फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeक्राइमराज्य राखीव पोलीस दलातील जवानांसह तब्बल ६२ पोलीसकर्मी विलगणीकरण कक्षात

राज्य राखीव पोलीस दलातील जवानांसह तब्बल ६२ पोलीसकर्मी विलगणीकरण कक्षात

Advertisements

नागपूर: शहर पोलीस दलातील दोन पोलीस कर्मचारी आणि राज्य राखीव पोलीस दलातील एका जवानाला करोनाची लागण झाल्यानंतर, पोलिस विभागात प्रचंड खळबळ उडाली आहे. पोलिसांना लागण झाल्याचे कळताच तडकाफडकी राज्य राखीव पोलीस दलातील जवानांसह तब्बल ६२ पोलीस कर्मचाऱ्यांना लक्ष्मी नगरमधील पोलीस प्रशिक्षण केंद्रातील विलगणीकरण कक्षात हलविण्यात आले.

करोनाची लागण झाल्याचे कळताच पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, पोलीस सहआयुक्त रवींद्र कदम यांनी हे कर्मचारी कोणाकोणाच्या संपर्कात आले याची माहिती घेण्याचे निर्देश रुग्णालयाला दिले. उपाध्याय यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस मुख्यालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप शिंदे यांनी करोनाबाधित पोलिसांच्या संर्पकात आलेले कर्मचारी व व्यक्तींची माहिती घेतली. त्यानंतर राज्य राखीव पोलीस दलातील तब्बल ३७ जवान, तहसील पोलीस ठाण्यातील डीबी पथकाचे पाच कर्मचारी, पोलीस नियंत्रण कक्षातील १२ व पोलीस उपायुक्त परिमंडळ चारमधील आठ कर्मचाऱ्यांना पोलीस प्रशिक्षण केंद्रातील विलगीकरण कक्षात हलविण्यात आल्याची माहिती आहे.

तहसील पोलीस ठाण्यातील कर्मचारी एका ओळखीच्या व्यक्तीबरोबर शनिवारी सकाळी पोलीस उपायुक्तांच्या परिमंडळ चारमध्ये पास काढायला गेला होता. यावेळी तो उपायुक्तालयातील आठ कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आला. रात्री तहसीलमधील हा कर्मचारी करोनाबाधित असल्याचे समोर येताच, हे आठही कर्मचारी कार्यालयातच क्वारंटाइन झाले. रविवारी सकाळी त्यांना प्रशिक्षण केंद्रात हलविण्यात आले.तहसीलमधील पाच कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांनाही क्वारंटाइन करण्यात येणार आहे. ही संख्या जवळपास ३२च्या वर आहे. त्यांना विलगणीकरण कक्षात ठेवण्यात यावे की घरीच क्वारंटाइन करावे याबाबत वृत्त लिहिपर्यंत वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू होती.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या