फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजराष्ट्रवादावावर काँग्रेसकडे बोलण्यासारखे काहीच नाही: रविशंकर प्रसाद

राष्ट्रवादावावर काँग्रेसकडे बोलण्यासारखे काहीच नाही: रविशंकर प्रसाद

Advertisements

महाराष्ट्रात भाजप पूर्ण बहूमत मिळवेल
नागपूर: महाराष्ट्राच्या निवडणूकीत भारतीय जनता पक्ष्ावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष् नेहमीच एक टिका करते आम्ही राज्याच्या निवडणूकीत काश्‍मीरच्या प्रश्‍नावर, कलम ३७० वर मते मागतो,मला काँग्रेसलाच एक प्रश्‍न विचारायचे आहे ते महाराष्ट्राच्या जनतेला काय समजतात? महाराष्ट्राच्या जनतेला राष्ट्रीय मुद्दे कळत नाही असे आघाडीला वाटते का? असे बोलून ते महाराष्ट्राच्या जनतेचा घोर अपमान करीत आहे,महाराष्ट्राची परंपरा हीच मूळात राष्ट्रावादाची राहीली आहे, मूळात काँग्रेस-राष्ट्रवादीकडे राष्ट्रवादावर बोलण्यासारखे काहीच नाही, अशी जळजळीत टिका देशाचे कायदे मंत्री व भाजपचे माजी राष्ट्रीय प्रवक्ते रविशंकर प्रसाद यांनी केली.
ते बुधवार दि.१६ ऑक्टोबर रोजी हॉटेल सेंटर पाँईट येथे आयोजित पत्र परिषदेत बोलत होते.याप्रसंगी मंचावर आ.गिरीश व्यास,माजी खासदार अजय संचेती, आ.अनिल सोले, आ. सुधाकर कोहळे,शहराध्यक्ष् प्रवीण दटके, प्रदेश प्रवकत्या अर्चना डेहनकर, प्रा.संजय भेंढे, सुभाष पारधी, नगरसेवक धर्मपाल आत्राम आदी उपस्थित होते. पुढे बोलताना रविशंकर प्रसाद म्हणाले,की पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेर्तृत्वात आज जगात भारत हा मोठी ताकद म्हणून ओळखल्या जातोय. जगातील रशिया, अफगानिस्तान, स्पेन,बहराईच,मस्कट आदी सहा देशांनी मोदींना त्यांच्या देशातील सर्वोच्च पुरस्कार प्रदान केला आहे. त्यांच्या मंत्रीमंडळात मला काम करायला मिळाले हे मी माझे भाग्यच समजतो. आमचं सरकार तीन प्रमुख बाबींवर काम करतं,राष्ट्रवाद, सुशासन आणि सुचिता. आतंकवादाविरुद्ध आमच्या सरकारची कामगिरी हे राष्ट्रवादाचेच उदाहरण आहे. आम्ही ३७० वर महाराष्ट्रात मते मागतो असा आक्ष्ेप काँग्रेस-राष्ट्रवादीने घेणे ही अत्यंत लाजिरवाणी बाब असल्याचे ते म्हणाले. आम्ही देशाच्या सुरक्ष्ेचा मुद्दा उचलतो असा आक्ष्ेप ते कसे घेऊ शकतात?असा सवाल त्यांनी केला. कलम ३७० ची काँग्रेसने एक तरी चांगली बाब त्यांनीच जनतेला सांगावी.देशाला लागू होणारा एक तरी कायदा जम्मू-काश्‍मीरव लागू होत होता का? मग तो भ्रष्टाचाराचा कायदा असो,बालविवाहाचा असो,माहितीचा अधिकार,शिक्ष् णाचा अधिकार, संपत्तीचा अधिकार, डोक्यावर मैला वाहणे हा देखील त्या राज्यात गुन्हा नव्हता,मग ३७० कलमचा फायदा त्यांनीच सांगावा. ४२ हजार लाेकांचे रक्त सांडले, काश्‍मीरी पंडीत विस्थापित झालेत. ३७० कलम आंतकवाद, अलगाववादाचे प्रतीक बनले होते, आम्ही .िहंमत केली, हे कलम हटवले. आजच सैन्य भरतीत ३५ हजार काश्‍मीरी तरुणाई यांनी गर्दी केली. काश्‍मीरचा विकास हीच आमची चिंता आहे. भारतीय संविधानातील १०६ कायदे आता जम्मू-काश्‍मीरमध्येही लागू झाले असल्याची माहिती त्यांनी दिली. काँग्रेस-राष्ट्रवादीकडे बोलण्यासारखे काहीच नाही म्हणून ते ३७० वर बोलतात. राष्ट्रवादाच्या प्रश्‍नावर ते पळपुटेपणा करतात,अशी टिका त्यांनी केली. ट्रिपल तलाकचा देखील त्यांनी विरोध केला.

फडणवीस हेच मुख्यमंत्री-
महाराष्ट्राची निवडणूक ही देवेंद्र फडणवीस यांच्या नेर्तृत्वाखाली लढली जात अाहे.तेच मुख्यमंत्री होतील. त्यांच्या नेर्तृत्वात राज्याचा उल्लेखनीय विकास झाला. महाराष्ट्रात १४ लाख कोटींची गुंतवणूक झाली, एकट्या विदर्भात ७२ हजार कोटींची कामे झाली असून सिंचनाच्या क्ष्ेत्रात सर्वाधिक १८ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली आली. फडणवीस यांच्या नेर्तृत्वाखाली चालणाऱ्या.या राज्यात एक ही दंगल झाली नाही किंवा एक ही आतंकवादी घटना घडली नाही. २००८ साली मुंबई हल्ल्यानंतर मुंबईला भेट देणारे तत्कालीन काँग्रेसचे गृहमंत्री यांनी ‘सॉरी मुंबई’ हे शब्द वापरले होते. ते गृहमंत्री सध्या कारागृहात आहेत. फडणवीस यांनी कोणालाही ‘सॉरी’ म्हणायची संधीच दिली नाही,इतकं चांगलं प्रशासन त्यांनी चालविले आहे. राममंदिरच्या प्रश्‍नावर रविशंकर प्रसाद यांनी मात्र मौन बाळगले.हा खटला सध्या न्यायालयात सुरु असल्याने याबाबत मी काहीही बोलणार नसल्याचे ते म्हणाले. देशाच्या अर्थव्यवस्थेविषयी बोलताना जगात आर्थिक मंदी असल्याचे त्यांनी कबूल केले मात्र देशाचा विकास दर हा ६ टक्के निश्‍चित राहणार. अर्थव्यवस्थेचा मूलभूत ढांचा हा मजबूत असल्याचे ते म्हणाले. ७० हजार कोटींचा निवेश हा बँकिंग क्ष्ेत्रात,३० हजार कोटींचा गृहनिर्माण तर १० पब्लिक सेक्टरचे बँकांचे विलीकरण, आयकरासाठी पदाधिकारी हे आता नागरिकांना सरळ नोटीस न देता डिजिटल नोटीस देण्याचा निर्णय इ. मूलभूत निर्णयांचा परिणाम यायला वेळ लागेल मात्र परिणाम नक्कीच सकारात्मक मिळतील,असे ते म्हणाले.

काँग्रेस पक्ष्ाने फक्त स्वत:च्या परिवारातच भारतरत्न वाटले-
आमच्या घोषणापत्रातच वीर सावरकर यांना भारतरत्न देण्याचे जाहीर केले होते. ते खरे देशभक्त होते. मी चार वेळा अंदमान निकोबारच्या त्या सेल्यूलर जेलमध्ये गेलो. ११ वर्षे त्या  अंधाऱ्या कोठडीत वीर सावरकरांनी काढली. आपले तारुण्य या देशाला दिले. देशाकडे त्यांनी काहीच नाही मागितले. त्यांच्या कोठडीखालीच कच्चे फाशी घर होते, त्या आवाजाने थरकाप उडतो. त्यांचा संघर्षाला त्यांच्या राष्ट्रभक्तीला भारतरत्न निश्‍चितच मिळायला पाहीजे. काँग्रेस पक्ष्ाने फक्त स्वत:च्या परिवारातच भारतरत्न वाटले. सरदार पटेल यांनी ५६० रियासते भारतात विलीन केली मात्र पं.नेहरु यांनी एकमेव रियासत काश्‍मीर हा चिघळवला. काँग्रेसचा पंतप्रधान असता तर १९९१ मध्येही डॉ. आंबेडकर किंवा त्यानंतर मौलाना अब्दुल कलाम आजाद यांना भारतरत्न मिळाले नसते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे घटनासमितीचे अध्यक्ष् यासाठी नाही बनले कारण ते अनूसूचित जातीचे होते तर देशातील ते सर्वाधिक विद्वान व्यक्ति होते म्हणून त्यांची अध्यक्ष् पदी निवड झाली असल्याचे रविशंकर यांनी सांगितले.

देशाच्या अपेक्ष्ा आता बदलल्या आहेत-
केंद्र असो किवा राज्य सशक्त विरोधी पक्ष्ाचा अभाव निर्माण झाला असून देशातील सर्वात जुना पक्ष् काँग्रेसला काय सल्ला देणार?या प्रश्‍नावर बोलताना,देशाच्या अपेक्ष्ा आता बदलल्या आहेत असे ते म्हणाले. आता देशाचा पंतप्रधान होण्यासाठी प्रतिष्ठित कुटुंबातच जन्म घेणे गरजेचे राहीले नाही. चहा विकणारा माणूस हा देखील पंतप्रधान होऊ शकतो,हे या देशानी पहील्यांदाज अनुभवले. काँग्रेस पक्ष् मोठा यासाठी होत नाही कारण तो योजनाबद्ध पद्धतीने क्ष्ेत्रीय नेर्तृत्वाला कमजाेर करतो, भारतीय जनता पक्ष् मात्र क्ष्ेत्रीय नेर्तृत्वाचा सन्मान करते, त्यांच्यावर जबाबदारी सोपवतो,त्यामुळे पक्ष् संघटन मजबूत होतो. काँग्रेसला आम्ही काय सल्ला देणार?त्यांनी का कलम ३७० चा विरोध केला? पुलवामा, ट्रिपल तलाकला विरोध करण्याची भूमिका त्यांनी का घेतली?या भूमिकेमुळेच देशात काँग्रेस कमजोर झाली असल्याचे ते म्हणाले. ईमरान खान हे संघाविषयी बोलतात,या विषयी विचारले असता,ईमरान खान यांच्याकडे बोलण्यासाठी दूसरे काय आहे?असा प्रतिप्रश्‍न त्यांनी केला. संघ हे राष्ट्रवाद,चारित्र्य आणि निष्ठेसोबत काम करणारी संघटना आहे.जेवढी संघाची आलोचना होईल तेवढा संघ मोठा होईल,असे ते म्हणाले.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या