फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeब्रेकिंग न्यूजराज्यात आज करोनाचे १२० नवे रुग्ण; एकूण रुग्णसंख्या ८६८ वर

राज्यात आज करोनाचे १२० नवे रुग्ण; एकूण रुग्णसंख्या ८६८ वर

Advertisements
मुंबई: राज्यात आज करोनाच्या १२० नवीन रुग्णांची नोंद झाली. एकूण रुग्ण संख्या ८६८ झाली आहे. ७० करोनाबाधित रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यात आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १७ हजार ५६३ नमुन्यांपैकी १५ हजार ८०८ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोनाकरता निगेटिव्ह आले आहेत; तर ८६८ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३२ हजार ५२१ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून, ३४९८ जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

निजामुद्दीन येथील धार्मिक कार्यक्रमात राज्यातील ज्या नागरिकांनी भाग घेतला होता त्यांचा सर्व जिल्हा आणि महानगरपालिका स्तरावर शोध घेण्यात येत आहे. आतापर्यंत राज्यात या व्यक्तींपैकी ८ जण करोनाबाधित आढळले आहेत. यापैकी प्रत्येकी २ जण पुणे, पिंपरी- चिंचवड आणि अहमदनगर भागातील आहेत; तर प्रत्येकी एक जण हिंगोली आणि वाशिममधील आहे.

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत, त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. मुंबई परिसरातील इतर महापालिका क्षेत्रातही क्लस्टर कंटेनमेंट योजना राबविण्यात येत आहे. कल्याण महापालिका क्षेत्रात १७५ सर्वेक्षण पथके काम करत आहेत. तर ठाणे महानगरपालिका क्षेत्रात २१४ टीम कार्यरत आहेत. तर नवी मुंबई महापालिका क्षेत्रात १७८ टीम नियुक्त करण्यात आलेल्या आहेत. अहमदनगर जिल्ह्यात ७१ तर, बुलढाणा जिल्ह्यात १४७ सर्वेक्षण पथके काम करत आहेत. राज्यात या प्रकारे एकूण २८५५ सर्वेक्षण पथके काम करत असून त्यांनी १० लाखांहून अधिक लोकसंख्येचे सर्वेक्षण केले आहे.
दरम्यान, आज राज्यात ७ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी ४ जण मुंबईतील, प्रत्येकी १ जण नवी मुंबई, ठाणे, वसई विरार येथील आहेत.
राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय पॉझीटिव्ह आढळलेल्या रुग्णांचा तपशील :-
मुंबई – ५२६ (मृत्यू ३४)

पुणे (शहर व ग्रामीण भाग) १४१ (मृत्यू ०५)
सांगली – २५

मुंबई वगळून ठाणे मंडळातील मनपा – ८५ (मृत्यू ०९)
नागपूर – १७
अहमदनगर- २३
यवतमाळ – ४
उस्मानाबाद- ३
लातूर – ८
औरंगाबाद- १० ( मृत्यू ०१)
बुलढाणा- ५ ( मृत्यू ०१)
सातारा – ५
जळगाव- २ ( मृत्यू ०१)
कोल्हापूर, रत्नागिरी, नाशिक प्रत्येकी – २
सिंधुदुर्ग, गोंदिया, वाशीम, अमरावती – (मृत्यू १),
हिंगोली, जालना – प्रत्येकी १
इतर राज्य – २
एकूण- ८६८ त्यापैकी ७० जणांना घरी सोडले. तर ५२ जणांचा मृत्यू

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या