फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजराम नेवले यांच्यासह अनेकांना अटक: जिल्हाधिकारी यांचे पिकांचे नमुने बघण्यास नकार

राम नेवले यांच्यासह अनेकांना अटक: जिल्हाधिकारी यांचे पिकांचे नमुने बघण्यास नकार

Advertisements

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी केली प्रचंड घोषणाबाजी

नागपूर: विदर्भ राज्य आंदोलन समिती व शेतकरी संघटना यांच्या वतीने बुधवार दि.६ नोव्हेंबरला दुपारी १२ वा.आकाशवाणी चौकातून जिल्हाधिकारी,नागपूर यांना दाखवायला परतीच्या पावसाने शेतकर्यांच्या पिकांची झालेली नासाडीचे नमुने,कापूस,सोयाबीन,धान,संत्रा आदी आंदोलनकारी शेतकऱ्यांनी आणले होते व हे नमुने देण्यासाठी जात असताना पोलीसांनी त्यांना परवानगी नाकारली. पोलीसांच्या या दडपशाहीच्या विरोधात आंदोलनकारी कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रचंड घोषणाबाजी करुन परिसर दणाणून टाकला. परिणामी शेतकरी नेते राम नेवले यांच्यासह अनेकांना पोलीसांनी अटक केली.

पोलीसांनी दडपशाही करुन आंदोलनकर्त्यांना पिकांचे नमुने सोबत नेता येणार नाही, झेंडे फेकून द्या,नारे लावू नका, असे आदेश दिले मात्र पोलीसांच्या दडपशाहीला न जुमानता शेतकऱ्यांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघाला परिणामी पोलीस हे विदर्भवादी व शेतकरी नेते राम नेवले यांच्यावर तुटून पडले व त्यांना अटक केली. तरी देखील शेतकऱ्यांनी मोर्चा सांभाळून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत घोषणा देत पोहोचलेत, त्यांना आतमध्ये जाण्यापासून अडवण्यात आले. यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या फाटकासमोरच शेतकऱ्यांनी यानंतर सडलेले संत्रे,भाजीपाला,सडलेली कापसाची झाडे आदी फेकली व प्रचंड घोषणाबाजी केली.

१५ दिवस झाले पावसामुळे शेतकऱ्यांचा कापूस,सोयाबीन, धान,संत्रा आदी पिकांची प्रचंड नासाडी झाली असून अद्यापही पंचनामे झाले नसल्यामुळे शेतकरी हा चिंतीत आहे. दूसरीकडे भाजप-सेनेचे नेते हे पिकांच्या नासाडीची पाहणी दौऱ्याच्या नावाखाली फोटो सेशन करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.काही नेते अद्यापही मुख्यमंत्र्यांच्या संगीत खूर्ची खेळात व्यस्त आहे व विदर्भाचा शेतकरी मात्र वाऱ्यावर आहे,असा आरोप माध्यमांशी बोलताना राम नेवले यांनी केला. विदर्भ राज्य आंदोलन समिती व शेतकरी संघटनेकडून नासाडी झालेल्या पीकांचे सर्वेक्ष् ण करण्यासाठी ड्रोन किवा उपग्रहाचा वापर करण्याची मागणी करण्यात आली.कापूस,सोयाबीन,धान आदी पिकांसाठी एकरी ३० हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी, संत्रा फळपिकांना एकरी ५० हजार रुपये द्यावे.शेतकऱ्या ना सर्व कर्जातून व विज बिलातून मुक्त करावे,हमीभाव खरेदी केंद्र त्वरित सुरु करावे,या मागणी करीता समितीतर्फे जिल्हाधिकारी यांना ‘सडका शेतमाल भेट आंदोलन’करण्यात आले होते. वरील मागण्या त्वरीत मान्य न झाल्यास शेतकरी रस्त्यावर उतरतील असा इशारा राम नेवले यांनी दिला.

अटक झालेल्यांमध्ये राम नेवले यांच्यासह मुकेश मासूरकर, सुनिल वडस्कर, वृषभ वानखेडे, वसंत वैद्य,प्रभाकर बेले,मोहन पाटोडे,विजय मौदेकर,पुखराज रेवतकर,विनायक खोरगडे,भैय्यालाल माकडे आदींना अटक करण्यात आली होती.

आंदोलनात विदर्भ राज्य समिती महिला आघाडी अध्यक्ष्ा रंजना मार्मेडे, युवा आघाडी नागपूर विभाग अध्यक्ष् मुकेस मासूरकर, कोर कमेटी सदस्य सुनील वडस्कर,प्रिती दिडमूठे, विठ्ठल काकडे,राजा भैय्या,शेखर काकडे, अन्नाजी राजेधर,मुरलीधर ठाकरे, धर्मराज रेवतकर, भैय्यालाल माकडे, पुंडलिक हरणे, मधुकर सोमलवार, रामदार राऊत, विक्की परबत,गुलाबराव धांडे,अशोक नेवले,योगेश कानेटकर,श्रीराम अंबाडकर,मोरेश्‍वर गौर,पुरुषोत्तम हगवणे,नरेश निमजे,अनिल केसरवाणी,गणेश गणेश गंधेवार,नंदू पेटकर, भार वावीस्टाले,राजेश बंडे,वसंतकुमार चौरसीया,रमेश कन्नमवार आदींसह मोठ्या संख्येने विदर्भवादी व शेतकरी कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या