फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजराष्ट्रवादीच्या वतीने नागपुरात ‘दसरा महोत्सव, सांस्कृतिक , संगीत आणि भीम गीतांचा कार्यक्रम!

राष्ट्रवादीच्या वतीने नागपुरात ‘दसरा महोत्सव, सांस्कृतिक , संगीत आणि भीम गीतांचा कार्यक्रम!

Advertisements

नागपूर,दिनांक १ ऑक्टोबर २०२५: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, नागपूर शहर आणि ग्रामीण जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ०२ ऑक्टोबर, २०२५ रोजी एक भव्य, ऐतिहासिक आणि सामाजिक एकतेचा संदेश देणाऱ्या दसरा महोत्सव २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे.सायंकाळी ५ ते ७, के डी कॉलनी रोड,दर्शन कॉलनी मैदान ,सद्भावना नगर नागपूर येथे हा कार्यक्रम पार पडणार आहे.

शहर अध्यक्ष अनिल अहिरकर आणि ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजाभाऊ टाकसाळे यांच्या नेतृत्वात हा भव्य सोहळा पार पडणार आहे.

कार्यक्रमाचे उद्घाटक राष्ट्रीय सचिव, जिल्ह्याचे निरीक्षक आणि माज़ी आमदार  राजेंद्र जैन हे लाभणार आहेत.कार्यक्रमाला पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. तसेच, शहरातील आमदार आणि इतर विशेष मान्यवर या सोहळ्याला उपस्थित राहून जनतेला संबोधित करतील.

या भव्य सोहळ्याचे संयोजक म्हणून कार्याध्यक्ष श्रीकांत शिवणकर हे विशेष परिश्रम घेत आहेत. तसेच, तानाजी वनवे आणि मालूताई वनवे हे सह-आयोजक म्हणून सक्रिय भूमिका पार पाडत आहेत.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून नागपूरकरांना एकाच दिवशी धम्मचक्र परिवर्तन दिनाचा सामाजिक समतेचा संदेश, गांधी जयंतीचे राष्ट्रीय मूल्य आणि दसऱ्याचा विजयोत्सव अनुभवता येणार आहे.
या भव्य सोहळ्याला नागपूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व नेते, प्रदेश पदाधिकारी, शहर आणि ग्रामीणचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. नागरिकांनी आणि सर्व पक्ष कार्यकर्त्यांनी या ऐतिहासिक सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, नागपूर शहर आणि ग्रामीण जिल्ह्याच्या वतीने करण्यात आले आहे.

या प्रासंगी शहर कार्याध्यक्ष श्रीकांत शिवणकर, नरेश अरसडे सुनीता येरणे, विशाल खांडेकर, लक्ष्मी सावरकर, बजरंगसिंह परिहार, जानबा मस्के, शोएब असद, राजू मिश्रा, विश्वास फक्किडे, कपिल मेश्राम, यशश्री बनसोड, भारत शर्मा, विकी शर्मा, अमित तावडे, अतुल शेंडे, माँटी गंडेचा समीर रहाटे, श्याम पांडे, राजेश फुले, श्याम बिहारी पांडे, कनिजा बेगम, अंजुम शेख, अनुपमा डोंगरे, विशाल खांडेकर, , हिमांशु पंचबुधे, चंद्रकांत नाईक, कीरण नंदनवार, दिनेश रोडगे, प्रफुल मेश्राम, अनिल तांदुळकर, संदेश खोब्रागडे, विशाल गोंडाने, विवेक वानखेडे, सलाम शेख, आशिक तुर्के, शोभा येवले, पुष्पम धानोरकर स्वप्निल दहिवले, राहुल कांबळे उपस्थित होते.

…………………………………….

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या