फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeब्रेकिंग न्यूजराज्यात २४ तासांत ७७ नवे करोनाग्रस्त; रुग्णसंख्या तीनशेपार

राज्यात २४ तासांत ७७ नवे करोनाग्रस्त; रुग्णसंख्या तीनशेपार

Advertisements

मुंबई: राज्यातील करोनाग्रस्तांचा आकडा वाढतच आहे. मुंबईसह संपूर्ण राज्यात गेल्या २४ तासांत ७७ नव्या रुग्णांची नोंद झाली असून, एकूण आकडा ३०२वर पोहोचला आहे. एकट्या मुंबई आणि परिसरात ५९ रुग्ण सापडले आहेत.

करोनाचा संसर्ग वाढत असून, मुंबईत गेल्या २४ तासांत ५९ रुग्णांची नोंद झाली आहे. तर राज्यात एकूण ७७ नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळं राज्यातील करोनाग्रस्तांचा आकडा ३०२वर पोहोचला आहे. मात्र, आज संध्याकाळपर्यंत करोनाग्रस्तांची एकूण संख्या ही २३० होती. मग अचानक ७२ नवे करोना रुग्ण आले कुठून, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

दुसरीकडे ही आकडेवारी खरी आहे, असं सांगितलं जात आहे. खासगी रुग्णालयांमधील दाखल रुग्णांचे अहवाल प्राप्त झाले आहेत आणि त्यांना करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे, असं सूत्रांकडून सांगितलं जात आहे.
Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या