

मुंबई: राज्यात करोनाग्रस्तांची संख्या वेगानं वाढत आहे. आज दिवसभरात राज्यात ८१ नव्या करोनाच्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळं करोना रुग्णांचा आकडा ४१६वर गेला आहे. एकट्या मुंबईत आज दिवसभरात ५७ रुग्णांना करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. तर आतापर्यंत १९ जणांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. रुग्णांची संख्या आणि मृतांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. आज दिवसभरात राज्यात ८१ नव्या रुग्णांची भर पडली आहे. एकट्या मुंबईत ५७ नवे करोनाबाधित सापडले आहेत. तर पुण्यात सहा, पिंपरी-चिंचवडमध्ये तीन, अहमदनगरमध्ये नऊ, ठाण्यात पाच आणि बुलडाण्यात एकाला करोनाची लागण झाली आहे.




आमचे चॅनल subscribe करा
