फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजराज्यातील व परराज्यातील परवानगी बाबत निर्णय दिनांक 6 मे पासून कळविण्यात येईल:...

राज्यातील व परराज्यातील परवानगी बाबत निर्णय दिनांक 6 मे पासून कळविण्यात येईल: जिल्हाधिकारी

Advertisements

दिनांक 2 मे सायंकाळ पासून ई पास प्रणालीवर अर्ज केले आहे त्याबाबत 8 मे पासून निर्णय कळविण्यात येईल

प्रवास परवानगी बाबत संबंधित जिल्हाधिकारी यांच्या परवानगी नंतरच मंजुरी

नागपूर दिनांक 4:  राज्यातील इतर जिल्ह्यात तसेच बाहेरच्या राज्यातील जिल्ह्यात प्रवासाच्या परवानगी साठी ऑनलाईन अर्ज केले त्याची परवानगी बाबत 6 मे रोजी कळविण्यात येईल, तसेच ई पास संदर्भात दिनांक 2 मे नंतर च्या अर्जाबाबत 8 मे पावून निर्णय घेण्यात येणार आहे, पालकमंत्री डॉ नितीन राऊत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला,

परवानगीचा अर्ज ज्या जिल्ह्या साठी आहे त्या संबंधित जिल्हाधिकारी याची मान्यता घेतल्या नंतर परवानगी देण्यात येईल.
परवानगी मिळण्या बाबतच्या अर्जा मध्ये 4 हजार 490 अर्ज शासनाच्या वाहन व्यवस्था करावी याबातचे आहेत, रेल्वेची व्यवस्था झाल्यावर मोबाइलवर अर्जदारास कळविण्यात येणार आह.

स्वतःच्या वाहनाने जाण्याबाबत 2 हजार 472 अर्ज प्राप्त झाले आहेत, या पैकी 83 अर्ज नागपूर शहरातील कॅन्टोन्मेंट झोन मधील असल्यामुळे रद्द करण्यात आले आहे, 226 अर्जदारांनी नागपूर येथील त्याचा पत्ता नमूद केला नाही व अपूर्ण आहे,
उर्वरित 2 हजार 153 अर्जामध्ये ते ज्या जिल्ह्यात जाणार आहेत त्याबाबत संबंधित जिल्हाधिकारी याचे सोबत पत्रव्यवहार करण्यात आला. या 2 हजार 153 अर्जदारांना दिनांक 6 मे रोजी महानगर पालिका क्षेत्रात जिल्हाधिकारी कार्यालय येथील सेतू अथवा तहशील कार्यालय मधून परवानगी चे वितरण करण्यात येणार आहे,ग्रामीण भागातील 862 अर्जदाराच्या पर्वणगीचे वितरण संबंधित तहसीलदार कार्यालयातून केल्या जाणार आहे.

परवानगी साठी महाराष्ट्र पोलीस ई पास प्रणावलीवर ज्या अर्ज दारांनी नागपूर पोलीस आयुक्तालयाच्या बाहेरील क्षेत्रातून अर्ज केले आहे, त्याबाबत ऑन लाईन दिनांक 8 मे पासून कळविण्यात येईल असे जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी कळविले आहे.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या