फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजराज्यातील पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ले, राज्य सरकारने योगी सारखी मर्दानगी दाखवावी : आ.कृष्णा...

राज्यातील पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ले, राज्य सरकारने योगी सारखी मर्दानगी दाखवावी : आ.कृष्णा खोपडे

Advertisements

नागपूर : राज्यात पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ल्याचे प्रमाण वाढत असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सैनिकासारखे सज्ज राहू कोरीनाशी युद्ध करणाऱ्या या पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ले निंदनीय असून राज्य सरकारने कठोर कारवाई या हल्लेखोरावर करणे अपेक्षित आहे.

हे हल्लेखोर पाकिस्तानी समर्थक असून भारतात डॉक्टर, पोलीस कर्मचारी यांचेशी विनाकारण वाद घालून शक्य असल्यास हल्ले करून आपल्या विकृत मानसिकतेचा परिचय देत आहे. ही बाब सहनशिलतेच्या पलीकडे असून यांचेवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करून कारवाई करावी.

तिकडे उत्तर प्रदेश सारख्या राज्यात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कठोर कारवाईमुळे अशा गुन्हेगाराचे धाबे दणाणले असून आता अशा प्रकारचे भ्याड हल्ले करण्याची कुणाची हिम्मत उत्तरप्रदेशात होत नाही. महाराष्ट्र सरकारने देखील योगी आदित्यनाथ सारखी मर्दानगी दाखवून अशा हल्लेखोरांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून कडक कारवाई करावी.

      अशी प्रतिक्रिया पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांनी केली.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या