

जनतेकडून वसूल करतात आहेत अवैध ‘कर’
नागपूर,ता. २४ सप्टेंबर: केंद्र शासनाने २०१७ पासून देशात लागू केलेल्या वस्तू व सेवा कर प्रणालीच्या अंमलबजावणी नंतर देखील राज्यातील सर्वच महापालिकांद्वारे जनतेकडून सर्वच प्रकारची कर वसूली केली जात आहे,एकीकडे केंद्राकडून मनपाला या करांच्या रुपात कोट्यावधी रुपयांची परतफेड केली जात आहे तर दूसरीकडे सर्वच महापालिका जनतेकडून देखील अवैध कर वसूल करीत अाहे,या विरोधात सर्वच महापालिकांच्या आयुक्तांना पत्र देऊन देखील अनेक आयुक्तांनी चुकीची माहिती दिली तर अनेकांनी पत्राला उत्तर देखील दिले नाही,यामुळे राज्यातील तब्बल २७ महापालिकेच्या आयुक्तांच्या विरोधात काँग्रेसचे शहराध्यक्ष व आमदार विकास ठाकरे यांनी हक्कभंगाची नोटीस दिली.
आ.विकास ठाकरे यांनी विधानसभेचे कार्यकारी अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांची शुक्रवारी मुंबईत भेट घेतली.ठाकरे यांनी मागील आठवड्यात नागपूरात पत्र-परिषद घेऊन नागरिकांकडून अवैधरित्या तसेच सातत्याने वसूल करण्यात येत असणा-या कर वसूलीच्या विषयीाला वाचा फोडली होती.राज्यातील सर्वच महापालिका या एकीकडे केंद्राकडून जीएसटीच्या रुपात अनुदान ही प्राप्त करतात दूसरीकीडे ज्या करांसाठी त्यांना शासनाकडून अनुदान मिळतं त्याच सर्व करांची वसूली जनतेकडून देखील महापालिका करीत आहेत.

नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी.यांच्या विरोधात त्यांनी पोलिस आयुक्तांकडे तक्रार देखील दाखल केली आहे.
करवसुलीबाबत गेल्या ३ महिन्यांपासून जमा केलेली कागदपत्रे त्यांनी पुरावे म्हणून सादर केली तसेच झिरवाळ यांना या सर्व गौडबंगालाची सविस्तर माहिती दिली.
एकतर चुकीच्या पद्धतीने जनतेकडून कोट्यावधीचा कर वसूल करायचा दूसरीकडे याबाबत विचारणा करण्यात आल्या नंतर एक लोकप्रतिनिधी असणा-या आमदाराच्या पत्राची साधी दखल ही घ्यायची नाही.काहींनी तर अपूर्ण व खोटी माहिती दिली.हा प्रकार म्हणजे आमदाराच्या अधिकाराचा हक्कभंगाचा प्रकार ठरतो.
सरकारची फसवणूक आणि जनतेची दिशाभूल करणा-या राज्यातील २७ मनपा आयुक्तांविरुद्ध हक्कभंग आणि अवमाननासाठी शिस्तभंगाची कारवाई करावी.अशी मागणी ठाकरे यांनी निवेदनाद्वारे केली.




आमचे चॅनल subscribe करा
