेश माटे, प्रदेश संघटक सचिव हाजी सोहेल पटेल, प्रदेश, महिला सचिव लक्ष्मीताई सावरकर, प्रदेश सचिव सुनिता येरणे, महिला शहर अध्यक्ष जयाताई देशमुख, युवक शहर अध्यक्ष विशाल खांडेकर, सचिन चव्हाण युवक जिल्हाध्यक्ष ग्रामीण, अभिलाषा वनमाळी युवती जिल्हाध्यक्ष ग्रामीण, करिष्मा चुटे जिल्हाध्यक्ष महिला अध्यक्ष, मध्य विभाग अध्यक्ष रवी पराते, पश्चिम विभाग अध्यक्ष योगेश ठाकरे, उत्तर विभाग अध्यक्ष राकेश बोरीकर, आल्हाद जगम, निलिकेश कोल्हे, संतोष पोतराजवार, समीर रहाटे, मिलिंद महादेवकर, अशोक मिश्रा, प्रमोद गारोडी, कपिल मेश्राम, विश्वास पक्कीडे, अमरीश ढोरे, सचिन रंगारी, लक्ष्मीकांत पांडे, मुमताज बेगम, शमीम सिद्दकी, मुरलीधर सोनवणे, झाकीर अली, मोहम्मद आसिफ खान, डॉ.प्रफुलकुमार रामटेके, विलास मामुलवार, सुभाष चिखले, शैलेश तिरबुडे, मधुकर नारनवरे, बनी शर्मा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नागपूर शहर व ग्रामीण पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

……………………………..

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या